Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना डाय -ना केमिकल हेअर कलर-करा फक्त ५ गोष्टी, पांढरे केस होतील काळेभोर; चमकही वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 17:26 IST

Natural Black Hair: Reverse Grey Hair Naturally: Ayurvedic Hair Care: १० मिनिटांत हा घरगुती हेअर डाय कसा बनवायचा पाहूया.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि वाढत्या प्रदूषणामुळे कमी वयातच केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी पन्नाशीत पांढरे होणारे केस आता तिशी-विशीत आणि शाळकरी मुलांमध्येही दिसू लागले आहेत. यावर उपाय म्हणून आपण बाजारातील केमिकल हेअर डाय किंवा कलर्सकडे वळतो. हे कलर्स तात्पुरते केस काळे करत असले तरी यात असणारे केमिकल्स आपल्या केसांचे नैसर्गिक आरोग्य खराब करतात. केस कोरडे होणे, गळणे आणि उरलेले काळे केस पांढरे होणे अशा समस्या उद्भवतात. आपलेही पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील कर स्वयंपाकघरातील काही साध्या गोष्टी जादूसारख्या काम करु शकतात. आपण घरगुती उपाय करुन केसांना फक्त रंगच देत नाही तर त्यांना मुळापासून मजबूत आणि दाट बनवतो. १० मिनिटांत हा घरगुती हेअर डाय कसा बनवायचा पाहूया. 

कुकरमध्ये शिजवताना भात चिकट होतो- पाणी राहते? ५ सोप्या ट्रिक्स, हॉटेलसारखा मोकळा - दाणेदार पांढराशुभ्र होईल भात

घरगुती हेअर डाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

काळे तीळ - २ चमचे कलौंजी - २ चमचेमेथी दाणे - २ चमचे आवळा पावडर - १ छोटी वाटी हळद - १ मोठा चमचा खोबऱ्याचे तेल - २ ते ३ चमचे 

कृती 

1. सगळ्यात आधी गॅसवर लोखंडी तवा ठेवा. त्यावर काळे तीळ, कलौंजी आणि मेथी दाणे घालून सर्व साहित्य मंद आचेवर चांगले भाजून घ्या. जोपर्यंत या साहित्याचा रंग गडद काळा होत नाही आणि खमंग वास येत नाही, तोपर्यंत भाजत राहा.

2. साहित्य काळे होऊ लागले की त्यात आवळा पावडर आणि हळद घाला. पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित भाजा. आवळा पावडर भाजल्यानंतर ती कोळशासारखी काळी दिसेल. सर्व साहित्य पूर्णपणे काळे झाल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. 

3. थंड झालेले सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करा. एका वाटीत ३ ते ४ चमचे ही पावडर घ्या. त्यात २ ते ३ चमचे खोबऱ्याचे तेल घाला. हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. हा डाय केसांना २ तास लावून ठेवा. यामुळे केसांना नैसर्गिक रंग मिळेल. केस धुताना कोमट पाण्याचा वापर करा. शाम्पूने केस दुसऱ्या दिवशी धुवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Natural hair dye: Turn white hair black with 5 kitchen ingredients.

Web Summary : Combat premature graying with a homemade hair dye using ingredients like black sesame seeds, fenugreek, and amla powder. This natural remedy not only darkens hair but also strengthens it from the roots, promoting healthy and vibrant locks.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी