Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत केसगळती, कोंड्याने हैराण? शेवग्याच्या पानांमध्ये मिसळा ५ पदार्थ, जालीम उपाय - महिन्याभरात केस वाढतील दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2025 09:30 IST

winter hair fall remedy: hair fall control tips: moringa leaves for hair: शेवग्याच्या पानांचे सिरम कसं बनवायचं पाहूया.

सध्या केसगळती, कोंडा आणि केस कोरडे होणे ही समस्या सामान्य झाली आहे.  हिवाळा आला की सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे केसगळती, कोंडा आणि कोरडी, खवलेली टाळू.(winter hair fall remedy) वातावरणातील गारव्यामुळे टाळूतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होतो आणि केस कमकुवत होतात. रोजची धूळ- प्रदूषणाचा त्रास, चुकीचे हेअर प्रॉडक्ट्स, गरम पाण्याने आंघोळ.(hair fall control tips) या सगळ्यांचा परिणाम आपल्या केसांवर होतो. ज्यामुळे केस सतत गळतात, तुटतात आणि पातळ होतात. अशावेळी आपण महागडे सिरम्स, तेलं आणि शॅम्पू वापरूनही परिणाम न दिसल्यामुळे वैतागतो. (moringa leaves for hair)आयुर्वेदानुसार शेवग्याचे पानं हे बहुगुणी मानले जाते. शेवगा म्हणजे पोषक तत्वांचा खजिना. यात व्हिटॅमिन A, B, C, लोह, झिंक, अमिनो ॲसिड्स आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. यामुळे याची पानं टाळूला पोषण देतात, रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना ताकद मिळते. या पानांचे सिरम कसं बनवायचं पाहूया. 

टोमॅटो काळे पडतात- लवकर सडतात? ५ टिप्स- फ्रीजशिवाय टोमॅटो राहातील खूप दिवस फ्रेश

साहित्य 

२ चमचे- शेवग्याच्या पानांचा पावडर४ चमचे- नारळ तेल२ चमचे- बदाम तेल१ चमचे कोरफड जेल४-५ थेंब - लैव्हेंडर किंवा रोझमेरी तेल (पर्यायी)

कृती 

सगळ्यात आधी एका भांड्यात नारळाचे तेल आणि बदामाचे तेल घालून थोडे गरम करा. त्यात मोरिंगा पावडर घाला. मंद आचेवर ५ ते ६ मिनिटे शिजवा. ज्यामुळे त्यातील पोषक घटक त्यात मिसळतील. मिश्रण थंड झाल्यानंतर गाळून घ्या. त्यात कोरफडीचा गर मिसळून काचेच्या बाटलीत भरा. हे सीरम केस धुण्यापूर्वी १ ते अर्धा तास आधी लावा. तळहातांवर थोडेसे सीरम घेऊन केसांच्या मुळांपर्यंत लावल्यास फायदा होईल. 

हिवाळ्यात केसगळतीची समस्या सर्वांनाच भेडसावते. पण रासायनिक शॅम्पूंऐवजी घरगुती उपाय वापरले तर परिणाम चांगले मिळतात. शेवग्याच्या पानांनी केवळ केस वाढत नाहीत, तर फाटे फुटण्याची समस्या कमी होते, केसांना घनदाटपणा येतो, टाळूतील सूज कमी होते आणि मूळ देखील घट्ट होतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Moringa leaves for hair: Stop hair fall, dandruff with this remedy.

Web Summary : Combat winter hair woes! Moringa leaves mixed with coconut, almond oil, aloe vera, and essential oil can nourish the scalp, strengthen roots, and boost hair growth. This DIY serum offers a natural solution for hair fall and dandruff.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी