Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेण्टाइन डे ला मिळालेला गुलाब फेकू नका! सुकलेल्या पाकळ्यांचा करा हेअर डाय- पांढऱ्या केसांवर उपाय असरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2026 13:40 IST

Rose petal hair dye: Natural hair dye at home: Remedy for White hair: व्हॅलेन्टाइन डेला मिळालेल्या त्याच सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून आपण घरीच '१००% नॅचरल हेअर डाय' तयार करू शकतो.

व्हॅलेण्टाइन डे म्हटलं की प्रेमाचा वर्षाव आणि लालचुटूक गुलाबाची फूल आलीच. आपल्या प्रिय व्यक्तीने दिलेलं गुलाबाचं फूल आपल्यासाठी खूप खास असतं.(Rose petal hair dye) आपण कधी ते डायरीत जपून ठेवतो तर कधी फुलदाणीत सजवतो. पण काही दिवसांतच हे फूल सुकायला लागते मग नाईलाजाने आपण ते कचऱ्यात फेकून देतो. पण हे सुकलेलं गुलाब आपल्या आठवणींचा हिस्सा राहणार नाही तर आपल्या केसांसाठी खजिना ठरु शकते. (Natural hair dye at home)सध्याच्या धावपळीच्या युगात, प्रदूषण आणि केमिकलच्या अतिवापरामुळे केस अकाली पांढरे होणे ही एक मोठी समस्या बनली आहे.(Remedy for White hair) बाजारात मिळणारे हेअर डाय किंवा कलर्स सुरुवातीला चांगले वाटले तरी, त्यातील अमोनिया सारखी रसायने केसांचा नैसर्गिक पोत खराब करतात. ज्यामुळे केस अधिकच कोरडे व पांढरे होऊ लागतात. अशा वेळी आपल्या घरात असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे केव्हाही उत्तम. व्हॅलेन्टाइन डेला मिळालेल्या त्याच सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून आपण घरीच '१००% नॅचरल हेअर डाय' तयार करू शकतो. यामुळे केसांना केवळ नैसर्गिक रंगच मिळत नाही, तर गुलाबाच्या अर्कामुळे केसांना चमकही मिळते. 

केस गळती रोखण्यासाठी घरीच करा मॅजिकल हेअर टॉनिक; सोपी पद्धत- महिन्याभरात केस वाढतील गुडघ्यापर्यंत

गुलाबाच्या पाकळ्यांचा हेअर डाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या चहा पावडर किंवा कॉफी पावडर - २ चमचे किसलेला बीट - १लोखंडी कढई पाणी - १ कप हिना मेहेंदी किंवा इंडिगो पावडर

सगळ्यात आधी आपल्याला सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्याव्या लागतील. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या, चहा पावडर आणि किसलेला बीट घाला. हे मिश्रण मंद आचेवर चांगले उकळू द्या. पाणी अर्धे झाल्यानंतर त्याचा रंग देखील लाल-काळ होईल. हे मिश्रण गाळून लोखंडी कढईत ओता. यात हिना मेहेंदी किंवा इंडिगो पावडर घालून थोडा वेळ झाकून ठेवा. पांढर्‍या केसांवर हे डाय व्यवस्थित लावा. १ ते २ तास हा डाय केसांवर राहू द्या. केस धुताना शाम्पूचा वापर करू नका. साध्या पाण्याने केस धुवा आणि दुसऱ्या दिवशी तेल लावून मग शाम्पू करा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't throw away Valentine's roses! Make effective hair dye.

Web Summary : Transform Valentine's Day roses into natural hair dye to combat premature graying. Avoid harsh chemicals; use rose petals, tea, beetroot, and henna for vibrant, healthy hair. A simple, effective home remedy.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी