Join us

केसांना टोकं फुटल्यामुळे सतत केस कापता? १ घरगुती हेअर मास्क - स्प्लिट एंड्स होतील कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 18:53 IST

How to Fix Dry Hair and Split Ends : How To Get Soft Hair Ends : How to get soft hair ends permanently : How to Prevent Split Ends and Hair Breakage : केसांच्या स्प्लिट एंड्सची समस्या कायमची दूर करण्यासाठी वापरा 'हा' हेअर मास्क...

आपल्यापैकी अनेकांना केसांच्या वेगवेगळ्या समस्या सतावतात. केसांच्या अनेक समस्यांपैकी स्प्लिट एंड्स ही फारच कॉमन आणि त्रासदायक समस्या आहे. आपले केस लांबसडक, मऊमुलायम आणि निरोगी असावे अशी प्रत्येकीची इच्छा असते, असे असले तरी केसांच्या टोकांवर दिसणारी ही स्प्लिट एंड्सची समस्या फार मोठी अडचण ठरते. आपले केस वरवर जरी दिसताना चांगले दिसत असले तरी, केसांची टोकं मात्र फारच रुक्ष, निस्तेज आणि खराब दिसतात. केसांची खालची टोकं (How to Prevent Split Ends and Hair Breakage) अशी निर्जीव, कोरडी झाली की केसांचा संपूर्ण लूकच खराब होऊन जातो. अशा केसांची कोणती हेअर स्टाईल करायची किंवा मोकळे ठेवायचं म्हटलं तरी दिसायला ते चांगले दिसत नाही. 

केसांना पुरेशी आर्द्रता मिळत नसेल तर खालच्या बाजुने केसांना फाटे (How to Fix Dry Hair and Split Ends) फुटतात. एकदा हे फाटे फुटायला सुरुवात झाली की केसांची वाढ कमी होते आणि खालच्या बाजुने केस कोरडे दिसायला लागतात. मग हौसेने वाढवलेले केस कापणे म्हणजेच ट्रीम करणे याशिवाय कोणताही पर्याय आपल्यापुढे उरत नाही. मग इच्छा नसतानाही केस कापावे लागतात. अशावेळी एवढ्या आवडीने वाढवलेले केस कापायचे म्हणजे अनेकींना नको  वाटते, यासाठीच जर केस खालच्या बाजूने अतिशय निस्तेज, रुक्ष, कोरडे झाले असतील आणि जर ते आपल्याला कापायचे नसतील तर आपण काही इतर उपायांचा वापर करु शकतो(How to get soft hair ends permanently). केसांच्या स्प्लिट एंड्सची समस्या कायमची दूर करण्यासाठी आपण एक घरगुती उपाय नक्की करुन पाहू शकतो. 

केसांच्या स्प्लिट एंड्सची समस्या दूर करण्यासाठी खास उपाय.. 

केसांच्या स्प्लिट एंड्सची समस्या दूर करण्यासाठी हेअर मास्क तयार करताना दही आणि मध इतक्या दोनच पदार्थांची गरज लागणार आहे. स्प्लिट एंड्स कमी करण्यासाठी हेअर मास्क कसा करायचा. 

नको शाम्पू, नको तेल, विसरा महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स ! खा फक्त डार्क चॉकलेट - केसांच्या समस्या गायब...

कृती :- 

सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये २ टेबलस्पून दही घेऊन त्यात १ टेबलस्पून मध घालावे. दही आणि मध एकत्रित चमच्याने कालवून घ्यावे. केसांच्या स्प्लिट एंड्ससाठी हेअर मास्क तयार आहे. 

याचा वापर कसा करायचा? 

तयार हेअर मास्क केसांच्या खालच्या टोकांवर, स्प्लिट एंड्सला लावून घ्यावा. त्यानंतर ३० मिनिटे हा मास्क केसांवर तसाच लावून ठेवून द्यावा. मग केस शाम्पूने स्वच्छ धवून घ्यावेत. हा उपाय आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केल्यास केसांच्या स्प्लिट एंड्सची समस्या कमी होते. 

आंब्याची हिरवीगार पानं केसांसाठी वरदान! या ३ पद्धतींनी केसांना लावा, केसांच्या समस्या गायब...

त्वचेसाठी बेसन फायदेशीर पण ‘या’ लोकांनी मुळीच बेसनाचे लेप लावू नयेत, कायमचं नुकसान होतं...

केसांच्या स्प्लिट एंड्ससाठी मध आणि दह्याचा हेअर मास्क कसा फायदेशीर... 

१. दही :- दह्यामध्ये नैसर्गिक प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. हे केसांना पोषण देतं, टोकांपर्यंत आर्द्रता पोहोचवतं आणि कोरडेपणा कमी करतं. दह्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि तुटण्याचं प्रमाण कमी होतं.

२. मध :- मध हे केसांसाठी फारच उपयुक्त असते, मध केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवते. मधामुळे केसांच्या टोकांचा कोरडेपणा, दुभंगलेले केस आणि हरवलेली चमक पुन्हा येऊन केस मऊसर आणि मजबूत होतात. मध केसांना एक संरक्षक थर देतो, ज्यामुळे केसांचे बाहेरून होणारे नुकसान कमी प्रमाणात होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी