Join us
Daily Top 2Weekly Top 5

कशाला महागडे हेयर डाय पाहिजेत? डाळिंब - बिटाचा घरीच तयार करा केसांसाठी मस्त बरगंडी रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2026 12:43 IST

How to Make Natural Burgundy Hair Colour at Home?: मेहेंदी लावून केसांना येणारा लालसर रंग आवडत नसेल तर आता पुढील पद्धतीने केसांसाठी उत्तम दर्जाचा बरगंडी रंग घरीच तयार करून पाहा...(home hacks to make burgundy hair colour at home)

ठळक मुद्देकेसांना छान बरगंडी रंग येईल. महागडे हेअर डाय किंवा हेअर कलर वापरण्याची गरजच नाही. 

वयानुसार केस पांढरे होत असतील तर त्यात काही लाजण्यासारखं नाही. पण हल्ली मात्र बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होत आहे. त्यामुळेच तर कमी वयातही केस पांढरे व्हायला लागलेले आहेत. केस पांढरे झाले की त्याचा परिणाम आपल्या लूकवरही होताेच. त्यामुळेच पांढरे केस लपविण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. आता पांढरे केस रंगविण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे केसांना मेहेंदी लावणे. पण मेहेंदी लावणं हे खूप जणांना किचकट आणि वेळखाऊ वाटतं. शिवाय मेहेंदीमुळे येणारा लालसर रंगही कित्येकांना आवडत नाही (How to Make Natural Burgundy Hair Colour at Home?). म्हणूनच आता पुढे सांगितलेला एक सोपा उपाय पाहा आणि पांढरट झालेले केस रंगवा.. हा उपाय केल्यास केसांना छान बरगंडी रंग येईल...(home hacks to make burgundy hair colour at home)

 

केसांना बरगंडी रंग येण्यासाठी उपाय

हा उपाय करण्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये एखाद्या डाळिंबाचं साल, १ किसलेलं बीट तसेच डाळिंबाचे २ ते ३ चमचे दाणेही घाला.

पाठदुखी, कंबरदुखीने हैराण; पण व्यायामाला वेळ नाही? रात्री अंथरुणावर पडूनच करा ३ व्यायाम, दुखणं गायब

आता यामध्ये १ चमचा मेथी दाणे, १ चमचा कलौंजी घाला. जास्वंदाच्या फुलांचा आणि पानांचा वापरही आपल्याला करायचा आहे. त्यासाठी जास्वंदाची ४ ते ५ फुलं आणि ७ ते ८ पानं हातानेच बारीक चुरून घ्या आणि ती देखील उकळत्या पाण्यामध्ये घाला.

 

आता यामध्ये आपल्याला कडिपत्त्याची १० ते १५ पानं घालायची आहेत. आता हे सगळे पदार्थ घातलेलं पाणी उकळवून घ्या. पाण्याला काळसर रंग आला की गॅस बंद करा. आता हे पाणी थंड होऊ द्या.

कैरी आणि कच्च्या कांद्याची चटपटीत इंस्टंट चटणी- अशी चवदार की भाजी, आमटीची आठवणही येणार नाही

त्यामध्ये मेहेंदीची पावडर आणि कोरफडीचा गर घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की हा लेप केसांना लावा. 

साधारण दिड ते दोन तासांनी केस धुवून टाका. केसांना छान बरगंडी रंग येईल. महागडे हेअर डाय किंवा हेअर कलर वापरण्याची गरजच नाही. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Natural Burgundy Hair Color: DIY Pomegranate and Beetroot Hair Dye

Web Summary : Cover gray hair naturally with a homemade burgundy dye. Use pomegranate, beetroot, hibiscus, and curry leaves. Boil, mix with henna and aloe vera, apply for two hours, and rinse for vibrant color.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी