Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस विंचरताना हातात केसांचे पुंजके येतात? नारळाच्या तेलात मिसळा २ गोष्टी, केसगळती थांबेल- महिन्याभरात दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2026 14:03 IST

Best hair care routine for hair loss: Solutions for hair thinning and falling: हे तेल केसांना नियमितपणे लावल्यास आपल्याला महिन्याभरात फरक पाहायला मिळेल.

दाट, काळे आणि मजबूत केस हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून आपल्या उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. पण सध्याच्या प्रदूषणयुक्त वातावरणात आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे केस गळतीची समस्या घराघरात पोहोचली आहे.(Hair Care Tips) बरेचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर उशीवर पडलेले केस किंवा विंचरताना हातात येणारे केसांचे पुंजके पाहून आपल्याला रडू येतं. अशावेळी आपण केसांना विविध तेल, महागडे शाम्पू आणि हेअर ट्रिटमेंट्स करतो. पण त्यानेही हवा तसा फरक पडत नाही.(Best hair care routine for hair loss) आता टक्कलच पडते की काय अशी भीती देखील आपल्याला सतावू लागते. खरं तर केसांच्या समस्यांवर सर्वात प्रभावी उपाय आपल्या स्वयंपाकघरात दडलेला आहे. नारळाचे तेल पूर्वीपासूनच केसांच्या पोषणासाठी वापरले जात आहे.(Indian secret for thick and long hair) पण यात काही पदार्थ मिसळल्यास केसांवर हे तेल जादूसारखे काम करते. यामुळे फक्त केसगळती थांबत नाही तर केसांच्या मुळांना मजबूती देऊन नवीन केस येण्यासही मदत होते. हे तेल केसांना नियमितपणे लावल्यास आपल्याला महिन्याभरात फरक पाहायला मिळेल. 

२०२६ स्पेशल स्लिव्ह्ज डिझाइन, ब्लाऊजच्या ७ प्रकारच्या बाह्या दिसतात इतक्या सुंदर की रोज नेसावीशी वाटेल साडी

केसगळतीचे मुख्य कारण पोषक तत्वांचा अभाव आणि केसांच्या मुळांमधील कमकुवतपणा. नारळाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि फॅटी अॅसिड्स असतात. जे केसांना मॉइश्चरायझर करण्यास मदत करतात. हे तेल बनवण्यासाठी आपल्याला मेथी दाणे आणि कढीपत्ता या दोन गोष्टी लागतील. 

मेथी दाण्यामध्ये प्रथिने आणि निकोटिन अॅसिड असते. जे केस गळती रोखण्यासाठी मदत करते. कढीपत्त्यात लोह आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते. जे केसांच्या नैसर्गिक रंगाचे रक्षण करते आणि केसांना पांढरे होण्यापासून वाचवते. कढीपत्त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या कूपांना नव्याने वाढ होण्यास मदत करतात. 

हे तेल बनवण्यासाठी अर्धी वाटी शुद्ध नारळाचे तेल, १ मोठा चमचा मेथी दाणे आणि १० ते १२ कढीपत्त्याची पाने लागतील. एका छोट्याशा कढईत नारळाचे तेल कोमट गरम करा. त्यात मेथी दाणे काळे होत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजू द्या. नंतर कढीपत्ता घालून मंद आचेवर तेल उकळा. तेल थंड झाल्यानंतर गाळून काचेच्या बाटतील भरुन ठेवा. आठवड्यातून किमान दोनदा हे तेल कोमट करुन केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. किमान २ तास किंवा रात्रभर हे तेल केसांना राहू द्या नंतर शाम्पूने केस धुवा. 

या तेलात मसाज केल्याने टाळूवरील रक्ताभिसरण सुधारण्यात मदत होईल आणि केसांची वेगाने वाढ होते. तसेच आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ देखील असायला हवे. केस ओले असताना त्यांची मुळे नाजूक असतात, अशा वेळी विंचरल्याने जास्त केस गळतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Stop hair fall: Mix these two ingredients in coconut oil!

Web Summary : Hair fall is a common problem. Coconut oil with fenugreek seeds and curry leaves strengthens hair roots. Regular use can show results in a month. Protein-rich diet is also important for hair health.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी