Lokmat Sakhi >Beauty > डोक्यावर पांढरेच केस जास्त दिसतात ? करुन पाहा १ घरगुती नॅचरल उपाय, डाय, मेहेंदी, कलरही होतील फेल...

डोक्यावर पांढरेच केस जास्त दिसतात ? करुन पाहा १ घरगुती नॅचरल उपाय, डाय, मेहेंदी, कलरही होतील फेल...

How to Reverse Grey Hair Naturally : White Hair to Black Hair Naturally : How To Get Black Hair Naturally One Home Remedy : पांढरे केस रंगवण्यासाठी आता डाय, मेहेंदी, कलर विसरून जा, करा अस्सल घरगुती देशी उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 17:35 IST2024-12-17T17:29:21+5:302024-12-17T17:35:06+5:30

How to Reverse Grey Hair Naturally : White Hair to Black Hair Naturally : How To Get Black Hair Naturally One Home Remedy : पांढरे केस रंगवण्यासाठी आता डाय, मेहेंदी, कलर विसरून जा, करा अस्सल घरगुती देशी उपाय...

How to Reverse Grey Hair Naturally White Hair to Black Hair Naturally How To Get Black Hair Naturally One Home Remedy | डोक्यावर पांढरेच केस जास्त दिसतात ? करुन पाहा १ घरगुती नॅचरल उपाय, डाय, मेहेंदी, कलरही होतील फेल...

डोक्यावर पांढरेच केस जास्त दिसतात ? करुन पाहा १ घरगुती नॅचरल उपाय, डाय, मेहेंदी, कलरही होतील फेल...

आजकाल बहुतेकजणांना पांढऱ्या केसांची समस्या सतावते. काहीजणांचे तर ऐन तरुण वयात अकाली केस पांढरे होतात. आपले वय वाढलेले असो किंवा नसो पण पांढरे केस कुणालाच आवडत नाहीत. मग अशावेळी पांढरे झालेले केस लपवण्यासाठी (How to Reverse Grey Hair Naturally) केसांवर अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात. कुणी केसांना मेहेंदी (White Hair to Black Hair Naturally) लावत तर कुणी डाय, यासोबतच काहीवेळा केसांना काळ्या किंवा इतर रंगाने रंगवून देखील केसांचा पांढरेपणा लपवला जातो. परंतु केसांचा पांढरेपणा लपवण्यासाठी असे अनेक उपाय करूनही काहीवेळा त्याचा काहीच फायदा होत नाही. केसांना मेहेंदी, डाय किंवा कलर केल्याने आपले केस पुढे काही दिवसच काळे दिसतात, त्यानंतर काही दिवसांतच केस पुन्हा 'जैसे थे' याच अवस्थेत येतात(How To Get Black Hair Naturally One Home Remedy).

केसांना कितीही भारी डाय, कलर किंवा मेहेंदी लावली तरीही थोड्या दिवसानंतर केसांचा आर्टिफिशियल रंग उडून केस परत पाहिल्यासारखे पांढरे दिसू लागतात. अशावेळी या आर्टिफिशियल उपायांपेक्षा घरगुती उपाय करणे अधिक फायदेशीर ठरते. पांढऱ्या केसांसाठी घरगुती उपाय करताना आपण नैसर्गिक पदार्थांचा वापर करून घरच्याघरीच केमिकल्स फ्री नॅचरल डाय तयार करु शकतो. ही नॅचरल डाय तयार करताना सगळ्या नैसर्गिक पदार्थांचा वापर केला असल्याने केसांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. याउलट, या नैसर्गिक पदार्थांमधील औषधी गुणधर्म देखील आपल्या केसांना मिळून केस अधिक मजबूत आणि घनदाट, काळेभोर होतात.

साहित्य :- 

१. मेहेंदी पावडर - ३ ते ५ टेबलस्पून 
२. आवळा पावडर - २ टेबलस्पून 
३. भृंगराज पावडर - १ टेबलस्पून 
४. कडीपत्ता पावडर - १ टेबलस्पून 
५. शिकेकाई पावडर - १ टेबलस्पून 
६. काळ्या चहाचे पाणी - १ कप 
७. खोबरेल तेल - २ टेबलस्पून 
८. बीट - १ कप (बीट उकडवून त्याचे पाणी घ्यावे)

थंडीच्या दिवसांत त्वचेला एलोवेरा जेल लावावे की लावू नये ? ही पहा योग्य पद्धत...


हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एक मोठी लोखंडाची कढई किंवा मोठा बाऊल घ्यावा. 
२. आता या कढईत मेहेंदी पावडर, भृंगराज पावडर, कडीपत्ता पावडर, शिकेकाई पावडर, काळ्या चहाचे पाणी, खोबरेल तेल आणि बीट उकडवून त्याचे पाणी घ्यावे. 

आलिया भट म्हणते, मी वापरतच नाही फाऊंडेशन कधीच! तिच्यासारख्या लूकसाठी करा ४ गोष्टी...

३. आता कढईत हे सगळे जिन्नस एकत्रित करुन रात्रभर लोखंडाच्या कढईत भिजत ठेवा. 
४. आता दुसऱ्या दिवशी ब्रशच्या मदतीने हे घरगुती नॅचरल हेअर डाय केसांवर लावून ३ तासांसाठी केसांवर असेच लावून ठेवावे. 
५. ३ तासानंतर केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. 

हा घरगुती नैसर्गिक उपाय केल्याने आपल्याला पांढरे केस रंगवण्यासाठी डाय, मेहेंदी, कलर यांसारखे आर्टिफिशियल उपाय करण्याची गरज भासणार नाही. यासोबतच या नॅचरल हेअर डाय मधील सगळे पदार्थ हे नैसर्गिक असल्याने केसांना काळा रंग देण्यासोबतच, केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी देखील अधिक फायदेशीर ठरते.

Web Title: How to Reverse Grey Hair Naturally White Hair to Black Hair Naturally How To Get Black Hair Naturally One Home Remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.