केसांशी संबंधित अनेक समस्या आपल्यापैकी बऱ्याचजणींना सतावतात. केसांत वारंवार कोंडा होणे हे फारच कॉमन असले तरी, ही समस्या त्रासदायकच ठरते. एकदा का डोक्यात कोंडा (Baking Soda For Dandruff) झाला की तो निघता निघत नाही. केसांतील कोंड्याच्या समस्येकडे वेळीच योग्य लक्ष दिले नाही तर, कोंड्याचे प्रमाण वाढून तो अक्षरशः खांद्यावर पडू लागतो. कोंड्यामुळे केसांचे सौंदर्य व आरोग्य कमी होऊ लागते. केसांतील कोंडा घालवण्यासाठी (how to use baking soda for dandruff) आपण वेगवेगळ्या प्रकारची तेलं, शाम्पू, महागड्या ट्रीटमेंट्स करतो, काहीवेळा (remove dandruff with baking soda) याचा परिणाम होतो. हे परिणाम तात्पुरते असले तरी काही दिवसांनी पुन्हा 'जैसे थे' अशीच परिस्थितीत येते(dandruff home remedy with baking soda).
सतत डोक्यांतून पडणारा कोंडा, त्वचेला येणारी खाज आणि गळणारे केस यांसारख्या केसांच्या समस्यांवर आपण घरगुती उपाय म्हणून चक्क बेकिंग सोड्याचा वापर करु शकतो. डोक्यातील कोंडा हटवण्यासाठी जर आपण महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सच्या मागे हात धुवून लागला असाल, तर थांबा! आपल्या किचनमधील पांढराशुभ्र बेकिंग सोडा हे काम सहज करू शकतो. बेकिंग सोड्याचे नैसर्गिक गुणधर्म स्काल्प स्वच्छ करतात आणि कोंड्यावर नियंत्रण ठेवतात. बेकिंग सोडा केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित नाही, तर तो सौंदर्य उपचारांमध्येही चांगलाच उपयोगी आहे. विशेषतः कोंड्यावर तो एक नैसर्गिक क्लिन्झरप्रमाणे काम करतो, डेड स्किन काढून टाकतो आणि स्काल्पला ताजेतवाने करतो. या स्वस्त आणि घरगुती उपायाने स्काल्प हेल्दी होईल आणि कोंड्याच्या समस्येला कायमचे टाळता येऊ शकते. बेकिंग सोड्यात फक्त ३ खास पदार्थ मिसळून केसांवर लावल्यास त्याचे उत्तम परिणाम काही दिवसातच दिसून येतात, यासाठी काय करायचं ते पाहा...
कोंडा घालवण्यासाठी बेकिंग सोडा असरदार...
डोक्यातील सतत वाढणारा कोंडा घालवण्यासाठी बेकिंग सोड्याचा खास घरगुती उपाय अगदी कमी खर्चिक व फायदेशीर ठरु शकतो. suparnatrikha या इंस्टाग्राम अकाऊंटवरून केसांतील कोंडा घालवण्यासाठीचा अस्सल घरगुती उपाय शेअर करण्यात आला आहे. केसांतील कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय करण्यासाठी १ टेबलस्पून एलोवेरा जेल, १ टेबलस्पून मेथी पावडर व बेकिंग सोडा आणि ॲप्पल सायडर व्हिनेगर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
आता उपाय नेमका काय आहे ते पाहू...
एका मोठ्या बाऊलमध्ये २ टेबलस्पून एलोवेरा जेल घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मेथी पावडर व बेकिंग सोडा आणि ॲप्पल सायडर व्हिनेगर घालावे. आता हे सगळे जिन्नस चमच्याने मिसळून त्याचा हेअर मास्क तयार करून घ्यावा.
बिनपैशांचा घरगुती उपाय-‘या’ पांढऱ्या फुलांची जादू-चेहऱ्यावरचे ओपन पाेर्स करते गायब...
आता तयार हेअर मास्क बोटांवर घेऊन हलकेच दाब देत थेट स्काल्पवर लावून मसाज करुन घ्यावा. हा हेअर मास्क स्काल्पवर जिथे अधिक जास्त कोंडा आहे त्या भागात लावून घ्यावा. त्यानंतर अर्धा ते एक तास हा हेअर मास्क स्काल्पवर तसाच लावून ठेवावा. मग शाम्पूने नेहमीप्रमाणे केस स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय आठवड्यातून किमान २ वेळा जरी केला तरी केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते.
भुवया आणि पापण्यांचे केस पांढरे व्हायला लागले? बोटावर ‘हे’ तेल घेऊन करा मसाज- पाहा जादू...
हा हेअर मास्क वापरण्याचे फायदे...
१. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेलमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे डोक्याच्या त्वचेची आग कमी करतात आणि कोंड्यामुळे होणारी त्वचेची खाज शांत करण्यास मदत करतात.
२. मेथी पावडर :- मेथीमध्ये नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म असतात, जे कोंडा निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया आणि फंगसला समूळ नष्ट करतात.
३. बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा स्काल्पवरील डेड स्किन आणि तेलकटपणा हटवतो, ज्यामुळे कोंडा कमी होतो आणि त्वचा स्वच्छ होते.
४. ॲप्पल सायडर व्हिनेगर :- ॲप्पल सायडर व्हिनेगर त्वचेच्या pH पातळीत बॅलन्स राखतो आणि स्काल्पवरील फंगल इन्फेक्शन कमी करतो, जे कोंड्याचं मुख्य कारण असतं.