कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांचेही केस पांढरे झालेले दिसतात. केस असे अकाली पांढरे झाले तर आपाेआपच आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे मग केस काळे करण्यासाठी धडपड सुरू होते. हल्ली बाजारात अनेक केमिकलयुक्त डाय मिळतात. पण ते वापरण्याची भीती वाटते. कित्येक जणांना पांढरे केस काळे करण्यासाठी काहीतरी घरगुती, हर्बल, नॅचरल उपाय हवा असतो. त्या लोकांसाठी काळे तीळ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो (black sesame for gray hair). काळ्या तिळाचा वापर करून पांढरे केस काळे कसे करायचे (home hacks to get rid of gray hair) आणि केस गळणं कमी करण्यासाठी त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा ते पाहूया..(how to use black sesame for gray hair?)
पांढरे केस काळे करण्यासाठी काळ्या तिळांचा वापर कसा करायचा?
हा उपाय करण्यासाठी आपल्याला चमचाभर काळे तीळ लागणार आहेत. यासाठी एक कापूस घ्या.
रेस्टॉरंटच्या भाज्यांची चव नेहमीच एकसारखी कशी असते? शेफ सांगतात परफेक्ट ग्रेव्ही करण्याची खास ट्रिक
तो अगदी स्वच्छ निवडून घ्या. यानंतर तो थोडा पसरवा. त्यामध्ये काळे तीळ घाला आणि तो पुन्हा गोलाकार दुमडून त्याची दिव्यासाठी वापरतो तशी वात करून घ्या.
यानंतर ही वात एका पणतीमध्ये टाका. त्या पणतीमध्ये थोडं तिळाचं तेल घाला. आता पणतीच्या दोन्ही बाजुला थोडे उंच ग्लास ठेवा आणि त्यावर ताटली झाकण म्हणून ठेवा. ती वात लावा.
डोश्याचा तवा तेलकट, चिकट झाला? बघा सोपी ट्रिक- ५ मिनिटांत तवा नव्यासारखा स्वच्छ होईल
आता दिव्याची काजळी ताटलीवर जमा होईल. ती काढून घ्या. त्यामध्ये थोडं तिळाचं तेल घालून ही काजळी केसांना तसेच केसांच्या मुळाशी आठवड्यातून दोन वेळा लावा. यानंतर केस धुवून घ्या. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास केस गळण्याचं प्रमाणही कमी होईल आणि केस अकाली पांढरे होणं थांबेल.
