वाढते प्रदूषण, बदलेली जीवनशैली आणि चुकीचा आहार याचा जितका आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तितकाच आपल्या केसांवर देखील.(Hair care Soluion) सध्या कमी वयातच अनेक तरुण-तरुणींना केसगळती, पांढरे केस किंवा केसांच्या इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.(White Hair Problem) या वयात केस अकाली पांढरे होणे किंवा केसगळतीची समस्या सुरु झाली की आपला स्ट्रेस अधिक वाढतो. (hair care tips)
पांढऱ्या केसांना काळेभोर करण्यासाठी आपण विविध तेल, महागडे केमिकल्स आणि मेहेंदी सारख्या उत्पादनांचा वापर करतो. या रंगांमध्ये असलेले रसायन केसांना काळे तर करते परंतु, काही काळाने केस पुन्हा पांढरे होऊ लागतात. यामुळे केसांवर विपरीत परिणाम होऊन केसांना अधिक नुकसान पोहोचवते.(white hair solution) जर कमी वयात आपलेही केस पांढरे झाले असतील, केसगळती वाढली असेल तर प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर याविषयी माहिती शेअर केली आहे. (green leaves for hair)
घरातल्या ओल्या कचऱ्याचा दुर्गंध घरभर पसरतो? ५ टिप्स-डस्टबिन राहील स्वच्छ-वासही गायब
डॉक्टर सांगतात केस काळे करण्यासाठी इंडिगो पावडरचा वापर करायला हवा. ही वनस्पती उष्णकटिंबंधीय भागात जास्त प्रमाणात आढळते. आयुर्वेदानुसार याचे खूप फायदे आहेत. इंडिगो पावडर म्हणजे नील वनस्पतीपासून तयार केलेला एक नैसर्गिक रंग. हा रंग कापड रंगवण्यासाठी केला जातो. पण तसेच अकाली पिकणाऱ्या केसांसाठी देखील फायदेशीर आहे. ही पावडर केसांसाठी कंडिशनिंग म्हणून काम करते आणि केसांना मजबूत बनवते. जर ही पावडर आपण नैसर्गिक मेहेंदीमध्ये मिसळून लावल्यास केसांचा रंग सुधारण्यास मदत करते. यासोबतच आपल्याला पुरेसा आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे.
ही पावडर बनवण्यासाठी इंडिगोच्या पानांची पावडर तयार करा. आणि लिंबाच्या रसामध्ये मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट काही तास भिजवून ठेवल्यास त्याचा रंग चांगला येतो. यामध्ये अमोनिया, सल्फेट्स किंवा पॅराबेन्ससारखे घटक असतात. हे केसांना मजबूत करुन नैसर्गिक चमक देते. यामुळे आपली टाळू निरोगी राहून कोंडासारख्या समस्या देखील कमी होतात.
केस काळे करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी केस सौम्य शाम्पूने धुवावे लागतील. तयार पावडरची पेस्ट आपल्या मेहेंदीमध्ये मिसळून केसांना लावावी लागेल. त्यानंतर शॉवर कॅप घालून ३० मिनिटे किंवा तासभर तरी ठेवा. सुकल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. नंतर सौम्य शाम्पू आणि कंडिशनर वापरा. यामुळे महिनाभर तरी केसांना कलर करण्याची गरज भासणार नाही.