Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस धुताना खूप गुंता होतो? शाम्पू करण्याआधी करा १ बदल - तासंतास गुंता काढायची कटकट विसरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 14:05 IST

how to reduce hair breakage naturally : home remedy for rough and dry hair : apply aloe vera before washing hair : केस धुतल्यानंतर गुंता न होता ते रेशमासारखे सुटसुटीत राहावेत, यासाठी खास उपाय...

सुंदर, रेशमी केस कोणाला नको असतात? पण प्रत्यक्षात परिस्थितीत काही वेगळीच असते...केस धुतल्यानंतर त्यांचा खूप गुंता होणं ही अनेक महिलांची कॉमन समस्या आहे. शाम्पू केल्यानंतर केस कोरडे होताना ते एकमेकांत अडकतात आणि मग कंगवा करताना गुंता सोडवणं खूप कठीण होतं. अशावेळी केसांवर जोर लावून कंगवा केल्यामुळे केस तुटणे, केस गळणे किंवा स्प्लिट एंड्सची समस्या वाढू शकते. केस धुतल्यानंतर ते वाळले की त्यांचा इतका भयंकर गुंता होतो की, तो सोडवताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. कंगवा फिरवला की गुंता सुटण्याऐवजी केस तुटून हातात येतात आणि मग सुरू होते ती 'हेअर फॉल'ची न संपणारी समस्या...(how to reduce hair breakage naturally).

केस धुतले की ते स्वच्छ, सुंदर आणि मऊ होतील असं आपल्याला वाटतं, पण खरी कसरत तर केस धुतल्यानंतर सुरू होते. केस सुकले की त्यांचा असा काही  गुंता होतो, जो सोडवताना आपल्या (home remedy for rough and dry hair) नाकी नऊ येतात. आरशासमोर उभं राहून जेव्हा आपण तो गुंता सोडवायला जातो, तेव्हा कंगव्यात अडकलेले केसांचे पुंजके पाहून मन सावरत नाही. "केस धुवायचे की नाही?" असा प्रश्न पडण्याइतपत हा त्रास त्रासदायक असतो. हा गुंता सोडवताना केस फक्त तुटत नाहीत, तर आपल्या केसांचा नैसर्गिक पोतही खराब होतो. आपण महागडे शाम्पू, सीरम आणि कंडिशनर्स बदलून पाहतो, पण मूळ समस्या तशीच राहते. यासाठीच, केस धुतल्यानंतर ते रेशमासारखे सुटसुटीत राहावेत आणि कंगवा केसांतून सहज फिरावा, तर तुम्हाला तुमच्या 'हेअर वॉश रूटीन'मध्ये एक छोटासा बदल करण्याची गरज आहे. हा बदल नेमका काय आहे? आणि केस धुण्यापूर्वी (apply aloe vera before washing hair) असं काय करावं ज्यामुळे धुवून झाल्यावर गुंता होणारच नाही, असा मॅजिकल उपाय पाहा...

शाम्पू करण्यापूर्वी केसांना लावा कोरफड जेल (Aloe Vera Gel)

केसांसाठी कोरफड एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कडक, रफ, फ्रीजी आणि कोरड्या दिसणाऱ्या केसांसाठी कोरफड जेल (Aloe Vera Gel) अतिशय फायदेशीर ठरते. केस धुण्यापूर्वी केसांवर थोडंसं एलोवेरा जेल लावल्यास केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो आणि ते अधिक मऊ व स्मूथ होतात. यामुळे केस एकमेकांत अडकत नाहीत आणि धुतल्यानंतर कंगवा करताना गुंता सहज सुटतो. ही छोटीशी ट्रिक वापरल्यास केस कमी तुटतात आणि केस अधिक हेल्दी, चमकदार व मॅनेजेबल दिसतात.

साधी साडी शंभरपट सुंदर करणारे ब्लाऊजचे १० लोटस पॅटर्न, इतके देखणे ब्लाऊज की स्टाइलच बदलून जाईल तुमची...

जर तुमच्या घरी कोरफडीचे रोप असेल, तर त्यातील एक जाड आणि जेलने भरलेल पान तोडून घ्या. आता पानाचे दोन्ही बाजूचे काटे आणि वरचे हिरवे साल काढून टाका. कोरफडीचे पान वरून हिरवे असले तरी आतमध्ये पांढऱ्या रंगाचे जेल असते. चमच्याच्या साहाय्याने हे सर्व जेल काढून घ्या आणि मिक्सरमध्ये फिरवून त्याची एक मऊ पेस्ट तयार करा.

असा करा कोरफड जेलचा वापर... 

ज्या दिवशी केस धुवायचे असतील, त्याच्या काही तास आधी केसांना व्यवस्थित कोरफड जेल लावा. केसांच्या मुळांपासून (Scalp) ते टोकांपर्यंत पूर्ण केसांना जेलने कव्हर करा. जेल लावल्यानंतर शॉवर कॅप घाला किंवा केस तसेच बांधून ठेवा. साधारण १ तास जेल केसांवर राहू द्या. १ तासानंतर कोणत्याही सौम्य (Mild) शाम्पूने केस स्वच्छ धुवा.

वेणी दिसते पातळ दोरीसारखी नाजूक ? केसांचा विरळपणा कमी करणारं घरगुती तेल - केसगळती थांबून वेणीही दिसेल जाडजूड... 

आठवड्यातून किमान २ वेळा हा उपाय नक्की करा. यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतील, तसेच केस गळण्याची समस्याही कमी होण्यास मदत होईल. इतकंच नाही तर हा साधासोपा उपाय केल्याने केस धुतल्यानंतर केसांचा गुंता देखील होत नाही. परिणामी, केस विंचरताना तुटून किंवा गळून हातात येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Tangled hair while washing? Apply this before shampooing for smooth hair.

Web Summary : Struggling with tangled hair after washing? Applying aloe vera gel before shampooing can provide natural moisture, making hair smoother and easier to manage. This simple trick reduces breakage and promotes healthier, shinier hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय