आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, प्रदूषण, स्ट्रेस यांसारख्या इतर कारणांमुळे केसांच्या समस्या खूप वाढल्या आहेत. केस गळणे, अकाली केस पांढरे होणे किंवा कोरडे व निर्जीव केस यांसारख्या समस्यां अनेकजणींना सतावतात, यावर एक नैसर्गिक आणि सोपा उपाय म्हणजे घरगुती आवळ्याचे तेल... केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी त्यावर काहीतरी ठोस आणि कायमचा नैर्सगिक उपाय करणे गरजेचे असते. हिवाळ्याच्या दिवसांत बाजारांत मिळणारा ताजा, रसाळ आवळा हा या समस्यांवरील गुणकारी उपाय ठरतो. आयुर्वेदात आवळ्याला अमृतासमान मानले जाते. 'व्हिटॅमिन सी', अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी ॲसिड्सयुक्त असलेला आवळा फक्त केसांच्या मुळांना पोषणच देत नाही, तर त्यांना मजबूत आणि चमकदार करतो(How To Make Original Amla Hair Oil At Home).
बाजारांत मिळणारे आवळ्याचे तेलं काहीवेळा केमिकलयुक्त असू शकते, पण घरच्या घरी तयार केलेले आवळ्याचे तेल मात्र शंभर टक्के शुद्ध, पौष्टिक आणि परिणामकारक ठरते. फक्त काही साध्या घरगुती घटकांपासून तयार होणारे आवळ्याचे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून त्यांना मजबूत करते, नैसर्गिक रंग टिकवते आणि केसांची वाढही वेगाने सुधारते. सर्वात खास म्हणजे हे तेल बनवणे (original amla hair oil recipe) अतिशय सोपे आणि कमी वेळात (homemade amla hair oil) झटपट होते. घरच्याघरीच, अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी खर्चात, १००% शुद्ध आणि कोणत्याही रसायनाशिवाय आवळ्याचे तेल कसे करायचे ते पाहा...
घरच्याघरीच आवळ्याचे तेल कसे तयार करावे...
घरच्याघरीच आवळ्याचे तेल तयार करण्यासाठी आपल्याला १०० ग्रॅम सुक्या आवळ्याचे तुकडे , ५०० मिलीलीटर नारळाचे तेल, १ मध्यम आकाराचे भांडे किंवा लोखंडाची कढई इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
तेल बनवण्याची पद्धत...
आवळा तेल तयार करण्यासाठी, सर्वातआधी सुकलेल्या आवळ्याचे तुकडे किंवा पावडर घ्यावी. जर तुमच्याकडे सुके आवळे नसतील, तर तुम्ही ताज्या, रसरशीत आवळ्याचे तुकडे करून घ्या आणि त्यांना काही दिवस उन्हात व्यवस्थित वाळवा. आता कढईत नारळाचे तेल घ्या आणि ते मध्यम आचेवर गरम करा. मग त्यात सुकलेल्या आवळ्याचे तुकडे किंवा पावडर घाला. तेल जास्त गरम होऊ नये, कारण जास्त उष्णतेमुळे आवळ्यातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात. आवळा आणि तेल रंग बदलू लागतील. जेव्हा आवळ्याचा रंग गडद होईल, तेव्हा गॅस बंद करा. तेल थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि आवळ्याच्या तुकड्यांना दाबून त्यातील तेल काढून टाका. तयार केलेलं आवळ्याचं तेल एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करा.
आवळा तेल केसांवर कसे लावायचे ?
आवळ्याचे तेल कोमट गरम करून केसांच्या मुळाशी लावावे. त्यानंतर, स्काल्पला हलक्या हाताने मालिश करा. यामुळे स्काल्पचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवळा तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा लावून मालिश करावे.
कांद्याची सालं फेकू नका, आहेत फायदेशीर! करा नॅचरल हेअर कलर - पांढरे केसही होतील काळेभोर...
केसांना घरगुती आवळ्याचे तेल लावण्याचे फायदे...
१. आवळ्यातील पोषक घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण खूपच कमी होते.२. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने ते अकाली केस पांढरे होणे थांबवण्यास मदत करते.३. आवळ्याचे तेल स्काल्पचे आरोग्य सुधारते आणि रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.४. हे तेल स्काल्पला आवश्यक पोषण पुरवते आणि ते निरोगी ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे केसांच्या समस्या मुळापासून दूर होतात.५. केसांना मॉइश्चराइझ करते, ज्यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते आणि ते मऊमुलायम होतात.
Web Summary : Combat hair issues like hair fall and graying with homemade amla oil. Rich in Vitamin C and antioxidants, it strengthens roots, promotes growth, and adds shine. Easy to make with coconut oil and dried amla, it's a pure, effective remedy.
Web Summary : बालों के झड़ने और सफ़ेद होने जैसी समस्याओं से घर पर बने आंवला तेल से लड़ें। विटामिन सी और एंटीऑक्सीडेंट से भरपूर, यह जड़ों को मजबूत करता है, विकास को बढ़ावा देता है और चमक जोड़ता है। नारियल तेल और सूखे आंवला के साथ बनाना आसान है, यह एक शुद्ध और प्रभावी उपाय है।