डोक्यावर पांढरे केस दिसू लागले की, बऱ्याचजणींना खूप टेंन्शन येत. पांढऱ्या केसांमुळे आपण वयस्कर दिसतो आणि आपला लूक देखील बिघडतो. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी सहजसोपा उपाय म्हणून आपण बाजारांतील (almond benefits for hair color) विकतचे केमिकल्सयुक्त हेअर डाय लावतो. बाजारात उपलब्ध असलेले केमिकल-युक्त हेअर डाय केसांना तात्काळ रंग देत असले तरी, कालांतराने ते केसांची नैसर्गिक चमक आणि मूळ रंग हिरावून घेतात(How to use almond to reduce grey hair at home).
केसांचे आरोग्य बिघडवणारे हे रासायनिक रंग वापरण्याऐवजी, सध्या बरेचजण नैसर्गिक आणि घरगुती उपाय करण्यावर अधिक भर देत आहेत. परंतु , नैसर्गिक पद्धतीने घरगुती डाय तयार करण्याची प्रक्रिया अनेकदा खूप वेळखाऊ आणि किचकट वाटते. पण काळजी करू नका! जर तुम्हाला केसांना कोणताही दुष्परिणाम न होता दीर्घकाळ टिकणारा, नैसर्गिक काळा रंग द्यायचा असेल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत सोपा, कमी मेहनतीचा आणि प्रभावी घरगुती उपाय उपलब्ध आहे. हा उपाय म्हणजे बदामाचा वापर करून तयार केलेला नॅचरल हेअर डाय. बदामातील पोषणतत्त्वे केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि नैसर्गिकरित्या ( home remedy for grey hair using almond) केसांना गडद रंग देतात. केसांना सुंदर आणि सुरक्षित ठेवणारा हा जादुई बदामाचा हेअर डाय अगदी सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा, याची संपूर्ण कृती आणि वापरण्याची पद्धत पाहूयात.
घराच्याघरीच, बदामाचा नॅचरल हेअर डाय कसा करायचा ?
घरगुती बदामाचा हेअर डाय तयार करण्यासाठी आपल्याला, २ ते ३ टेबलस्पून बदामाचे तेल, ७ ते ८ बदाम, १/२ कप मोहरीचे तेल, १ टेबलस्पून एलोवेरा जेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
केसांसाठी वापरा जादुई चहाचे पाणी! सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय - केसांच्या समस्या राहतील कायम दूर...
बदामाचा नॅचरल हेअर डाय तयार करण्यासाठी...
सर्वातआधी, ५ ते ६ बदाम एका तव्यावर मंद आचेवर चांगले भाजून घ्या. जेव्हा बदाम पूर्णपणे भाजून काळे होतील, तेव्हा ते तव्यावरून काढून घेऊन थंड होऊ द्या. थंड झाल्यावर, या भाजलेल्या बदामांना बारीक कुटून त्याची पावडर तयार करा.
घरगुती नैसर्गिक हेअर डाय बनवण्यासाठी २ ते ३ चमचे बदामाचे तेल आणि तेवढ्याच प्रमाणात मोहरीचे तेल एकत्र मिसळून घ्या. म्हणजेच, दोन्ही तेल समान प्रमाणात घ्या. या तेलाच्या मिश्रणात १ ते २ चमचे कोरफड जेल घाला. हे सर्व घटक एकमेकांमध्ये चांगले मिसळा, जेणेकरून एक गुळगुळीत बेस तयार होईल. सर्वात शेवटी, तुम्ही जी भाजलेल्या बदामाची पावडर बनवली होती, ती या मिश्रणात टाकून चांगली मिक्स करून घ्या. हे मिश्रण मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि फक्त ५ मिनिटांसाठी हलके गरम करा. लक्षात ठेवा, याला उकळायचे नाही आहे, फक्त हलके कोमट गरम करायचे आहे.
केसांसाठी याचा वापर कसा करावा ?
जेव्हा हा डाय थंड होईल, तेव्हा तो तुम्ही तुमच्या पांढऱ्या केसांवर सहजपणे लावू शकता. हा डाय तुमच्या केसांना रंगासोबतच पोषण देखील देईल. डाय ब्रशच्या मदतीने केसांच्या लांबीवर आणि मुळांवर लावा. डाय केसांना २ तास लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
बदामाचा नॅचरल डाय केसांना लावण्याचे फायदे...
१. बदाम तेलातील व्हिटॅमिन 'ई' (Vitamin E) केसांना आतून पोषण देते, ज्यामुळे केस मजबूत होतात आणि तुटणे कमी होते.
२. कोरफड जेल केसांना मॉइश्चराइझ करते आणि केसांच्या मुळांना योग्य रीतीने पोषण देऊन कोंडा कमी करण्यास मदत करते.
३. मोहरीचे तेल नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. हे केसांना मऊ, चमकदार आणि मुलायम बनवते, ज्यामुळे केसांमधील गुंता कमी होतो आणि ते तुटत नाहीत.