Join us

लवंग केसांसाठी संजीवनी! कोरड्या-रुक्ष केसांना 'या' पद्धतीने लावा- महिन्याभरात दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 12:49 IST

clove for hair growth: clove benefits for hair: natural remedy for dry hair: लवंगचा नियमित वापर केल्यास केवळ केस गळणे कमी होत नाही तर टक्कल पडलेल्या जागेवर नवीन केस उगवतात.

केस गळणं, कोरडेरपणा, तुटणं आणि टक्कल पडण्याच्या समस्यांना सर्वांना सामोरे जावे लागत आहे. बाजारात मिळणारे महागडे शाम्पू, कंडिनशर, सिरम किंवा तेल वापरुन देखील केसांवर त्याचा काही विशेष फरक पडत नाही.(Hair Falls Issue) केसगळती रोखण्यासाठी हल्ली बोटॉक्स, स्ट्रेटनिंग किंवा इतर केमिकल्स उत्पादनांचा वापर केला जातो. ज्यामुळे केसांच गळणं कमी होण्याऐवजी ते अधिक प्रमाणात वाढते.(clove for hair growth) केसांना निरोगी, मजबूत आणि मुळांपासून लांब करण्यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घ्यायला हवी. (clove benefits for hair)आयुर्वेदानुसार स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत जे केसांच्या समस्या रोखतात.(natural remedy for dry hair) त्यातीलच एक उपाय म्हणजे लवंग.(hair fall home remedies) दिसायला छोटी जरी असली तरी केसांसाठी संजीवनी आहे. लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे आपल्या स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारतात, केसांच्या मुळांना पोषण देतात आणि नवीन केस उगवण्यासाठी मदत करतात.(clove water for hair growth) नियमित वापर केल्यास केवळ केस गळणे कमी होत नाही तर टक्कल पडलेल्या जागेवर नवीन केस उगवतात. लवंग केसांना कसं लावावं पाहूया. 

केस गळून टक्कल पडलं? ७ भन्नाट टिप्स – केसांचं गळणं होईल बंद, वाढतील दुप्पट वेगाने!

लवंगचे पाणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका पॅनमध्ये पाणी गरम करायला हवे. नंतर त्यात मेथीचे दाणे, लवंग आणि आले घाला. हे पाणी उकळल्यानंतर थंड झाल्यावर गाळून एका स्प्रे बाटतील भरा. हे पाणी रोज टाळूवर लावा. ४० दिवस हा उपाय केल्याने हळूहळू फरक जाणवेल. 

ब्लॅक टी केसांवर करतो जादू! ४ पद्धतीने लावा, केस होतील काळेभोर - कोंडाही कमी

मेथीच्या दाण्यामध्ये प्रथिने आणि लेसिथिन असतात. यातील पोषक घटक केसांच्या मुळांना खोलवर पोषण देते. ज्यामुळे कोंडा दूर होण्यास आणि केस कमी गळण्यास मदत होते. लवंगामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. यामुळे टाळूचे संक्रमण आणि खाज कमी होण्यास मदत होते. तर आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आहे. हे आपल्या केसांना रक्ताभिसरण करण्यास मदत करते, ज्यामुळे केसांची वाढ होते. हे कमकुवत केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी