Join us
Daily Top 2Weekly Top 5

केसांत भरमसाठ कोंडा-कायम तेलकट चिप्प दिसतात? शाम्पूमध्ये मिसळा २ गोष्टी; एका धुण्यात हेअरस्पापेक्षा भारी फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 15:18 IST

Best tips for dandruff free hair: How to fix oily hair naturally: हा घरगुती 'स्कॅल्प डिटॉक्स' आहे जो पहिल्याच वॉशमध्ये आपली टाळू पूर्णपणे स्वच्छ करेल, कोंडा घालवेल आणि केसांच्या मुळांना नव्याने वाढण्यास मदत करेल.

केसांच्या अनेक समस्यांपैकी कोंडा आणि तेलकटपणा या दोन अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे आपण हैराण होतो. अनेकदा केस धुतल्यानंतर ते काही तासांतच पुन्हा चिकट आणि तेलकट दिसू लागतात. तर कधी खाज सुटणाऱ्या कोंड्यामुळे कपड्यांवर पांढरे कण पडू लागतात.(Best tips for dandruff free hair) या समस्यांमुळे केवळ केसांचे सौंदर्यच खराब होत नाही, तर केसांची वाढही खुंटते. टाळूची छिद्रे घाण आणि तेलामुळे बंद झाल्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळत नाही. (How to fix oily hair naturally)यावेळी आपण महागडे अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरतो, पण त्यांचा परिणाम तात्पुरता असतो. जर आपल्यालाही या समस्यांवर कायमस्वरूपी आणि नैसर्गिक उपाय हवा असेल, तर आपल्या रोजच्या शाम्पूमध्ये फक्त दोन खास गोष्टी मिसळून पाहा.(Hair growth and dandruff control tips) हा घरगुती 'स्कॅल्प डिटॉक्स' आहे जो पहिल्याच वॉशमध्ये आपली टाळू पूर्णपणे स्वच्छ करेल, कोंडा घालवेल आणि केसांच्या मुळांना नव्याने वाढण्यास मदत करेल. जेव्हा आपली टाळू स्वच्छ असते, तेव्हाच केसांची वाढ मुळापासून वेगाने होते. पाहूया शाम्पूमध्ये काय मिसळून केसांना लावायला हवं. 

२०२६ स्पेशल स्लिव्ह्ज डिझाइन, ब्लाऊजच्या ७ प्रकारच्या बाह्या दिसतात इतक्या सुंदर की रोज नेसावीशी वाटेल साडी

कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांचे गळणे आणि तुटणे थांबवते, तर आल्यामधील जिंगेरॉल (Gingerol) टाळूचा रक्तप्रवाह सुधारते. या नैसर्गिक उपचारामुळे महागड्या 'हेअर ट्रान्सप्लांट' किंवा 'प्रोटिन ट्रिटमेंट'ची गरज उरत नाही. जर आपल्यालाही केस मुळापासून मजबूत आणि दाट हवे असतील, तर हा घरगुती शाम्पू केसांना लावून पहा. 

आल्यामध्ये दाहशामक (Anti-inflammatory) आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात. जेव्हा आल्याचा रस शाम्पूमध्ये मिसळला जातो, तेव्हा तो टाळूवरील रक्ताभिसरण वाढवतो. यामुळे केसांच्या मुळांना अधिक ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात, ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होण्यास मदत होते. 

कांद्यातील सल्फर कोलेजन वाढवण्यास मदत करते. जे केसांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. यामुळे केस गळती थांबते आणि टक्कल पडलेल्या जागीही नव्याने केस येण्यास सुरुवात होते. 

यासाठी आपल्याला १ छोटा आल्याचा तुकडा, १ कांदा आणि रोज वापरला जाणारा शाम्पू लागेल. आल्याचा तुकडा किसून त्याचा रस काढा. कांदा वाटून त्याची बारीक पेस्ट करा किंवा कापडातून गाळून त्याचा रस घ्या. एका वाटीत चमचाभर शाम्पू घ्या, त्यात १ चमचा आल्याचा रस आणि २ चमचे कांद्याचा रस मिसळा. ओल्यावर केसांवर हे मिश्रण लावा आणि ५ ते १० मिनिटे हाताच्या बोटांनी टाळूवर मसाज करा. त्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. कांद्याचा उग्र वास घालवण्यासाठी आपण कंडिशनर वापरू शकतो. या उपायांमुळे केसांची मुळे घट्ट होतील आणि केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dandruff and oily hair fix: Mix these in shampoo for relief.

Web Summary : Struggling with dandruff and oily hair? This natural scalp detox, using ginger and onion juice mixed with shampoo, promises a clean scalp, reduced dandruff, and stimulated hair growth from the first wash. It strengthens hair roots and reduces hair fall.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी