Join us

१५ दिवसांत केसगळती होते कमी, ६ चुका करणं थांबवा- केस वाढतील भराभर; कोरडेपणाही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 15:32 IST

Hair growth tips: Stop hair fall: Common hair mistakes: रोजच्या काही चुकांमुळे केसांवर कसा परिणाम होतो. केसगळती रोखण्यासाठी आपण काय करायला हवं, जाणून घेऊया.

रोज केस विंचरताना गळू लागले की आपल्याला काळजी वाटू लागते.(Hair care tips) काहींना वाटतं की, यामागे हार्मोनल बदल, अनुवंशिकता किंवा थायरॉइडचा त्रास असू शकतो.(Hair growth tips) पण यामागचं खरं कारण असतं ते आपल्या दैनंदिन सवयी.(Stop hair fall) आपण कळत नकळत अशा काही चुका करतो. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.(Common hair mistakes) केसांच्या वाढीसाठी आपण विविध तेल, शाम्पू, कंडिशनर लावतो. केस छान सुंदर दिसण्यासाठी विविध ट्रिटमेंट्स देखील घेतो. पण त्याचा केसांच्या वाढीवर परिणाम होतो. ज्यामुळे केस वाढण्याऐवजी अधिक गळतात. (Dry hair solution)ओले केस बांधणे, रात्रभर तेल लावून झोपणे, जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे, सततचा ताण किंवा फॅन्सी हेअर स्टाईलमुळे केसांची मुळे कमकुवत होतात.(Hair fall treatment) रोजच्या काही चुकांमुळे केसांवर कसा परिणाम होतो. केसगळती रोखण्यासाठी आपण काय करायला हवं, जाणून घेऊया. 

कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

केसगळती रोखण्यासाठी ६ चुका करणं थांबवा

1. केसगळती रोखण्यासाठी आपण नियमितपणे केसांना बोटांच्या मदतीने टाळूला ५ मिनिटे मालिश करायला हवी. यामुळे रक्तप्रवाह वाढेल आणि केस मुळांपासून मजबूत होतील. 

2. केस धुताना गरम पाण्याचा वापर करणं टाळा. जास्त गार पाणी देखील केसांना हानी पोहोचवते. यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. टाकीतले गरम पाणी वापरल्याने केस तुटतात, कोरडेपणा वाढतो आणि गुंतागुंतीच्या समस्या अधिक वाढतात. 

3. आपल्या रोजच्या आहारात आपण १ वाटी प्रथिने खायला हवी. आपल्या आहारात मूग, पनीर, शेंगदाणे किंवा मसूर यांचा समावेश करा. यामुळे केसगळती नैसर्गिकरित्या कमी होईल. 

4. झोपण्यासाठी उशांवर मऊ कापसाचे कव्हर वापरावेत. तसेच नियमितपणे कव्हर बदलायला विसरु नका. यामुळे उशावर बॅक्टेरिया किंवा धूळ साचत नाही आणि टाळू निरोगी राहण्यास मदत करते. 

5. केसांना मजबूत करण्यासाठी हायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे. अशावेळी आपण नियमितपणे २ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे. यामुळे केस आणि टाळू्च्या कोरड्या पडण्याची समस्या टाळता येते आणि केस मजबूत होतात. 

6. रात्री केस घट्ट बांधण्याऐवजी केसांची सैल वेणी बांधा. यामुळे केसांच्या मुळांवर कोणताही दबाव येणार नाही. आपण हे रुटीन नियमितपणे फॉलो केल्यास १५ दिवसांत केसांचं गळणं काही प्रमाणात कमी होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी