बदललेली लाईफस्टाईल, वाढता स्ट्रेस आणि पोषणमूल्यांची कमतरता यांसारख्या अनेक कारणांमुळे केस पांढरे होण्याची समस्या आजकाल तरुण वयातच सतावते. डोक्यावर पांढरे केस दिसणे, फारसे कुणालाच आवडत नाही. पांढरे केस लपवण्यासाठी प्रत्येकजण अनेक प्रयत्न करतात, कुणी मेहेंदी लावतात तर कुणी डाय तर कुणी हेअर कलर पण या सगळ्याचा परिणाम हा केवळ तात्पुरताच असतो. केसांना रंग देण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर कलर आणि डायमध्ये अनेकदा हानिकारक रसायने असतात, ज्यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते. केसांच्या या समस्येवर सुरक्षित आणि असरदार असा खास घरगुती पारंपरिक उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो(homemade herbal hair dye for white hair).
आयुर्वेदात सांगितलेल्या काही सोप्या घरगुती उपायांमुळे केसांना पोषण मिळतं, केसांची मुळे मजबूत होतात आणि हळूहळू पांढऱ्या केसांची समस्या कमी होण्यास मदत होते. नॅचरोपॅथी फिजिशियन डॉक्टर नवनीत कौर भाटिया यांनी (how to make natural dye for premature grey hair at home) पांढरे केस काळे करण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील नेमका कोणता (home remedies for premature grey hair) घरगुती उपाय सांगितला आहे ते पाहूयात.
पांढरे केस नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी घरगुती उपाय...
घरगुती उपाय म्हणून हेअर डाय करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी १ टेबलस्पून कालोंजी, आवळा पावडर, भृंगराज पावडर इतक्या ३ पदार्थांची गरज लागणार आहे.
घरगुती नैसर्गिक हेअर डाय तयार करण्याची आणि वापरण्याची पद्धत...
सर्वात आधी १ चमचा कलोंजी मंद आचेवर हलकी भाजून घ्या. ती थंड झाल्यावर, त्याची बारीक पावडर तयार करा. या कलोंजी पावडरमध्ये १ चमचा आवळा पावडर आणि १ चमचा भृंगराज पावडर व्यवस्थित मिसळा. या सुक्या पावडरला पाणी किंवा चहा पावडरच्या पाण्यासोबत मिसळून त्याचा जाडसर लेप तयार करा. हा लेप केस धुण्यापूर्वी १ तास आधी पांढऱ्या केसांवर आणि मुळांवर व्यवस्थित लावा. तासाभरानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या, शाम्पूचा वापर करु नये. या लेपचा वापर आठवड्यातून दोनदा करा.
ओघळलेले स्तन सुडौल होण्यासाठी घरीच करा ३ सोपे व्यायाम ! परफेक्ट फिगर दिसेल सुंदर...
हा घरगुती उपाय केसांसाठी कसा आहे असरदार...
कलोंजी, आवळा आणि भृंगराज हे तिन्ही पदार्थ आयुर्वेदात केसांसाठी अमृत मानल्या गेल्या आहेत. या खास करून पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आणि मुळे मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. जर या तिन्ही गोष्टी एकत्र करून वापरल्या गेल्या, तर त्या मेलेनिनचे उत्पादन वाढवण्यास आणि मुळांना पोषण देण्यास मदत करतात.
१. आवळा :- आवळा हा व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे. हा केसांच्या पेशींमध्ये मेलेनिनचे उत्पादन वाढवतो. यामुळे स्काल्पवर होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण (Oxidative Stress) कमी करतो, जो केस वेळेपूर्वी पांढरे होण्याचे मुख्य कारण आहे.
२. भृंगराज :- भृंगराज केसांसाठी फायदेशीर मानले जाते. भृंगराजचे तेल आणि पावडर पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या गडद आणि काळा रंग देतात. हे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळते. यामुळे केस निरोगी होतात आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवतात.
३. कलोंजी :- कलोंजीमध्ये लिनोलिक ॲसिड ओमेगा ३ (Omega 3) आणि ओमेगा ६ फॅटी ॲसिड (Omega 6 Fatty Acid) असतात, जे मुळांना पोषण देतात. कलोंजीमध्ये असलेले पोषक घटक केस काळे करणाऱ्या रंगद्रव्याला टिकवून ठेवतात, ज्यामुळे हळूहळू पांढरे केस काळे होऊ लागतात.
Web Summary : Combat grey hair with a natural home remedy using kalonji, amla, and bhringraj powders. This Ayurvedic blend nourishes hair follicles, boosts melanin production, and gradually restores natural black color. Regular use promotes healthier, darker hair, reversing premature greying effectively.
Web Summary : कलौंजी, आंवला और भृंगराज पाउडर से बने प्राकृतिक घरेलू उपाय से सफेद बालों से छुटकारा पाएं। यह आयुर्वेदिक मिश्रण बालों के रोम को पोषण देता है, मेलेनिन उत्पादन को बढ़ाता है और धीरे-धीरे प्राकृतिक काला रंग लौटाता है। नियमित उपयोग से बाल स्वस्थ और काले होते हैं।