Lokmat Sakhi >Beauty > केस फार गळतात? टक्कल पडण्यापूर्वी खा 'हा' काळा लाडू, महिन्याभरात केसांची भराभर वाढ- होतील दाट

केस फार गळतात? टक्कल पडण्यापूर्वी खा 'हा' काळा लाडू, महिन्याभरात केसांची भराभर वाढ- होतील दाट

Hair fall remedy: Natural hair growth tips: Black laddu benefits for hair: केसांना पोषण मिळण्यासाठी हा घरगुती लाडू नक्की ट्राय करुन बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 12:05 IST2025-08-14T12:03:24+5:302025-08-14T12:05:51+5:30

Hair fall remedy: Natural hair growth tips: Black laddu benefits for hair: केसांना पोषण मिळण्यासाठी हा घरगुती लाडू नक्की ट्राय करुन बघा.

How to stop excessive hair fall naturally at Home Black laddu recipe for faster hair growth Ayurvedic foods to prevent hair thickness | केस फार गळतात? टक्कल पडण्यापूर्वी खा 'हा' काळा लाडू, महिन्याभरात केसांची भराभर वाढ- होतील दाट

केस फार गळतात? टक्कल पडण्यापूर्वी खा 'हा' काळा लाडू, महिन्याभरात केसांची भराभर वाढ- होतील दाट

आपलेही केस सुंदर, लांब आणि घनदाट असावेत असं प्रत्येक स्त्रीला वाटतं असतं.(Hair falls Issue) केस जितेक लांबसडक तितकं रुप सुंदर असं म्हटलं जातं.(Hair care Tips) केस लांब असले की, विविध हेअरस्टाइल करता येतात. केसांसाठी पिना, गजरा किंवा विविध गोष्टी वापरता येतात.(Hair fall remedy) पण सध्या केसगळतीची समस्या अगदी लहान वयात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.(Natural hair growth tips) यामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होतोय.(Black laddu benefits for hair) बदलेली जीवनशैली, असंतुलित आहार, ताण-तणाव, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांचा अतिरेक यामुळे केसांच्या मुळांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही.(Prevent baldness naturally) केसांना आतून पोषण मिळणे जास्त महत्त्वाचे आहे. 


केसगळती वाढली की केस जास्त प्रमाणात विरळ होतात, टक्कल पडण्याची भीती जास्त प्रमाणात असते. इतकेच नाही तर केस गळाल्यामुळे कपाळही मोठ दिसू लागतं. अशावेळी आपण काही घरगुती उपाय करुन बघतो. तेल लावतो आहारात काही बदल करतो. पण केसगळती काही थांबत नाही. पण रोज सकाळी रिकाम्या पोटी हा काळा लाडू खाल्ल्यास आपल्या केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळेल. घरच्या घरी तयार करता येणारा पौष्टिक लाडू कसा बनवायचा पाहूया. 

मसूर डाळीचा फेस पॅक! 'या' पद्धतीने लावा, डेडस्किन- टॅनिंग होईल दूर, मिळेल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो..

साहित्य 

काळे तीळ - अर्धा कप 
भोपळ्याच्या बिया - अर्धा कप 
आक्रोड - अर्धा कप 
आवळा पावडर -१ चमचा 
शेवग्याचा पावडर - १ चमचा 
खजूर - १० ते १२

कृती 

सगळ्यात आधी काळे तीळ, भोपळ्याच्या बिया, आक्रोड, आवळा पावडर , शेवग्याचा पावडर आणि बियारहित खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या. याचा गोळा तयार होईल. त्याला लाडूचा आकार द्या. हा लाडू सकाळी रिकाम्या पोटी खा किंवा संध्याकाळी खाऊ शकता. दिवसातून किमान २ वेळा हा लाडू खाल्ल्यास केसगळती रोखण्यास मदत होईल. 


काळे तीळ, आक्रोड, आवळा पावडर, भोपळ्याच्या बिया आणि इतर साहित्यात मुबलक प्रमाणात प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, झिंक, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन सी आहे. जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते. हा लाडू रोज खाल्ल्याने केसांच्या मुळांना बळकटी देते, केसगळती कमी करुन नवीन केस वाढायला मदत करते. हा लाडू फक्त केसांसाठीच नाही तर एकूण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हा लाडू रोज खाल्ल्यास काही आठवड्यांमध्ये फरक दिसेल. 

Web Title: How to stop excessive hair fall naturally at Home Black laddu recipe for faster hair growth Ayurvedic foods to prevent hair thickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.