सध्याच्या धावपळीच्या जगात वाढते प्रदूषण आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केस विंचरताना खूप केस गळतात, अकाली पांढरे होतात किंवा केसांची वाढ खुंटते. या समस्यांमुळे अनेकदा मानसिक ताणाला सामोरे जावे लागते.(Hair fall remedy) बाजारात मिळणारे महागडे तेल, शाम्पू आणि हेअर ट्रिटमेंट्स केल्यानंतरही केस अधिक गळतात. यात असणाऱ्या रसायनांमुळे केसांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. यावेळी आजी-आजोबांच्या काळातील नैसर्गिक उपायच खऱ्या अर्थाने आपल्या केसांचे आरोग्य सुधारते. (Homemade hair tonic)अलीकडेच प्रसिद्ध सोशल मीडिया क्रिएटर मानसी शर्मा हिने शेअर केलेला रोझमेरी आणि खोबरेल तेलाचा उपाय इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.(Natural hair growth) हे केवळ तेल नसून केसांसाठी एक मॅजिकल टॉनिक आहे असं म्हटलं जात. नियमितपणे याचा वापर केल्यास केसगळती तर थांबेल तसेच केस देखील वाढण्यास मदत होईल. हे टॉनिक कसं बनवाचं पाहूया.
साधी साडी- लूक रॉयल! कस्टमाइज्ड स्टोन वर्क ब्लाऊजचे एकापेक्षा एक भारी पॅटर्न
हे हेअर टॉनिक बनवण्यासाठी मेथीचे दाणे, रोझमेरीचे पाने, अळशीच्या बिया, सुकवलेला आवळा, नारळाचे तेल आणि पाणी लागेल. हेअर टॉनिक बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये पाणी गरम करा. त्यात मेथीचे दाणे, रोझमेरी पाने, आवळा आणि अळशी घाला. हे पाणी उकळून घ्यावं लागेल. आता उकळलेल्या पाण्यात नारळाचे तेल घाला. हे सीरम आठवड्यातून ३ वेळा केसांना लावल्यास फायदा होईल.
रात्री झोपण्यापूर्वी हे तेल हलके कोमट करा. आपल्या बोटांच्या मदतीने केसांच्या मुळाशी गोलाकार हालचालीत १०-१५ मिनिटे मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूचे रक्ताभिसरण सुधारते आणि रोझमेरीचा अर्क केसांच्या मुळांपर्यंत खोलवर जातो. रात्रभर हे टॉनिक केसांवर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शाम्पूने केस धुवा.
जर आपण आठवड्यातून दोनदा या टॉनिकचा नियमित वापर केला, तर महिन्याभरात केसांच्या गुणवत्तेत कमालीचा फरक पाहायला मिळतो. यामुळे केस लांबच होत नाहीत, तर ते दाट, काळे आणि चमकदारही दिसू लागतील.
Web Summary : Combat hair fall with a homemade tonic! Manasi Sharma's rosemary and coconut oil recipe strengthens hair. Boil fenugreek, rosemary, amla, flax seeds, and coconut oil in water. Apply thrice weekly, massage before bed, and wash off in the morning for best results.
Web Summary : घर के बने टॉनिक से बालों के झड़ने से लड़ें! मानसी शर्मा की रोज़मेरी और नारियल तेल की रेसिपी बालों को मजबूत करती है। मेथी, रोज़मेरी, आंवला, अलसी के बीज और नारियल तेल को पानी में उबालें। सर्वोत्तम परिणामों के लिए सप्ताह में तीन बार लगाएं, सोने से पहले मालिश करें और सुबह धो लें।