Lokmat Sakhi >Beauty > पांढऱ्या केसांना 'या' पद्धतीने लावा घरगुती तेल! होतील काळेभोर घनदाट - एकही पांढरा केस दिसणार नाही...

पांढऱ्या केसांना 'या' पद्धतीने लावा घरगुती तेल! होतील काळेभोर घनदाट - एकही पांढरा केस दिसणार नाही...

homemade hair oil to convert white hair to black naturally : natural hair oil for premature white hair : hair oil for white to black hair : home remedy oil for white hair to black : how to reverse white hair naturally with oil : ऐन तारुण्यात केस झाले पांढरे, लपवू नका - वापरा खास आयुर्वेदिक घरगुती तेल - पांढरे केस होतील कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2025 14:08 IST2025-09-24T13:55:15+5:302025-09-24T14:08:53+5:30

homemade hair oil to convert white hair to black naturally : natural hair oil for premature white hair : hair oil for white to black hair : home remedy oil for white hair to black : how to reverse white hair naturally with oil : ऐन तारुण्यात केस झाले पांढरे, लपवू नका - वापरा खास आयुर्वेदिक घरगुती तेल - पांढरे केस होतील कमी...

how to reverse white hair naturally with oil homemade hair oil to convert white hair to black naturally home remedy oil for white hair to black | पांढऱ्या केसांना 'या' पद्धतीने लावा घरगुती तेल! होतील काळेभोर घनदाट - एकही पांढरा केस दिसणार नाही...

पांढऱ्या केसांना 'या' पद्धतीने लावा घरगुती तेल! होतील काळेभोर घनदाट - एकही पांढरा केस दिसणार नाही...

केस अकाली पांढरे होण्याची समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे. वयोमानानुसार केस पांढरे होणे सहाजिक आहेच, परंतु सध्या ऐन तारुण्यात देखील अनेकांचे केस पांढरे होऊ लागतात. केस पांढरे होण्यासोबतच, केस गळणे, कोंडा होणे, केसांची वाढ खुंटणे आशा केसांच्या अनेक समस्या देखील (home remedy oil for white hair to black) त्रासदायकच वाटतात. केस अकाली पांढरे झाल्याने काहीवेळा आपल्याला खूपच लाजिरवाणे वाटते. ऐन तारुण्यात केस पांढरे होऊ लागल्यावर आपण ते लपवण्यासाठी (homemade hair oil to convert white hair to black naturally) हेअर कलर, डाय, मेहेंदी असे अनेक उपाय हमखास करून पाहतो. परंतु या उपायांमुळे केस काही काळापुरतेच सुंदर दिसतात, एकदा का केसांवरील आर्टिफिशियल काळा रंग उडाला की ते पुन्हा होते तसेच पांढरे दिसू लागतात(natural hair oil for premature white hair).

पांढरे केस लपवण्यासाठी अनेक उपाय करण्यापेक्षा एकच ठोस उपाय करणे कधीही उत्तमच. पांढरे केस काळे करण्यासाठी घरच्याघरीच नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने घरगुती तेल तयार करू शकतो. बाजारातील केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्सपेक्षा नैसर्गिक घटकांनी बनवलेलं घरगुती तेल केसांसाठी जास्त फायदेशीर ठरतं. हे तेल फक्त पांढरे केस काळे करण्यासाठीच मदत करत नाही तर केसांची मजबुती, वाढ आणि एकूणच केसांचे आरोग्य सुधारण्यास देखील फायदेशीर ठरतं. 

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय... 

नुकतेच डॉ. जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, जर तुमचे केसही अकाली पांढरे होत असतील, तर तुम्ही घरी एक खास हेअर ऑइल बनवून लावू शकता. या तेलात आवळा, कडीपत्ता आणि भृंगराज अशा तीन आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर होतो. 

कंगव्यात केसांचा गुंता पाहवत नाही? ‘असा’ करा कडीपत्त्यांच्या पानांचा अँटी-हेअरफॉल स्प्रे, केसगळतीवर उपाय...

खोबरेल तेलात ठेवा बाल्कनीतल्या औषधी रोपांची २ पाने! लावताच दिसेल फरक, लांब-दाट होतील केस...

केस होतील काळेभोर असे आयुर्वेदिक घरगुती तेल... 

एक कप खोबरेल तेल घ्या. त्यात २ चमचे सुकलेल्या आवळ्याचे तुकडे घाला. त्यानंतर तेलामध्ये एक मूठभर ताजा कडीपत्ता घाला. २ चमचे भृंगराज पावडर मिसळा. हे मिश्रण मंद आचेवर तोपर्यंत शिजवा, जोपर्यंत आवळा आणि कडीपत्ता काळा होत नाही. हे सर्व झाल्यावर तेल तयार होईल ते गाळून थंड करून घ्या.

 तेल केसांवर कसे लावून घ्यावे ? 

डॉ. जैदी हे तेल आठवड्यातून ३ वेळा केसांच्या मुळाशी लावण्याचा सल्ला देतात. तेल लावून रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. 

आहार आणि लाईफस्टाईमध्ये बदल करणे गरजेचे... 

आयुर्वेदिक तज्ज्ञ पुढे सांगतात की, फक्त तेल लावल्याने फरक पडणार नाही, तर आहाराची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. रोज सकाळी एक चमचा भाजलेले काळे तीळ आणि एक ग्लास आवळा ज्यूस प्या. त्याचबरोबर, तुमच्या आहारात खजूर, बदाम आणि पालक यांसारख्या पदार्थांचा समावेश करा, कारण यात व्हिटॅमिन बी१२, लोह आणि कॉपर भरपूर प्रमाणात असते. हे घटक केस पांढरे होणे थांबवतात आणि त्यांना मुळांपासून मजबूत करतात. डॉ. जैदी यांच्या मते, जर तुमचे केस कमी वयात स्ट्रेस किंवा पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे पांढरे झाले असतील, तर या उपायाने तुम्हाला केसांवर चांगले परिणाम दिसू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही या तेलाचा वापर करून केस निरोगी, चमकदार आणि मजबूत नक्कीच बनवू शकता आणि केस पांढरे होण्याचा वेग कमी करू शकता.

Web Title: how to reverse white hair naturally with oil homemade hair oil to convert white hair to black naturally home remedy oil for white hair to black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.