Lokmat Sakhi >Beauty > दीपिका- कतरीनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते केसांना करा पोटली मसाज! आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय...

दीपिका- कतरीनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते केसांना करा पोटली मसाज! आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय...

How To Make Potli For Hair Growth : Ayurvedic Nutritionist Shares Best Hair Potli For Hair Growth : ayurvedic hair potli for hair growth : best hair potli recipe for long hair : पोटली मसाज केल्यावर केसांना आतून पोषण मिळते यामुळे केसांचे आरोग्य व सौंदर्य सुधारण्यास मदत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2025 10:25 IST2025-08-23T10:15:00+5:302025-08-23T10:25:01+5:30

How To Make Potli For Hair Growth : Ayurvedic Nutritionist Shares Best Hair Potli For Hair Growth : ayurvedic hair potli for hair growth : best hair potli recipe for long hair : पोटली मसाज केल्यावर केसांना आतून पोषण मिळते यामुळे केसांचे आरोग्य व सौंदर्य सुधारण्यास मदत होते.

How To Make Potli For Hair Growth Ayurvedic Nutritionist Shares Best Hair Potli For Hair Growth ayurvedic hair potli for hair growth best hair potli recipe for long hair | दीपिका- कतरीनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते केसांना करा पोटली मसाज! आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय...

दीपिका- कतरीनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते केसांना करा पोटली मसाज! आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय...

आपले केस लांबसडक, काळेभोर, घनदाट असावेत अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. केसांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण त्यांची अधिकाधिक काळजी घेतो. केस सुंदर दिसावेत म्हणून फक्त शॅम्पू आणि कंडिशनर करून चालत नाही, तर मसाज देखील महत्त्वाचा असतो. केसांना व स्कॅल्पला मसाज करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा वापर करतो. केसांना मसाज (How To Make Potli For Hair Growth) केल्याने त्यांना आतून पोषण मिळतेच शिवाय केसांच्या अनेक समस्या देखील दूर होतात (Hot Potli Massage).

केसगळती, अकाली केस पांढरे होणे, केस पातळ होणे अशा केसांच्या अनेक समस्यांवर मसाज हा उत्तम पर्याय आहे. केसांना फक्त तेलानेच मसाज केला जातो असे नाही तर, इतर नैसर्गिक गोष्टींचा देखील वापर करू शकतो. सध्या 'पोटली मसाज' हा मसाजचा एक नवीन प्रकार खूप ट्रेंडिंग होत आहे. केसांसाठीच्या या पोटली मसाजमध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. घरच्या घरी केसांना पोटली मसाज कसा करावा याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.दीपिका पदुकोण व कतरीना कैफ (Ayurvedic Nutritionist Shares Best Hair Potli For Hair Growth) यांसारख्या बड्या सेलिब्रिटीजची न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा, यांनी केसांना मसाज करण्यासाठी एका खास 'पोटली मसाज' ची ट्रिक सांगितली आहे. केसांसाठी खास आयुर्वेदिक पोटली तयार करण्यासाठी आपण घरगुती पदार्थांचा वापर करु शकतो. केसांवर या औषधी, आयुर्वेदिक पोटलीने मसाज केल्यास केसांच्या अनेक समस्या कमी होऊन, केसांना आतून पोषण मिळते यामुळे केसांचे आरोग्य व सौंदर्य सुधारण्यास मदत होते. 

केसांसाठी औषधी व आयुर्वेदिक पोटली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य... 

केसांसाठी औषधी व आयुर्वेदिक पोटली तयार करण्यासाठी आपल्याला कपभर कडीपत्त्याची पाने, २ ते ३ टेबलस्पून मेथी दाणे, १ कप सुकं खोबरं, मूठभर कांद्याच्या साली व १ कप सैंधव मीठ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.   

भयानकच! सुंदर दिसण्यासाठी नाकातल्या केसांचं वॅक्सिंग कोण करतं, पण तिने केलं-पाहा व्हायरल व्हिडिओ...

केसांसाठी ही औषधी पोटली कशी तयार करावी ? 

सगळ्यातआधी तवा मध्यम आचेवर गरम करून घ्यावा. मग तव्यात कडीपत्त्याची पाने, मेथी दाणे, सुकं खोबरं, कांद्याच्या साली व सैंधव मीठ घालून हलकेच १ ते २ मिनिटे व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर एक कॉटनचे कापड घेऊन त्यात हे सगळे तव्यावर गरम केलेले पदार्थ ओतावेत आणि मग त्याची पोटली तयार करून घ्यावी. ही तयार पोटली देखील १ ते २ मिनिटे तव्यावर ठेवून गरम करून घ्यावी. 

प्या कपभर कडीपत्त्याच्या  चहा! केसांची खुंटलेली वाढ, केसगळती होईल कमी - केस वाढतील भराभर... 

या पोटलीचा वापर केसांसाठी कसा करावा ? 

गरम झालेली पोटली घेऊन केसांच्या मुळांवर हलकेच दाब देत केसांच्या मुळांना हलकेच मसाज करून घ्यावा. आपल्या स्काल्पला सोसवेल इतकीच पोटली गरम करून घ्यावी. 


या पोटलीने केसांवर मसाज करण्याचे फायदे... 

१. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्याची पाने केसगळती कमी करून अकाली केस पांढरे होण्याची समस्या रोखतात.

२. मेथी दाणे :- केसांतील कोंडा कमी करून केसांना मजबूती देतात.

३. सुकं खोबरं :- सुकं खोबरं केसांना नैसर्गिक ओलावा देऊन केस मऊ व चमकदार बनवते.

४. कांद्याच्या साली :- कांद्याच्या साली केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवतात आणि वाढीस मदत करतात.

५. सैंधव मीठ :- सैंधव मीठ स्काल्पला स्वच्छ ठेवून रक्ताभिसरण सुधारते व केसांच्या मुळांना बळकटी देते.

Web Title: How To Make Potli For Hair Growth Ayurvedic Nutritionist Shares Best Hair Potli For Hair Growth ayurvedic hair potli for hair growth best hair potli recipe for long hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.