Join us

केसांना डाय नकोच! स्वयंपाकघरातील ४ पदार्थ अकाली पिकणारे केस करतील काळेभोर- पांढरे केस धाग्यासारखे चमकणार नाहीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2025 14:38 IST

natural remedies for white hair: home remedies to turn white hair black: how to stop premature white hair naturally : स्वयंपाकघरात आढळणाऱ्या ४ पदार्थांचा केसांसाठी कसा वापर करायला हवा, पाहूया.

सध्या कमी वयात पांढरे केस होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.(White hair problem) २० ते २५ वयातच केस पिकायला लागतात आणि मग आपण त्यावर डाय, मेहेंदी किंवा केमिकलयुक्त घटकांचा वापर करतो.(natural remedies for white hair) यामुळे केस काही काळासाठी काळे तर होतात पण केसांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. केस काही दिवस काळेभोर दिसले तरी त्यांची नैसर्गिक चमक, मुळांची ताकद आणि गळणं मोठ्या प्रमाणात वाढतं. (home remedies to turn white hair black)पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी सध्या बाजारात अनेक डाय किंवा मेहेंदी उपलब्ध आहे. पण याचा वापर केल्यास टाळूचे आरोग्य बिघडते.(how to stop premature white hair naturally) या त्रासावर डाय हा उपाय नसून काही नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास आपले केस काळेभोर होण्यास मदत होतील. स्वयंपाकघरात आढळणाऱ्या ४ पदार्थांचा केसांसाठी कसा वापर करायला हवा, पाहूया. (best home remedy for white hair)

नारळाचं तेल लावल्यानं कमी होतात स्ट्रेच मार्क्स? डॉक्टरांचा सल्ला, ‘असे’ लावा नारळाचे तेल

केसांना काळेभोर करण्यासाठी आपल्याला २०० मिली एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, १ चमचा कॉफी, १ चमचा हळद, १ चमचा काळे जिरे किंवा निगेला पावडर लागेल. पांढऱ्या केसांना हे मिश्रण लावण्यासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑइल मंद आचेवर गरम करा, यातून धूर निघणार नाही याची काळजी घ्या. त्यात कॉफी, हळद आणि निगेला पावडर घाला, २ मिनिटे मंद आचेवर ठेवा. गॅस बंद करुन मिश्रण थंड होऊ द्या. हे मिश्रण लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुवा. ज्या भागात केस पांढरे आहेत. त्यावर टूथब्रशने १५ ते ३० मिनिटे लावा. सुकल्यानंतर केस शाम्पूने धुवा. 

या सर्व साहित्याचा पावडर करुन मगच तेलात शिजवा. पावडर रखरखीत असेल तर केसांना व्यवस्थित चिकटणार नाही. ऑलिव्ह ऑइल केसांना चिकटपणा आणण्यास मदत करतो. कॉफी केसांना हलका रंग येण्यास मदत करते. हे मिश्रण केसांना लावण्यापूर्वी हातात मोजे घाला. आपल्या केसांना तेल लावायला हवे. तसेच पहिल्यांदा हा उपाय करणार असाल तर पॅच टेस्ट नक्की करुन बघा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Kitchen ingredients to reverse grey hair: A natural remedy.

Web Summary : Premature grey hair is a growing concern. This article suggests using olive oil, coffee, turmeric, and black cumin to naturally darken hair. Apply the mixture for 15-30 minutes before shampooing for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी