आपल्यापैकी अनेकांना नकळतपणे नखं चावण्याची वाईट सवय असते. अनेकदा आपण विचार करताना, टेन्शनमध्ये असताना किंवा अगदी आरामात बसलेले असताना, नकळतपणे आपला हात तोंडाकडे जातो आणि आपण नखं खाऊ लागतो. ही सवय दिसायला साधी वाटत असली, तरी ती केवळ तुमच्या हातांचे सौंदर्यच खराब करत नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत घातक ठरू शकते. नखांमध्ये असलेली घाण आणि जंतू तोंडातून शरीरात जाऊ शकतात, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो(ways to stop biting nails).
इतकंच नाही तर नखांची वाढ बिघडणे, नखांच्या भोवती जखमा होणे अशा समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे ही सवय वेळेत सोडणे खूप महत्त्वाचे आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना ही सवय असते. सुबक आणि निरोगी नखं तुमच्या नीटनेटकेपणाची ओळख करून देतात. पण जर तुम्हाला नखं चावण्याच्या सवयीमुळे चारचौघात लाजिरवाणे वाटत असेल, तर ही वेळ आहे स्वतःला बदलण्याची. तुमच्या हातांचे सौंदर्य पुन्हा मिळवण्यासाठी आणि ही सवय कायमची मोडण्यासाठी (how to stop biting nails naturally) काही खास टिप्स पाहूयात...
नखं चावण्याची वाईट सवय सोडण्यासाठी घरगुती उपाय...
१. सवयीची कारणे शोधा :- नखं खाण्याची सवय ही केवळ एक शारीरिक क्रिया नसून ती अनेकदा तुमच्या मानसिक स्थितीशी जोडलेली असते. ही सवय कायमची सोडवण्यासाठी तुम्हाला हे शोधणे गरजेचे आहे की, नक्की कोणत्या वेळी तुमचा हात तोंडाकडे जातो. यालाच 'ट्रिगर पॉईंट' म्हणतात. एकदा का तुम्हाला हे 'ट्रिगर्स' समजले की, तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता. तुम्ही नक्की कधी नखं खाता? टीव्ही पाहताना, कामाच्या टेन्शनमध्ये की बोर झाल्यावर? एकदा का तुम्हाला तुमची 'ट्रिगर' वेळ समजली की, त्या वेळी तुम्ही जास्त सावध राहू शकता.
२. नखांवर कडू नेल पॉलिश लावा :- बाजारात नखं चावण्याची सवय कमी करण्यासाठी बिटर नेलपॉलिश मिळते. ही कडू नेलपॉलिश नखांवर लावल्यास नखं तोंडात घातल्यावर कडू चव येते आणि ही सवय कमी होण्यास मदत होते.
बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...
३. नखं नेहमी लहान ठेवा :- नखं मोठी असतील तर ती चावण्याची इच्छा जास्त होते. त्यामुळे नखं वेळोवेळी कापून लहान आणि स्वच्छ ठेवा.
४. हात व्यस्त ठेवा :- जेव्हा नखं चावण्याची इच्छा होईल तेव्हा हातात स्ट्रेस बॉल, पेन किंवा रबर बँड धरून ठेवा, यामुळे लक्ष दुसरीकडे वळते आणि नखं चावण्याची इच्छा कमी होते.
फक्त २१ दिवस मुलांवर ओरडू नका ! दिसतील ३ बदल, करून तर पाहा 'हा' छोटासा प्रयोग...
५. एका वेळी एकाच नखावर लक्ष केंद्रित करा :- जर सवय खूप जुनी असेल, तर एकदम सर्व नखांवर नियंत्रण मिळवणं कठीण जातं. अशा वेळी ठरवा की, "मी या आठवड्यात अंगठ्याचे नख चावणार नाही." जेव्हा तुम्ही एक नख सुरक्षित ठेवता, तेव्हा मिळणारा आत्मविश्वास तुम्हाला बाकी नखं न चावण्यासाठी प्रोत्साहन देतो.
६. नखांची नियमित काळजी घ्या :- नखं स्वच्छ ठेवणे, नेल केअर करणे किंवा मॅनिक्युअर केल्यास नखं सुंदर दिसतात. त्यामुळे ती चावण्याची इच्छा कमी होते.
७. नखांचा फोटो काढा :- कुरतडलेल्या नखांचा एक जवळून फोटो काढून ठेवा. जेव्हा कधी नखं चावण्याची इच्छा होईल, तेव्हा तो फोटो पहा. आपले हात किती खराब दिसतात, याची जाणीव तुम्हाला ही सवय सोडवण्यास भाग पाडेल.
८. रबर बँड ट्रिक :- हाताच्या मनगटात एक साधा रबर बँड घाला. जेव्हा कधी तुमचं लक्ष नखांकडे जाईल किंवा हात तोंडाकडे जाईल, तेव्हा तो रबर बँड हलकासा खेचून सोडून द्या. यामुळे तुमच्या मेंदूला "नखं खाणं म्हणजे वेदना" असा संकेत मिळेल आणि वारंवार नखं चावण्याचं प्रमाण कमी होऊ लागेल.
