हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे वाढत्या थंडीचा परिणाम आपल्या त्वचेवरही आता दिसायला लागला आहे. थंडी पडताच त्वचा लगेचच कोरडी व्हायला लागते. पांढरट, भुरकट दिसू लागते. आपल्या डोक्याची त्वचाही त्याला अपवाद नाही. म्हणूनच तर हिवाळ्यामध्ये डोक्यातला कोंडाही खूप जास्त वाढतो. अगदी केसांचा भांग बदलला तरी तिथे कोंडा दिसू लागतो. डोक्यातला कोंडा वाढला की डोकं खूप खाजवतं शिवाय केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. हिवाळ्यात केसांच्या बाबतीत दिसून येणारी आणखी एक समस्या म्हणजे या दिवसांत केस खूप कोरडे, ड्राय दिसतात. केसांना फाटे फुटण्याचं प्रमाणही वाढतं. केसांच्या या सगळ्या तक्रारी कमी करायच्या असतील तर कोरफड खूप उपयुक्त ठरते (home hacks for soft, shiny and silky hair). तिचा कसा वापर करायचा ते पाहा...(how to use aloe vera for reducing dryness of hair?)
केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी कोरफडीचा उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्याला ताजी काेरफड, तांदूळ आणि कडिपत्ता लागणार आहे.
त्यासाठी एक पातेले घ्या. त्यामध्ये १ ग्लास पाणी घाला. या पाण्यामध्ये कडिपत्त्याची ८ ते १० पाने हातानेच थोडी बारीक करून घाला. तसेच २ चमचे तांदूळ घाला.
साधारण ७ ते ८ सेमी एवढा लांबीचा कोरफडीचा एक तुकडा घ्या. त्याच्या दोन्ही बाजुंनी असणारा काटेरी भाग काढून टाका आणि मग उरलेल्या भागाचे बारीक तुकडे करा.
आता हे तुकडेही पातेल्यामध्ये टाका. पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. २ ते ३ मिनिटे पाणी उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा.
थंडीमुळे त्वचा कोरडी पडून चेहरा भुरकट दिसतो? चेहऱ्यावर शिंपडा 'हे' पाणी, त्वचा हायड्रेटेड राहील
आता उकळवून घेतलेलं पाणी थंड झाल्यानंतर ते गाळून घ्या. आता या पाण्यामध्ये तुमचा नेहमीचा शाम्पू घालून व्यवस्थित मिसळवून घ्या. हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. आठवड्यातून एकदा जरी अशा पद्धतीने तयार केलेल्या पाण्याने केस धुतले तरी केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल. हिवाळ्याच्या दिवसांत एखादा माईल्ड शाम्पू वापरणेच जास्त चांगले.
