Join us

केसांची वाढ खुंटली? फक्त खोबरेल तेल कशाला? त्यात मिसळा ३ गोष्टी; महिनाभरात दिसेल रिझल्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2024 16:17 IST

How to Regrow Hair Naturally with Coconut Oil : केसांची इंचभरही वाढ होत नसेल तर, खोबरेल तेलाचा 'या' पद्धतीने वापर करा

केसांची निगा राखताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी (Coconut Oil). आजकाल बऱ्याच कारणांमुळे केस गळतात. केसांची सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी (Hair Care tips). केसांना तेल लावणे, केस स्वच्छ धुणे, केसांवर घरगुती उत्पादनांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते (Hair fall). खोबरेल तेल केसांसाठी फायदेशीर ठरू शकते.

खोबरेल तेलात व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ होते. पण केसांसाठी फक्त खोबरेल तेल पुरेसं नाही. त्यात ४ गोष्टी मिसळा. यामुळे नक्कीच केसांना फायदा होईल(How to Regrow Hair Naturally with Coconut Oil).

केसांसाठी फक्त खोबरेल तेल पुरेसं नाही, त्यात मिसळा ४ गोष्टी

खोबरेल तेल आणि मेथी दाणे

खोबरेल तेल आणि मेथी दाणे दोन्ही केसांसाठी फायदेशीर ठरते. खोबरेल तेल आणि मेथी दाण्यातील पौष्टीक घटक केसांना नवीन जीवनदान देतात. मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन - सी असते. जे स्काल्प क्लिन ठेवण्यास मदत करतात. मेथी दाण्यांमध्ये आयर्न देखील असते. जे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. ज्यामुळे केसांना मजबुती मिळते.

लठ्ठपणाशी फाईट करणारी ५ पेयं, थुलथुलीत पोटाची चरबी वितळलीच म्हणून समजा, वजन होईल कमी

खोबरेल तेल आणि कांद्याचा रस

कांदा फक्त फोडणीसाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आपल्या केसांच्या वाढीस मदत करतात. यामध्ये असलेले सल्फर केसांना जाड आणि चमकदार बनवते. यासाठी कांद्याचा रस खोबरेल तेलात मिसळा. हे तेल केसांच्या मुळांना लावा. नंतर केस शाम्पूने धुवा.

मान काळवंडली- घासूनही निघत नाही? टूथपेस्टचा सोपा उपाय - मान होईल स्वच्छ टॅनिंग गायब

खोबरेल तेल आणि कडीपत्ता

कडीपत्त्यामुळे केस भरभर वाढतात. त्यात प्रोटीन, बीटा-कॅरोटीन असते. यासह त्यात लोह आणि आवश्यक जीवनसत्त्वे आढळते. ज्यामुळे केसांच्या वाढीस पुरेपूर पोषण मिळते. यासाठी खोबरेल तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात कडीपत्ता घाला. काही वेळानंतर गॅस बंद करा. तेलातील कडीपत्ता गाळून या तेलाने स्काल्पवर मालिश करा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स