Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > टक्कल पडलेल्या जागी केस उगवतील नव्याने; १० रुपयांचा घरगुती उपाय, वयाच्या पन्नाशीतही केस लांबसडक-घनदाट, वाढतील भरपूर

टक्कल पडलेल्या जागी केस उगवतील नव्याने; १० रुपयांचा घरगुती उपाय, वयाच्या पन्नाशीतही केस लांबसडक-घनदाट, वाढतील भरपूर

home remedy for hair regrowth: home remedy for hair regrowth: hair growth tips at home: आपल्या आयुर्वेदात आणि स्वयंपाकघरात असे काही घटक दडलेले आहेत, जे आपल्या केसांच्या मुळांना पुन्हा जिवंत करण्यास मदत करतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2026 15:10 IST2026-01-25T14:04:01+5:302026-01-26T15:10:48+5:30

home remedy for hair regrowth: home remedy for hair regrowth: hair growth tips at home: आपल्या आयुर्वेदात आणि स्वयंपाकघरात असे काही घटक दडलेले आहेत, जे आपल्या केसांच्या मुळांना पुन्हा जिवंत करण्यास मदत करतात.

how to regrow hair on bald patches naturally 10 rupees home remedy for hair growth coconut oil benefits natural hair regrowth after baldness hair growth tips for people above 50 ayurvedic remedy for bald spots | टक्कल पडलेल्या जागी केस उगवतील नव्याने; १० रुपयांचा घरगुती उपाय, वयाच्या पन्नाशीतही केस लांबसडक-घनदाट, वाढतील भरपूर

टक्कल पडलेल्या जागी केस उगवतील नव्याने; १० रुपयांचा घरगुती उपाय, वयाच्या पन्नाशीतही केस लांबसडक-घनदाट, वाढतील भरपूर

वय वाढतं तसं केस गळणं, विरळ होणं किंवा काही भागांमध्ये टक्कल पडणं ही समस्या अनेकांना सतावते. पन्नाशीनंतर केसांची घनता कमी झाल्यामुळे आत्मविश्वासही कमी होतो.(home remedy for hair regrowth) बाजारात यावर अनेक महागडे टॉनिक, तेलं आणि ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, पण त्यांचा खर्च सर्वांनाच परवडतो असं नाही. (home remedy for hair regrowth)
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, वाढते प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे केस गळणं ही एक जागतिक समस्या बनली आहे. अनेकदा वय वाढू लागलं की डोक्यावर विरळ जागा दिसू लागते, टक्कल पडते. महागडे हेअर ट्रान्सप्लांट किंवा महागडी सिरम्स प्रत्येकाला परवडणारी नसतात. पण, आपल्या आयुर्वेदात आणि स्वयंपाकघरात असे काही घटक दडलेले आहेत, जे आपल्या केसांच्या मुळांना पुन्हा जिवंत करण्यास मदत करतात. त्यातीलच एक नारळाचे तेल. नारळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. फक्त ते योग्य पद्धतीने वापरल्यास आपल्या केसांना भरपूर फायदा होतो. 

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा खास पदार्थ, आयुर्वेदिक देसी उपाय- डार्क सर्कल, फोड होतील गायब

तांदळाचे पाणी नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावल्याने केस वाढण्यास मदत होते. ज्यामुळे केस जाड दिसतात. हे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला रात्रभर तांदूळ भिजवावा लागेल. यानंतर तांदूळ शिजवून त्याचे पाणी केसांसाठी वापरु शकता. त्यात तेल मिसळून केसांना लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. 

कांद्याच्या रसात नारळाचे तेल मिसळून लावा. यामुळे पातळ झालेल्या टाळूवर केसांची वाढ होण्यास मदत होईल. कांदा सोलून किसून घ्या. तो कापडात ठेवा आणि पिळून घ्या. ज्यामुळे रस निघेल. यात नारळाचे तेल मिसळून केसांना लावा. टाळूला पोषण मिळेल आणि केस वाढण्यास मदत होईल. 

मेथीच्या दाण्यांची पेस्ट नारळाच्या तेलात मिसळून लावल्यास केस रेशमी, मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. या उपायासाठी मेथीच्या दाण्यांची बारीक पेस्ट करा. ही पेस्ट नारळाच्या तेलात लावल्याने आपले केस लांब आणि दाट होण्यास मदत होईल. 

नारळाच्या तेलात कलोंजी मिसळून लावल्याने केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. हे तेल केसांच्या मुळांना आणि टाळूला लावल्यास फरक पाहायला मिळतो. नारळाचे तेल केसांना आवश्यक पोषण देते. यामुळे केस मजबूत होतात. केसांना चमक येते आणि केसांतील कोंडा देखील कमी होतो. 

 


Web Title : प्राकृतिक रूप से बाल दोबारा उगाएं: घने बालों के लिए 10 रुपये का घरेलू उपाय

Web Summary : नारियल तेल को चावल के पानी, प्याज के रस, मेथी या कलौंजी के साथ मिलाकर बालों के झड़ने से लड़ें। ये खोपड़ी को पोषण देते हैं, बालों के विकास को बढ़ावा देते हैं और रूसी को कम करते हैं, जिसके परिणामस्वरूप बाल घने और स्वस्थ होते हैं।

Web Title : Regrow Hair Naturally: 10 Rupee Home Remedy for Thick Hair

Web Summary : Combat hair loss with simple home remedies like coconut oil mixed with rice water, onion juice, fenugreek, or kalonji. These nourish the scalp, promote hair growth, and reduce dandruff, resulting in thicker, healthier hair.