Join us

केसात घाम साचतो-चिपचिपे होतात? ४ सोपे उपाय, घामाचा त्रास होईल कमी- केस होतील मऊसुत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 16:15 IST

hair sweat control tips: reduce hair stickiness in Monsoon : scalp sweat remedies: पावसाच्या पाण्यामुळे केस चिपचिपे होत असतील तर अशावेळी आपण काही घरगुती उपाय करुन पाहू शकतो. ज्यामुळे केसांची वाढ होईल.

ऋतू कोणताही असला तरी आपल्याला घामाचा त्रास हा होतोच.(Monsoon Hair care Tips) पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.(Hair falls Solution) परंतु, आरोग्याची काळजी घेताना आपण केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. (hair sweat control tips) पावसाळ्यात केसांमध्ये घाम किंवा पावसाच्या पाण्यामुळे ओलावा तयार होतो. ज्यामुळे केसात कोंडा होतो. केसात जास्त वेळ घाम किंवा ओलावा राहिल्याने खाज येते, केसांचा वास येऊ लागतो. केस चिकट होणे, केसांत फोड येणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. (reduce hair stickiness in Monsoon)आपण कितीही फॅन किंवा एसी जवळ बसलो तरी केसांचे नुकसान होते. (scalp sweat remedies) टाळूला नुकसान झाल्यामुळे केस गळतात. घामामुळे केसांची नीट वाढ होत नाही, केस अधिक कमकुवत होऊन लगेच तुटतात. जर केसांमध्ये वारंवार घाम साचत असेल किंवा पावसाच्या पाण्यामुळे केस चिपचिपे होत असतील तर अशावेळी आपण काही घरगुती उपाय करुन पाहू शकतो. ज्यामुळे केसांची वाढ होईल. (how to keep hair fresh all day)

पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी

1. टाळूवरील घाम काढून टाकण्यासाठी कोरफडीचा गर फायदेशीर ठरेल. केस धुण्यापूर्वी टाळूला कोरफडीचा गर लावा. २० मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि थंड करणारे घटक आहे. ज्यामुळे टाळूला घाम येत नाही आणि तसेच घामाचा वासही कमी होतो. 

2. कडुलिंब हे अँटीसेप्टिक म्हणून काम करते. टाळू स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करता येतो. सगळ्यात आधी कडुलिंबाची पाने धुवून उकळवा. हे पाणी थंड झाल्यानंतर त्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसातील घाम निघून जाण्यास मदत होईल. 

केसांची वाढ खुंटली-सारखे गळतात? रामबाण उपाय- केस वाढतील भरभर, दाटही होतील

3. व्हिनेगर हे आपल्या प्रत्येकाच्या घरात असते. याचा वापर करुन आपण घाम येण्याचे टाळू शकतो. व्हिनेगरमुळे टाळूची पीएच पातळी संतुलित होते. पण हे केसांवर लावू नका. एक कप पाण्यात चमचाभर व्हिनेगर विरघळवा आणि नंतर त्याचा  वापर करा. कापसाच्या मदतीने टाळूवर लावा आणि अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा. 

4. आपल्या स्वयंपाकघरात बेकिंग सोडा असतो. केस धुण्यापूर्वी टाळूवर थोडासा बेकिंग सोडा लावा. केसांवर १५ मिनिटे असेच राहू द्या. शाम्पूने केस धुवा. दोन ते तीन वेळा असे केल्यानंतर घाम जाण्यास मदत होईल. पॅच टेस्ट केल्यानंतर याचा वापर करा, अन्यथा ऍलर्जीची होण्याची शक्यता असते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी