Join us
Daily Top 2Weekly Top 5

धाग्यासारखे पांढरे केस चमकतात? स्वयंपाकातील २ गोष्टी 'या' पद्धतीने लावा, ४५ मिनिटांत मिळेल नैसर्गिक काळा-डार्क ब्राऊन रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 16:14 IST

Pandhre kes kale karnyache gharuti upay: Safed kes kale karnyachi trick: Natural hair dye at home Marathi: नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण घरच्या घरी नैसर्गिक हेअर डाई बनवू शकतो.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढत्या प्रदूषणामुळे केस पांढरे होणे ही केवळ वयोमानानुसार येणारी समस्या राहिलेली नाही. अगदी विशी-तिशीतील तरुणांचे केसही आता पांढरे होऊ लागले आहेत. एकदा का केस पांढरे दिसायला लागले की, आपण लगेच केमिकलने भरलेल्या हेअर डाय किंवा कलर्सकडे वळतो.(Pandhre kes kale karnyache gharuti upay) पण, या केमिकल्समुळे केस तात्पुरते काळे होत असले, तरी ते अधिक कोरडे आणि निर्जीव होतात. काहीवेळा तर उरलेले काळे केसही या केमिकल्समुळे पांढरे होऊ लागतात.आपण रोज उत्साहाने पितो ती कॉफी आणि केकसाठी वापरली जाणारी कोको पावडर ही आपल्या पांढर्‍या झालेल्या केसांवर जादू करेल. तज्ज्ञांच्या मते, कॉफी आणि कोको पावडरमध्ये असे नैसर्गिक रंगद्रव्य (Safed kes kale karnyachi trick) असतात, जे केसांना हानी न पोहोचवता त्यांना एक सुंदर डार्क ब्राऊन रंग देऊ शकतात. जर आपल्यालाही महागड्या आणि घातक केमिकल्सपासून सुटका हवी असेल, तर 'या' नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण घरच्या घरी नैसर्गिक हेअर डाई बनवू शकतो.(Natural hair dye at home Marathi) 

१५ दिवस जास्त पुरेल गॅस, पाहा स्वयंपाकाचा गॅस बचतीसाठी ५ स्मार्ट ट्रिक्स, स्वयंपाक झटपट-गॅसचीही बचत

नैसर्गिक पद्धतीने केस रंगवण्यासाठी कॉफी आणि कोको पावडर हे उत्तम पर्याय आहेत. हे आपल्या केसांना रंगच देत नाही तर केसांचा पोत सुधारण्यासही मदत करतात. कॉफीमध्ये कॅफिन आणि गडद रंग असतो जो केसांच्या बाहेरील आवरणावर जाऊन बसतो. यामुळे केसांना तात्पुरता पण गडद ब्राऊन रंग मिळतो. तर कोको पावडरमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे केसांना पोषण देतात. 

होममेड नैसर्गिक हेअर डाय कसा बनवायचा?

इन्स्टंट कॉफी पावडर - २ मोठे चमचेकोको पावडर - २ मोठे चमचेपाणी - १ कप पाणी कंडिशनर किंवा दही - २ चमचे 

कृती 

सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कॉफी आणि कोको पावडर नीट मिसळून घ्या. हे मिश्रण मंद आचेवर उकळायला ठेवा. पाणी अर्धे होईपर्यंत ते आटवा, ज्यामुळे त्याचा रंग अतिशय डार्क होईल. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात दही किंवा आपले नेहमीचे कंडिशनर मिसळा. यामुळे केसांना रंग लावण्यासोबतच ते मऊ होतील. 

लावण्याची पद्धत:

सगळ्यात आधी केस स्वच्छ धुवून कोरडे करा. केसांवर तेल नसेल याची काळजी घ्या. ब्रशच्या मदतीने हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. पांढरे केस जास्त असतील त्या ठिकाणी जाड थर लावा. केसांवर हा डाय किमान १ ते २ तास राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. केस धुताना शाम्पूचा वापर टाळा. यामुळे रंग निघू शकतो. दुसऱ्या दिवशी शाम्पून केस धुवा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Naturally darken gray hair with coffee and cocoa powder at home.

Web Summary : Combat gray hair naturally! Coffee and cocoa powder create a safe, dark brown hair dye. Mix, apply, and rinse for vibrant color and healthy hair. Avoid shampooing immediately.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी