वाढते प्रदूषण, चुकीचा आहार आणि रासायनिक उत्पादनांचा अतिवापर यामुळे एकेकाळी घनदाट असणारे केस आता शेपटीसारखे झाले आहे. महागडे शाम्पू, महागडे शॅम्पू, तेलं आणि पार्लरमधील ट्रीटमेंट घेऊनही आपल्याला हवा तसा परिणाम मिळत आहे. केसगळतीमुळे टक्कलही दिसू लागते.(Hair fall remedy) इतकेच नाही तर केस विरळ देखील दिसू लागतात. केस तुटण्याची, गळण्याची समस्या आजकाल प्रत्येकाला जाणवते. केस गळायला लागले की कोणतेही शाम्पू, सिरम, तेल लावले तरी कायमच गळत राहतात.(Hair fall problem) केसांची काळजी घेण्यासाठी आपण काही खास टिप्सचा लक्षात ठेवायला हव्या. ज्यामुळे लांबसडक, दाट केस मिळतील. (Home remedies for hair fall)केसांना काळे करण्यासाठी, केसांतील कोंडा कमी करण्यासाठी अनेक केसांना मेहेंदी लावतात. आजही आपल्यापैकी कित्येकजणी केसांसाठी केमिकल रंगांऐवजी मेहेंदी लावण्यालाच पसंती देतात. पण मेहेंदी काही घटक मिसळून लावल्यास त्याचा आपल्या टाळूवर काही परिणाम होत नाही. तसेच केस काळे देखील होतात आणि केसांची वाढ देखील होते. पाहूया मेहेंदी भिजवताना त्यात कोणते पदार्थ घालायला हवे.
साहित्य
सुकलेली जास्वंदीची फुले - १ वाटी सुकलेला आवळा - १ वाटी कडुलिंबाची पाने - १ वाटी मेहेंदी - १ कप
कसा तयार करायचा हेअर मास्क
1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात सुकलेली जास्वंदीची फुले, आवळा आणि कडुलिंबाची पाने वाटू त्याची पावडर तयार करा. एका लोखंडी कढईत केसांच्या लांबीनुसार मेहेंदी पावडर घ्या. त्यात तयार केलेली २ ते ३ चमचे घरगुती पावडर मिसळा. कोमट पाणी घालून एकजीव पेस्ट तयार करा आणि ती रात्रभर भिजत ठेवा.
2. हा मास्क आठवड्यातून एकदा किंवा १५ दिवसांतून एकदा केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा. २ ते ३ तासांनंतर केस साध्या पाण्याने धुवा. दुसऱ्या दिवशी तेल लावून मग केसांना शाम्पू लावा.
3. कडुलिंबामुळे टाळू स्वच्छ होते, ज्यामुळे केसगळती थांबते. आवळा आणि जास्वंद कोलेजन वाढवतात. ज्यामुळे आपल्या केसांची वाढ जोमाने होते. आवळ्याला केसांसाठी 'व्हिटॅमिन सी' चा पॉवरहाऊस मानले जाते. याचा केसांसाठी वापर केल्यास केस अकाली पांढरे होत नाहीत आणि केसांच्या मुळांना बळकटी मिळते.
Web Summary : Hair fall is a common problem due to pollution and chemical products. Use this home remedy of henna mixed with hibiscus, amla, and neem. This mask strengthens hair roots, prevents graying, and promotes hair growth for thicker, longer hair.
Web Summary : प्रदूषण और रासायनिक उत्पादों के कारण बालों का झड़ना एक आम समस्या है। गुड़हल, आंवला और नीम के साथ मिलाकर मेहंदी का यह घरेलू उपाय आजमाएं। यह मास्क बालों की जड़ों को मजबूत करता है, सफ़ेद होने से रोकता है और घने, लंबे बालों के लिए बालों के विकास को बढ़ावा देता है।