घनदाट, जाड, मुलायम, मजबूत केस कोणाला नको असतात. आपले केस सुंदर, निरोगी असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु जर चांगले केस हवे असतील तर केसांची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे असते. त्यासाठी केस आठवड्यातून दोन वेळा धुणे, केसांचा मसाज करणे आवश्यक आहे. काहीवेळा हे सर्व करूनही केस चांगले दिसत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. आपण सगळेच आपल्या केसांची खूप काळजी घेतो, परंतु काळजी घेताना आपण काही छोट्या चुका करतो. या लहान - सहान चुकांमुळेच केसांचे सौंदर्य व आरोग्य बिघडू शकते(5 Changes that can help prevent hair damage).
चांगल्या केसांसाठी नेहमीच्या वापरातल्या कोणत्या ५ गोष्टी बदलाव्यात ?
१. उशीचे कव्हर :- रात्री झोपताना केसांचा व उशीच्या कव्हरचा संबंध येतो. शक्यतो आपण उशीला कॉटनचे कव्हर घालतो. परंतु या कॉटनच्या कव्हरसोबत केसांचे घर्षण होते. असे घर्षण वारंवार झाल्यामुळे केसांचे नुकसान होते. यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच केसांच्या आरोग्याची होणारी हानी थांबवण्यासाठी उशीचे कव्हर बदलावे. उशीला कॉटनचे कव्हर घालण्याऐवजी आपण सिल्कच्या कव्हरचा वापर करावा. उशीला सिल्कचे कव्हर घातल्याने उशी कव्हर व केस यांमधील घर्षण कमी होते, परिमाणी केस तुटत नाहीत. यामुळे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी उशीचे कव्हर बदलणे गरजेचे आहे.
२. हॉट ड्रायर :- केसांसाठी हॉट ड्रायरचा वापर करण्याऐवजी आपण कुल ड्रायरचा वापर करु शकता. केस धुतल्यानंतर ते वाळवण्यासाठी आपण शक्यतो ड्रायरचा वापर करतो. केसांसाठी हॉट ड्रायरचा वापर केल्यास त्यातून येणारी गरम हवा केसांसाठी हानिकारक असते. या गरम हवेमुळे केसांचे फार मोठे नुकसान होते. हेअर स्टाईल करताना केसांसाठी हॉट ड्रायरचा वापर करण्याऐवजी आपण कुल ड्रायरचा वापर करु शकता.
केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...
३. टॉवेल वापरु नका :- ओले केस पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करण्याऐवजी आपण कॉटनच्या टीशर्टचा वापर करु शकता. टॉवेलच्या कापडाचे फायबर्स केसांना ड्राय बनवून केसांच्या मुळांना हानी पोहचवू शकतात. यासाठीच केसांसाठी टॉवेलचा वापर करण्याऐवजी आपण कॉटनच्या टीशर्टचा वापर करु शकता.
४. प्लास्टिकचा कंगवा :- केस विंचरण्यासाठी प्लॅस्टिकच्या कंगव्याऐवजी लाकडाच्या कंगव्याचा वापर करावा. प्लास्टिकचा कंगवा हा केसांच्या सौंदर्य आणि आरोग्यासाठी हानिकारक असतो. याउलट लाकडाचा कंगवा वापरल्याने केस विंचरताना तुटत नाही. याचबरोबर केसांचे चांगले आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्लॅटिकचा कंगवा वापरणे शक्यतो टाळावे.
५. गरम पाणी :- केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. केसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शक्यतो केस धुताना गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. केसांसाठी गरम पाण्याचा वापर केल्यास केस हे गरम पाणी केसांना अधिकच ड्राय करते. यामुळे केसांचा पोत बिघडून केस गळतीची समस्या सुरु होते. केसांसाठी गरम पाण्याचा वापर करण्याऐवजी आपण कोमट किंवा गार पाणी वापरु शकतो.