Lokmat Sakhi >Beauty > मेहेंदी चोपडूनही केसांना रंगच येत नाही ? 'अशी' भिजवा मेहेंदी, केस दिसतील कलर केल्यासार‌खे सुंदर...

मेहेंदी चोपडूनही केसांना रंगच येत नाही ? 'अशी' भिजवा मेहेंदी, केस दिसतील कलर केल्यासार‌खे सुंदर...

How to soak mehendi for better hair colour : how to soak mehendi for hair : best way to soak henna for dark hair colour : how to prepare henna for hair colouring : केसांना मेहेंदी लावण्यापूर्वी ती कशी भिजवावी आणि त्यात कोणते सिक्रेट पदार्थ घालावेत ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 17:51 IST2025-09-10T17:36:51+5:302025-09-10T17:51:50+5:30

How to soak mehendi for better hair colour : how to soak mehendi for hair : best way to soak henna for dark hair colour : how to prepare henna for hair colouring : केसांना मेहेंदी लावण्यापूर्वी ती कशी भिजवावी आणि त्यात कोणते सिक्रेट पदार्थ घालावेत ते पाहा...

How to soak mehendi for better hair colour how to soak mehendi for hair best way to soak henna for dark hair colour how to prepare henna for hair colouring | मेहेंदी चोपडूनही केसांना रंगच येत नाही ? 'अशी' भिजवा मेहेंदी, केस दिसतील कलर केल्यासार‌खे सुंदर...

मेहेंदी चोपडूनही केसांना रंगच येत नाही ? 'अशी' भिजवा मेहेंदी, केस दिसतील कलर केल्यासार‌खे सुंदर...

केस पांढरे पडून जास्त प्रमाणांत पिकू लागले की, आपण हमखास केसांना रंगरंगोटी करतो. पिकलेले केस लपवण्यासाठी आपण केसांवर आर्टिफिशियल रंग किंवा (How to soak mehendi for better hair colour) डाय लावतोच. परंतु या सगळ्या हानिकारक व आर्टिफिशियल उपायांपेक्षा केसांना मेहेंदी लावण्याचा नैसर्गिक पर्याय कधीही उत्तमच केसांना नैसर्गिक आणि गडद रंग देण्यासाठी मेहेंदीचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. केमिकलयुक्त (how to soak mehendi for hair) हेअर डायऐवजी अनेकजण मेहेंदीला प्राधान्य देतात. पण बऱ्याचदा मेहेंदी (best way to soak henna for dark hair colour) लावल्यावर केसांवर हवा तसा रंग येत नाही किंवा तो जास्त काळ टिकत नाही. असे होण्यामागचे कारण म्हणजे मेहेंदी योग्य पद्धतीने न भिजवणे. मेहेंदी फक्त पाण्यात भिजवून लावणे पुरेसे नसते. केसांना सुंदर आणि गडद रंग येण्यासाठी ती विशिष्ट पद्धतीने भिजवणे गरजेचे असते(how to prepare henna for hair colouring).

केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी मेहेंदी आजही लोकप्रिय आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. मात्र, मेहेंदी फक्त केसांवर नुसती लावून चालत नाही तर ती योग्य पद्धतीने भिजवली तरच तिचा रंग केसांवर खुलतो आणि टिकून राहतो. आपण मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही खास ट्रिक्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे केसांवर मेहेंदीचा (how to prepare henna for hair colouring) नैसर्गिक, गडद आणि दीर्घकाळ टिकून राहणारा रंग येण्यास मदत होईल. केसांना मेहेंदी लावण्यापूर्वी ती नेमकी कोणत्या पद्धतीने भिजवावी आणि त्यात कोणते सिक्रेट पदार्थ घालावेत ते पाहूयात.. 

केसांवर रंग येण्यासाठी मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत... 

१. मेहेंदी नेहमी लोखंडी भांड्यात किंवा कढईत भिजवा. लोखंडामुळे मेहेंदीचा रंग अधिक गडद आणि काळा होतो.

२. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात २ चमचे चहा पावडर आणि १ चमचा कॉफी पावडर घालून चांगले उकळा. हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या. हे पाणी मेहेंदी भिजवण्यासाठी वापरल्याने केसांना गडद तपकिरी रंग येतो.

Long Sleeves Blouse Design : लांब बाह्यांच्या ब्लाऊजच्या पाहा ८ खास डिझाइन्स, दिसाल एकदम स्टायलिश...

३. लोखंडी भांड्यात मेहेंदी पावडर घ्या आणि तयार केलेले चहा-कॉफीचे पाणी हळूहळू घालून मिक्स करा. यात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या.

४. आपण या मेहेंदी पावडरमध्ये आवळा पावडर आणि २ टेबलस्पून खोबरेल तेल देखील मिसळू शकता. या खास दोन घटकांमुळे केसांवर मेहेंदी योग्य प्रकारे लागते आणि रंग देखील गडद येण्यास मदत होते. 

भारती सिंग केसांना लावते घरगुती तेल! केस होतील लांबसडक, घनदाट - पाहा हेअर केअर सिक्रेट... 

५. मिश्रण तयार झाल्यावर त्यात १ चमचा लिंबाचा रस आणि २ ते ३ चमचे दही घाला. लिंबाचा रस केसांना चमक देतो, तर दही केसांची निगा राखते आणि त्यांना कोरडे होण्यापासून वाचवते. 

६. हे मिश्रण चांगले मिक्स करून रात्रभर झाकून ठेवा. यामुळे सर्व घटक चांगले मिसळतात आणि मेहेंदीचा रंग गडद होतो.

या पद्धतीने भिजवलेली मेहेंदी लावल्याने तुमच्या केसांवर आकर्षक रंग तर येईलच, पण केस मुलायम आणि चमकदार देखील होतील.

Web Title: How to soak mehendi for better hair colour how to soak mehendi for hair best way to soak henna for dark hair colour how to prepare henna for hair colouring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.