प्रत्येकीला आपले केस जाड, लांबसडक, घनदाट, काळेभोर असावते असेच वाटते. असे असले तरीही सध्याचे वाढते प्रदूषण, बदलती लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे केसांचे फारच नुकसान होते. केसगळती, केस तुटणे, दुभंगणे, केसांत कोंडा होणे, केसांची वाढ खुंटणे (How To Use Betel Leaves To Stop Hair Problems) अशा केसांशी संबंधित अनेक समस्या हैराण करतात. केसांच्या या समस्या कायमच्या संपून आपले (How to use betel leaves for hair) केस अधिकाधिक सुंदर दिसावेत, यासाठी आपण वेगवेगळे उपाय करुन पाहतो. यासाठी कधी शाम्पू बदलतो तर कधी तेल एवढंच नाही तर केसांवर महागड्या ट्रिटमेंट्स देखील करतो. परंतु हे सगळे उपाय तात्पुरतेच असतात, याचा कधी फायदा होतो (Amazing Benefits Of Betel Leaves For Hair)तर कधी केसांचे नुकसानच होते. अशा परिस्थितीत, केसांचे आरोग्य व सौंदर्य जपण्यासाठी आपण काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार करु शकतो.
आयुर्वेदानुसार, केसांसाठी नागवेलीचे पानं म्हणजे वरदानचं... आयुर्वेदात नागवेलीच्या पानांना विशेष महत्व आहे. नागवेलीचे पानं आरोग्यासोबतच अनेक सौंदर्य उपचारांमध्ये देखील वापरले जाते. खरंतर, विड्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे केसांच्या समस्यांसाठी फायदेशीर मानले जातात. विड्याच्या पानांचा हेअर मास्क लावल्याने केसांच्या तक्रारी दूर होऊन केस लांब, जाड आणि मजबूत होतात. केसांसाठी विड्याच्या पानांचा हेअर मास्क कसा करायचा ते पाहूयात.
नागवेलींच्या पानांचा हेअर मास्क कसा करायचा ?
१. विड्याची पाने, तूप, मध :- नागवेलींच्या पानांचा हेअर मास्क तयार करण्यासाठी आपल्याला, ४ ते ५ नागवेलीची म्हणजेच विड्याची पानं, प्रत्येकी १ टेबलस्पून साजूक तूप आणि मध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. हेअरमास्क तयार करण्यासाठी विड्याची पानं स्वच्छ धुवून मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. या तयार पेस्टमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून साजूक तूप आणि मध घालावे. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून हे मिश्रण थोडे पातळसर करून घ्यावे. तयार हेअरमास्क केसांच्या मुळाशी लावून ५ ते १० मिनिटे मसाज करा. त्यानंतर ३० मिनिटे हेअरमास्क केसांवर आहे तसाच राहू द्या. मग केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत.
मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...
ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...
२. विड्याची पाने, खोबरेल तेल, एरंडेल तेल :- हा हेअरमास्क तयार करण्यासाठी आपल्याला ४ ते ५ नागवेलीची म्हणजेच विड्याची पानं, एरंडेल तेल आणि खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. हेअरमास्क तयार करण्यासाठी विड्याची पानं मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. या तयार पेस्टमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून खोबरेल तेल व एरंडेल तेल घालावे. गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत ते चांगले मिसळा. त्यानंतर हा हेअरमास्क स्काल्प, केसांच्या मुळांवर आणि खालच्या टोकांना देखील लावून घ्यावा. हा मास्क ३० मिनिटे केसांवर तसाच राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.
विड्याच्या पानांचे हेअरमास्क वापरण्याचे फायदे...
१. विड्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, बी१, बी२, सी, पोटॅशियम, निकोटिनिक अॅसिड, जीवनसत्त्वे, खनिजे यांसारखे पोषक घटक असतात. यामुळे केस तुटणे आणि केस पातळ होणे यांसारख्या तक्रारी दूर होतात.
२. विड्याच्या पानांमध्ये ओलावा असतो, जो केसांचा कोरडेपणा दूर करतो.
३. विड्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे केस गळती थांबवते आणि केसांची वाढ होण्यास मदत करते.
४. विड्याच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे स्काल्पला संसर्ग आणि कोंड्याच्या समस्येपासून दूर ठेवतात.
५. विड्याचे पानं केसांना कंडिशनिंग करते आणि तुमचे केस जाड आणि लांब बनवते.