केस गळणे, कोंडा होणे, अकाली पांढरे होणे आणि केसांची वाढ खुंटणे या समस्या सतत पाहायला मिळत आहे. बाजारात मिळणारे महागडे आणि सुगंधी शाम्पू आपल्याला तात्पुरते चांगले वाटत असले, तरी त्यामध्ये असणारे सल्फेट आणि पॅराबेन्स सारखी केमिकल्स केसांच्या मुळांना हळूहळू कमकुवत करतात.(Homemade shampoo) आपण विचार करतो की हजारो रुपये खर्च करूनही केसांच्या समस्या सुटत का नाहीत? (Hair care tips)आयुर्वेदात केस धुण्यासाठी रीठा, आवळा आणि शिकाकाी यांचा वापर केला जातो. पण सध्याच्या धावपळीच्या जगात आपण या नैसर्गिक गोष्टी विसरलो आहोत.(hair care routine) पण फक्त १०० रुपयांत हा आयुर्वेदिक नॅचरल शाम्पू आपण घरच्या घरी बनवू शकतो. तसेच हा शाम्पू एकदा बनवला तर वर्षभर खराब होणार नाही.(Ayurvedic shampoo for hair growth) कमी खर्चात घरच्या घरी 'मॅजिकल' आयुर्वेदिक शाम्पू तयार कसा करायचा, ज्यामुळे केसांच्या सर्व समस्या मुळापासून दूर होतील आणि केसांना नैसर्गिक चकाकी मिळेल.
साहित्य
रीठा- २०० ग्रॅमआवळा - १०० ग्रॅमशिकाकाई - १०० ग्रॅमभृंगराज - १०० ग्रॅममेथीचे दाणे- १०० ग्रॅमजवस - १०० ग्रॅमपाणी - गरजेनुसार
शाम्पू बनवण्याची कृती
1. सगळ्यात आधी रात्री झोपण्यापूर्वी लोखंडाच्या कढईत ३ ते ४ ग्लास पाणी घालून वरील सर्व साहित्य मिक्स करुन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे मिश्रण त्याच पाण्यासह गॅसवर मंद आचेवर उकळायला ठेवा. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा.
2. पाणी कोमट झाल्यानंतर हाताने किंवा ब्लेंडरने सर्व साहित्य नीट मॅश करुन घ्या. यामुळे रीठाचा फेस तयार होईल आणि शिकाकाईचा अर्क पूर्णपणे बाहेर येईल.
3. हे जाडसर मिश्रण एका सुती कापडाने किंवा गाळणीने व्यवस्थित गाळून घ्या. आयुर्वेदिक शाम्पू तयार होईल. हा शाम्पू वर्षभर टिकतो. तयार झालेल्या लिक्विडचा आपण साबण किंवा आईस ट्रेमध्ये घालून त्याचे क्यूब्स करु शकतो. केस धुवायचे असतील तेव्हा १ -२ क्यूब वितवळवून घ्या. यामुळे शाम्पू खराब होत नाही.
4. शिकाकाई केसांच्या मुळांना घट्ट पकडून ठेवते, ज्यामुळे केस गळती कमी होते.आवळ्यातील व्हिटॅमिन सी केसांमधील कोरडेपणा घालवून त्यांना मऊ आणि रेशमी बनवते. रीठामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूवरील इन्फेक्शन आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात.
Web Summary : Chemical shampoos weaken hair. This article details making an affordable, natural Ayurvedic shampoo using reetha, amla, shikakai, bhringraj, methi, and javas. This homemade shampoo addresses hair fall, dandruff, premature graying, and promotes healthy hair growth, offering shine and strength.
Web Summary : रासायनिक शैंपू बालों को कमजोर करते हैं। यह लेख रीठा, आंवला, शिकाकाई, भृंगराज, मेथी और जवा का उपयोग करके किफायती, प्राकृतिक आयुर्वेदिक शैम्पू बनाने का विवरण देता है। यह घरेलू शैम्पू बालों का झड़ना, रूसी, समय से पहले सफ़ेद होना जैसी समस्याओं को दूर करता है और स्वस्थ बालों के विकास को बढ़ावा देता है, चमक और मजबूती प्रदान करता है।