Join us

बाप्पाच्या पूजेसाठी वापरलेल्या दिव्यातील वाती फेकू नका! १० मिनिटांत करा पारंपरिक पद्धतीचे घरगुती काजळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2025 15:09 IST

How To Make Natural Kajal From Puja Wick : how to make natural kajal at home : kajal from puja wick : homemade kajal from diya batti : kajal from cotton wick : how to make kajal using ghee and wick : दिव्यातील वाती फेकून न देता त्यापासून पारंपरिक पद्धतीने काजळ कसे तयार करायचे ते पाहूयात.

गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पांसाठी सजावट म्हणून आपण दिव्यांची आरास करतो. यासोबतच, आपण देवाजवळ दिवा देखील लावतो, पूजा - आरती करताना निरांजन लावतो. या अनेक दिव्यांतील वाती जळल्यावर आपण त्यांचा काहीच उपयोग नाही म्हणून चक्क त्या फेकून देतो. दिव्यांतील जळलेल्या वाती (How To Make Natural Kajal From Puja Wick) फेकून न देता आपण त्यांचे घरगुती काजळ देखील तयार करु शकतो. बाजारातील केमिकलयुक्त काजळाऐवजी हे घरगुती नैसर्गिक काजळ डोळ्यांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. आपल्यापैकी बऱ्याचजणी (how to make natural kajal at home) डोळे सुंदर व आकर्षक दिसावेत म्हणून दररोज काजळ लावतात. परंतु सध्या (homemade kajal from diya batti) पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं काजळ (kajal from puja wick) फार क्वचितच विकत मिळते. बाजारात केमिकल्सयुक्त व आर्टिफिशियल रंग वापरुन तयार केलेले काजळ सर्रास विकले जाते(how to make kajal using ghee and wick).

डोळ्यांसाठी असे हानिकारक व कृत्रिम काजळ वापरण्यापेक्षा घरगुती पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं काजळ वापरणं कधीही उत्तमच. पूर्वीच्या काळी आपली आजी शक्यतो पारंपरिक पद्धतीने काजळ तयार करायची. अगदी तीच पारंपरिक पद्धत वापरून आपण घरगुती नैसर्गिक काजळ तयार करु शकतो. पूजेसाठी वापरलेल्या दिव्यातील जळलेल्या वाती फेकून न देता त्यापासून पारंपरिक पद्धतीने काजळ कसे तयार करायचे ते पाहूयात. 

पूजेसाठी वापरलेल्या दिव्यातील वातीपासून काजळ कसे तयार करावे. 

साहित्य :- 

१. पूजेतल्या जळलेल्या वाती

२. तूप किंवा एरंडेल / खोबरेल तेल (काजळ मऊ व टिकाऊ करण्यासाठी)

३. पितळी/स्टीलचा दिवा

४. ताटली किंवा झाकण (धूर साचवण्यासाठी)

५. लहान डबी (काजळ साठवण्यासाठी)

सणउत्सवाचे दिवस आणि मेकअप प्रॉडक्ट्स सुकून खडखडीत झाले? ७ टिप्स- एका मिनिटांत वापरा तेच नव्यासारखे...

ऐन तारुण्यात त्वचा लूज पडली, सुरकुत्या वाढल्या? 'असा ' करा स्किन टाईट करणारा घरगुती मास्क...

काजळ कसे तयार करावे ? 

पूजेतल्या जळलेल्या वातीं एकत्रित करुन त्यामध्ये थोडे तूप/ खोबरेल किंवा एरंडेल तेल लावून पुन्हा दिवा लावा. त्यानंतर एक डिश घेऊन ती दिव्याच्या ज्योतीवर उलटी ठेवून द्यावी. थोड्या वेळाने आपण पाहू शकता की, या डिशवर काळ्या रंगाची काजळी जमू लागलेली असेल. वाती जळून त्यांच्या धूर निघून त्याची काजळी तयार होऊन डिशवर त्याचा काळ्या रंगाचा थर साचू लागेल. 

दीपिका- कतरीनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते केसांना करा पोटली मसाज! आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय...

थोड्या वेळाने वाती संपूर्णपणे जळून दिवा विझेल तेव्हा डिशवर साचलेला काजळीचा थर एका चमच्याच्या मदतीने खरवडून काढून एका स्वच्छ डबीत भरून घ्यावा. त्यानंतर, या मिश्रणात थोडे घरगुती साजूक तूप किंवा खोबरेल तेलाचे काही थेंब घालावेत. मग हे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. या तयार मिश्रणाची एक स्मूद पेस्ट तयार करून घ्यावी. पूजेतील वापरलेल्या वातींपासून तयार केलेलं पारंपरिक पद्धतीचे काजळ वापरण्यासाठी तयार आहे. 

घरगुती काजळ वापरण्याचे फायदे...   

१. घरगुती काजळ हे नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असल्याने त्यात कोणत्याही प्रकारची रासायनिक द्रव्ये किंवा कृत्रिम रंग  नसतात. त्यामुळे डोळ्यांना कोणतीही हानी पोहोचत नाही.

२. काजळ तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये तुपाचा वापर केल्याने, डोळे कोरडे होत नाहीत आणि त्यांना पोषण मिळते.

३. पारंपरिक पद्धतीने बनवलेले काजळ गडद आणि टिकाऊ असते. त्यामुळे ते एकदा लावल्यावर बराच काळ टिकते आणि डोळ्यांना एक आकर्षक, उठावदार लुक देते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीगणपती 2025गणेशोत्सव विधी