Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही स्वत:च ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा केस गळणं ताबडतोब थांबवणारा शाम्पू, ३० दिवसांत पाहा फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 15:26 IST

Hair Care Tips: केस गळणं खूप वाढलं असेल तर पुढे सांगितलेला उपाय बघून घरीच एक खास शाम्पू तयार करा...(how to make shampoo at home to reduce hair fall?)

हल्ली केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. कित्येक जणांच्या केसांना तर अजिबातच वाढही नसते आणि शिवाय त्यांचे केसही खूप गळत असतात. केस गळण्याचं प्रमाण वाढण्यामागे कित्येक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे केसांची योग्य ती काळजी न घेतली जाणे. म्हणूनच आता पुढे सांगितलेला एक उपाय पाहा आणि त्यापद्धतीने केस धुवा. हा उपाय केल्याने केसांची वाढ चांगली होईल आणि शिवाय केस गळण्याचं प्रमाणही बरंच कमी होईल (hair fall controlling shampoo). काही दिवसांतच केस छान दाट, जाड होतील असं सांगण्यात आलं आहे.(how to make shampoo at home to reduce hair fall?)

 

केस धुण्यासाठी घरीच तयार करा खास शाम्पू

हा उपाय करण्यासाठी साधारण अर्धा लीटर पाणी घ्या. ते पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. त्या पाण्यामध्ये १ चमचा चहा पावडर, १ चमचा तांदूळ, १ चमचा मेथ्या आणि कडिपत्त्याची ८- १० पाने घाला. आता हे पाणी चांगलं उकळू द्या. पाणी ८ ते १० मिनिटे चांगलं उकळल्यानंतर गॅस बंद करा.

महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

हे पाणी थंड होऊ द्या आणि त्यानंतर गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये तुम्ही नेहमी जो शाम्पू वापरता तो शाम्पू घाला. आता या पाण्याने केस धुवा. काही दिवस आठवड्यातून एकदा या पद्धतीने नियमितपणे केस धुवून पाहा. काही दिवसांतच तुम्हाला केसांमध्ये खूप छान फरक दिसून येईल. हा उपाय kamya_sonwani या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

हे उपायही करून पाहा..

१. केस गळणं खूप वाढलं असेल तर आहारात जवस, अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया असे पौष्टिक पदार्थ जास्त प्रमाणात असू द्या.

फक्त १ आठवड्यात चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स होतील कमी, पपईच्या पानांचा 'असा' लावा लेप

२. केसांवर वारंवार स्ट्रेटनिंग, कर्ल्स अशा हिटिंग ट्रिटमेंट करू नका. 

३. डोक्याला आठवड्यातून एकदा कोमट तेलाने मालिश करा. कॅस्टर आणि रोजमेरी हे दोन तेल एकत्र करून मालिश केल्यास अधिक चांगले. मालिश हळूवार करावी. त्यादरम्यान केस तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade shampoo to stop hair fall and see difference in 30 days.

Web Summary : Suffering from hair fall? Make this shampoo at home with tea powder, rice, fenugreek, and curry leaves. Use it weekly for strong, thick hair. Also, eat nutritious food and avoid heat treatments.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी