lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

What Ingredients to Mix in Henna Powder to Make White Hair Black : विकतची केमिकलयुक्त रेडी टू यूज मेहेंदी टाळा, मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत माहिती हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 07:13 PM2023-04-28T19:13:33+5:302023-04-28T19:27:47+5:30

What Ingredients to Mix in Henna Powder to Make White Hair Black : विकतची केमिकलयुक्त रेडी टू यूज मेहेंदी टाळा, मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत माहिती हवी...

how to prepare henna hair dye paste for silky smooth hair | मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व पांढरे केस लपवण्यासाठी केसांना मेहेंदी लावणे हा एक जुना पूर्वीपासूनच उपाय आपण करतो. केसांना मेहेंदी लावल्यामुळे  केस काळे, चमकदार, मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते. केस पांढरे झाल्यानंतर ते लपवण्यासाठी कोणताही केमिकलयुक्त रंग लावण्यासाठी अनेक जण घाबरतात, तसेच काहींना केस कलर करण्याची आवड असते. अशावेळी बाजारांत विकत मिळणाऱ्या केमिकलयुक्त रंगांचा वापर करण्याऐवजी काहीजण नैसर्गिक मेहेंदी लावणे पसंत करतात. 

सध्याच्या बदलत्या काळानुसार नैसर्गिक मेहेंदी विकत मिळणे हे कठीण झाले आहे. बाजारांत विकत मिळणाऱ्या मेहेंदीला रंग येण्यासाठी त्यात विविध प्रकारचे केमिकल्स किंवा आर्टिफिशीयल घटक मिसळलेले असतात. अशी आर्टिफिशियल रंग देणारी मेहेंदी केसांना लावून आपण केसांचे आरोग्य सुधारवण्याऐवजी बिघडवत आहोत. ही आर्टिफिशियल मेहेंदी केसांना लावल्यामुळे केसगळती, केस रुक्ष होणे, केसांचा पोत बिघडणे, केस निस्तेज होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठीच बाजारांत विकत मिळणाऱ्या केमिकलयुक्त किंवा आर्टिफिशीयल मेहेंदीचा वापर न करता आपण घरच्या घरी नैसर्गिकरित्या मेहेंदी भिजवून तयार करुन ती आपल्या केसांना लावू शकतो(What Ingredients to Mix in Henna Powder to Make White Hair Black).


साहित्य :- 

१. ऑरगॅनिक मेहेंदी - २ टेबलस्पून 
२. जास्वंदीच्या फुलांची पावडर -  १ टेबलस्पून 
३. कढीपत्त्याच्या पानांची पावडर - १ टेबलस्पून
४. त्रिफळा पावडर - १ टेबलस्पून
५. शिकेकाई पावडर - १ टेबलस्पून
६. आवळा पावडर - १ टेबलस्पून
७. भृंगराज पावडर - १ टेबलस्पून
८. दही - १ टेबलस्पून
९. पाणी - गरजेनुसार 
१०. लिंबाचा रस - २ ते ३ टेबलस्पून 

कोरफड म्हणजे उन्हाळ्यात वरदान, ७ प्रकारे कोरफड वापरा- उन्हामुळे होणारे त्रास होतील पटकन कमी...

केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही लाकडी कंगवा वापरा, केसांच्या समस्या चुकीचा कंगवा वापरल्याने वाढतात कारण...

घरच्या घरी नैसर्गिकरित्या मेहेंदी कशी तयार करावी ? 

१. सर्वप्रथम एक लोखंडाची कढई घ्यावी. 
२. या कढईत, ऑरगॅनिक मेहेंदी घेऊन त्यात जास्वंदीच्या फुलांची पावडर, कढीपत्त्याच्या पानांची पावडर, त्रिफळा पावडर, शिकेकाई पावडर, आवळा पावडर, भृंगराज पावडर, दही, पाणी, लिंबाचा रस घालून हे सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावेत.     

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

३. आता ही भिजवलेली मेहेंदी ७ ते ८ तासांसाठी तशीच झाकून ठेवावी. 
४. मेहेंदी ७ ते ८ तास चांगली भिजल्यानंतर केसांना लावून घ्यावी.

Web Title: how to prepare henna hair dye paste for silky smooth hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.