Join us

मूठभर कडूनिंबाची पानं आणि वाटीभर तूप, फक्त १५ मिनिटांत करा डोळ्यांसाठी गारेगार औषधी काजळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 14:14 IST

How To Make Homemade Neem Kajal : Homemade Neem Leaves Kajal : How to make Kajal at Home With Neem Leaves : घरच्याघरीच कडुलिंबाच्या पानांचे काजळ कसे तयार करायचे ते पाहा.

आपले डोळे सुंदर, काळेभोर आणि उठावदार दिसावेत यासाठी अनेकजणी डोळ्यांना काजळ लावतात. डोळ्यांना काजळ लावल्याने डोळ्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडते. आपल्यापैकी अनेकजणी रोजच्या वापरात मेकअप करताना आवर्जून काजळ न विसरता लावतात. बहुतेकवेळा आपण डोळ्यांसाठी विकतचेच काजळ ( Homemade Neem Leaves Kajal) लावण्याचा सोपा पर्याय निवडतो. परंतु या विकतच्या काजळामध्ये (How to make Kajal at Home With Neem Leaves) आर्टिफिशियल रंग, किंवा ते पसरु नये डोळ्यांवर बराच काळ तसेच टिकून राहावे म्हणून वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर केलेला असतो. असे हे केमिकल्सयुक्त आणि हानिकारक रसायन, आर्टिफिशियल रंग असणारे काजळ डोळ्यांना हानिकारक ठरु शकते. यासाठीच, डोळ्यांना घरगुती व पारंपरिक पद्धतीने तयार केलेले काजळ लावणे केव्हाव्ही उत्तमच(How To Make Homemade Neem Kajal).

घरगुती पद्धतीने तयार केलेले काजळ डोळ्यांना थंडावा देते, डोळ्यांच्या आरोग्यास पोषक ठरते आणि बाजारात मिळणाऱ्या रासायनिक काजळांपेक्षा अधिक सुरक्षित असते. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि डोळ्यांना थंडावा देणारे गुणधर्म असतात. यासाठीच, घरच्याघरीच आपण अगदी सहज पारंपरिक पद्धतीने कडुलिंबाच्या पानांचे काजळ तयार करु शकतो. घरगुती पारंपरिक पद्धतीने कडुलिंबाच्या पानांचे काजळ कसे तयार करायचे ते पाहा.    

साहित्य :- 

१. कडुलिंबाची पाने - १० ते १२ पाने २. कापसाची अरुंद पट्टी - १ मोठी अरुंद पट्टी ३. खोबरेल तेल - ३ ते ४ थेंब ४. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून 

घनदाट- काळ्याभोर लांबसडक केसांसाठी मोहरीच्या तेलात मिसळा ३ पदार्थ, केसांचं रुपच पालटेल...

केसांना टोकं फुटल्यामुळे सतत केस कापता? १ घरगुती हेअर मास्क - स्प्लिट एंड्स होतील कमी...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी कापसाची एक मोठी अरुंद पट्टी घेऊन ती व्यवस्थित अंथरुन घ्यावी. २. आता या कापसाच्या पट्टीवर कडुलिंबाची ताजी हिरवीगार पाने एक - एक करून व्यवस्थित ठेवून द्यावीत. ३. त्यानंतर या कापसाच्या अरुंद व लांब पट्टीला गोलाकार आकारात गोल गुंडाळून त्याचा रोल करून घ्यावा. ४. आता या रोलला कात्रीच्या मदतीने मध्ये कापून त्याचे मध्यम आकाराचे छोटे तुकडे करून घ्यावेत. या तुकड्यांना हलकेच हाताने दाब देत वातींसारखे वळून घ्यावे. 

नको शाम्पू, नको तेल, विसरा महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स ! खा फक्त डार्क चॉकलेट - केसांच्या समस्या गायब...

४. आता एका मातीच्या दिव्यात या कडुलिंबाची पाने गुंडाळलेल्या कापसाच्या वाती ठेवून त्यात साजूक तूप ओतावे. ५. या तयार दिव्याच्या बाजूला दोन भांडी ठेवून त्यावर अलगद एक भांड उलटे ठेवावे. त्यानंतर या कापसाच्या वाती पेटवून घ्याव्यात. ६. १५ ते २० मिनिटे तसेच ठेवून उलटे ठेवलेल्या भांड्यावर काजळी जमा होऊ द्यावी. ७. काजळी जमा झाल्यानंतर हे तयार काजळ खरवडून घ्यावे. हे खरवडून काढलेले काजळ एका बाऊलमध्ये घेऊन त्यात खोबरेल तेलाचे ३ ते ४ थेंब घालावेत.८. तयार काजळ एका छोट्या डबीत स्टोअर करून ठेवावे.  

घरगुती आणि औषधी असे कडुलिंबाच्या पानांचे काजळ वापरण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सडोळ्यांची निगामेकअप टिप्सहोम रेमेडी