Join us  

चेहऱ्यावर पिगमेंटेशन, हाताचे कोपरे- अंडरआर्म्सही काळवंडले? बघा नितळ त्वचेसाठी १ आयुर्वेदिक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 1:40 PM

How To Reduce Pigmentation And Dark Spots: चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन असो की काखेतला काळेपणा, त्वचेचा काळवंडलेपणा दूर करून सौंदर्य खुलविण्यासाठी बघा १ आयुर्वेदिक उपाय (ayurvedic remedies for blackness in underarms and elbow)

ठळक मुद्देहे उपाय केल्याने चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी त्यासोबतच काखेतला काळेपणा किंवा हाताचे काळवंडलेले कोपरे स्वच्छ करण्यासाठीही फायदा होईल.

बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की त्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेतात. पण तरीही वयाचा एक विशिष्ट टप्पा आला म्हणजे साधारण पस्तिशीच्या पुढे वय सरकलं की चेहऱ्यावर पिगमेंटेशन वाढू लागतं. यासाठी काही बाह्य गोष्टीही जबाबदार असतात. गालावर, कपाळावर, हनुवटीवर, डोळ्यांच्या बाजूला अशा ठिकाणी पिगमेंटेशन वाढू लागलं की चेहरा विचित्र दिसतो (How to reduce pigmentation, dark spots on face). म्हणूनच आता २ सोपे आयुर्वेदिक उपाय पाहा. हे उपाय केल्याने चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आपल्याला मदत तर होणार आहेच. पण त्यासोबतच काखेतला काळेपणा किंवा हाताचे काळवंडलेले कोपरे स्वच्छ करण्यासाठीही त्याचा फायदा होईल. (ayurvedic remedies for blackness in underarms and elbow)

 

चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी उपाय

चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन तसेच काखेतला आणि हातांच्या कोपऱ्यावरचा काळेपणा कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी १ आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत.

ना कोणतं तेल लावायचं ना हेअरमास्क, बसल्याबसल्या १ उपाय करा- केस गळणं कायमचं बंद 

चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी अर्जून वृक्षाची पावडर दुधामध्ये कालवा आणि त्याचा लेप पिगमेंटेशनवर लावा. १० ते १२ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. अर्जून पावडर तुम्हाला तुमच्या शहरातील कोणत्याही आयुर्वेदिक औषधींच्या दुकानात मिळेल किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही ती मागवू शकता.

 

काखेतला आणि हाताच्या कोपऱ्यावरचा काळेपणा कमी करण्यासाठी उपाय

हाताचे कोपरे, पायाचे घोटे किंवा काखेतला काळेपणा घालविण्यासाठी काेणता आयुर्वेदिक उपाय करावा, हे देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

कबुतरांच्या त्रासाने वैतागलात? बाल्कनीत ५ रोपं लावा, कबुतरांना कायमचं दूर पळवणारा हिरवागार उपाय

त्यासाठी एका भांड्यात जव म्हणजेच बार्लीची पावडर, ज्येष्ठमधाची पावडर समप्रमाणात घ्या आणि त्यात दूध घालून ती कालवा. हा लेप काळवंडलेल्या हातांच्या कोपऱ्यांना, काखेत लावा आणि १० ते १५ मिनिटांनी चोळून तो धुवून टाका. एखादा महिना हा उपाय सलगपणे केल्यास त्वचा उजळ होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय