Join us
Daily Top 2Weekly Top 5

केसात भरमसाठ कोंडा, खांद्यावर पडतो? १० रुपयांचे मेथी दाणे करतील जादू, चिकट टाळू राहील स्वच्छ- कोंडा कायमचा जाईल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2026 17:11 IST

dandruff treatment: fenugreek seeds for dandruff: home remedy for dandruff: केसातील कोंडा कमी करण्यासाठी मेथी दाण्याचा उपयोग कसा करायचा.

ऋतू कोणताही असला तरी केसांत कोंडा होण्याची समस्या ही अनेकांसाठी डोकेदुखीची ठरते. महागडे अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरूनही अनेकदा हा कोंडा जात नाही आणि पांढरे पापुद्रे खांद्यावर पडल्यामुळे लोकांसमोर ओशाळवाणे वाटते.(dandruff treatment) केस विंचरताना, कपडे घालताना किंवा ऑफिसमध्ये बसले असताना खांद्यावर दिसणारा कोंडा आपला आत्मविश्वास कमी करतात.(home remedy for dandruff) कितीही महाग शाम्पू, अँटी-डँड्रफ लोशन वापरली तरी कोंडा परत परत येतो. टाळू चिकट होतो, खाज सुटते आणि केस गळतीही वाढते. अशा वेळी घरात सहज मिळणारा, अगदी १० रुपयांत मिळणारा एक उपाय तो म्हणजे मेथी दाणे. (fenugreek seeds for dandruff)मेथी दाण्यांमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे घटक टाळूवरील बुरशी नष्ट करण्यास मदत करतात, जी कोंड्याचं मुख्य कारण असते. याशिवाय मेथीमध्ये प्रथिने, निकोटिनिक अ‍ॅसिड आणि लेसिथिन असतं, जे टाळूला पोषण देतं आणि केसांची मुळे मजबूत करतं. त्यामुळे केवळ कोंडा कमी होत नाही, तर केसांचं आरोग्यही सुधारतं.

फेसपॅक लावताना ३ चुका करतात चेहरा कायमचा खराब, सुरकुत्याही वाढतात! म्हाताऱ्या दिसताय तुम्ही..

डोक्यातील कोंडा हा तेलकट केसांमुळे, केस वारंवार न धुण्यामुळे किंवा जास्त तेलकटपणामुळे तसेच इतर उत्पादनांचा वापर केल्याने होतो. यामुळे डोक्यातील कोंड्यात खवले तयार होतात, ज्यामुळे अनेकदा खाज सुटते आणि लालसरपणा येतो. पण यावर १० रुपयांचा मेथी दाण्याचा घरगुती उपाय करु शकतो. 

केसांतील कोंडा घालवण्यासाठी आपल्याला २ ते ३ चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजवावे लागतील. दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमध्ये बारीक करुन पेस्ट तयार करा. यात २ चमचे दही मिसळून हेअर पॅक तयार करा. हा हेअर मास्क केसांना लावा. हा पॅक हातांच्या मदतीने टाळूवर लावा. नंतर टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. ३० मिनिटे लावल्यानंतर केस पाण्याने धुवा. आठवड्यातून १ ते २ वेळा लावल्यास कोंड्याची समस्या कमी होताना दिसेल.

महागड्या केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी अशा नैसर्गिक उपायांनी केसांची काळजी घेतल्यास कोंड्यापासून मुक्ती मिळेल. टाळू स्वच्छ, निरोगी आणि केस अधिक मजबूत बनवते. कोंडा कमी होण्यास मदत करेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fenugreek seeds for dandruff: A simple home remedy that works.

Web Summary : Struggling with dandruff? Fenugreek seeds, with their antifungal properties, offer a natural and affordable solution. Use a fenugreek and curd hair pack for a clean scalp and reduced dandruff. Regular use promotes healthier, stronger hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी