Join us
Daily Top 2Weekly Top 5

केसांचा अंबाडा दिसेल मोठा- भरगच्च, कुंडीतल्या हिरव्या पानांचे बनवा हेअर सिरम- केस होतील मुलायम चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2026 12:07 IST

hair growth serum: homemade hair serum: natural hair care: आपल्या बागेत किंवा कुंडीत असलेल्या कढीपत्त्याच्या पानांमध्ये केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय दडलेला आहे.

सध्या केस गळणं, केस पातळ होणे, अंबाडा छोटा दिसणे ही समस्या अनेक महिलांना भेडसावत आहे. महागडे हेअर सिरम्स, तेलं, स्पा ट्रीटमेंट करुनही केसांची वाट लागते.(hair growth serum) केमिकलयुक्त प्रॉडक्ट्समुळे केस आणखी कोरडे, निस्तेज होतात. अनेकांना असं वाटतं आपण सुंदर दिसावं यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात.( homemade hair serum) केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत आरोग्याची विशिष्ट काळजी घेतात. केस सुंदर दिसावे यासाठी हेअर कलर, सिरम किंवा विविध गोष्टींचा वापर केला जातो. (natural hair care)आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे केसांच्या समस्या वाढल्या आहेत. केस गळणे, अकाली पांढरे होणे आणि केसांचा पोत खराब होणे या सामान्य तक्रारी आहेत. अशावेळी आपण तेल, सिरमचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. सीरममुळे केस चमकदार तर होतात पण केसांवर त्यांचा अधिक दुष्परिणाम होतो. पण घरी तयार केलेलं सिरम केसांचा पोत सुधारण्यास आणि चमकदार करण्यास मदत करतो. अनेकदा महागड्या ट्रीटमेंट करूनही हवा तसा परिणाम मिळत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या बागेत किंवा कुंडीत असलेल्या कढीपत्त्याच्या पानांमध्ये केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय दडलेला आहे. 

रोज खा 'या' पिठाची चपाती, पोटाचा घेर होईल कमी- महिनाभरात दिसेल फरक; वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय

कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात 'बी-कॉम्प्लेक्स' जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक केसांच्या मुळांना पोषण देतात आणि 'मेलॅनिन' टिकवून ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत. यातील अमिनो ॲसिड केसांची वाढ वेगाने करते, ज्यामुळे आपल्या केसांचा अंबाडा नैसर्गिकरित्या मोठा आणि दाट दिसू लागतो.

केसांसाठी नैसर्गिक सिरम बनवण्यासाठी आपल्याला चहा पावडर, कढीपत्ता आणि मेथी दाणे लागतील. सगळ्यात आधी आपल्याला एका पॅनमध्ये पाणी गरम करावे लागेल. त्यात चहा पावडर, मेथीचे दाणे घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात कढीपत्ता घाला. थोड्यावेळाने गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर बाटतील हे सिरम भरुन ठेवा. केस धुण्यापूर्वी दोन तास आधी हे सिरम आपल्या केसांवर स्प्रे करा. 

हा सिरम केसांना आठवड्यातून तीन वेळा लावल्याने केसगळती थांबेल. तसेच यात असणारे घटक केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतात. केस जाड होतील, केसांचा गुळगुळीतपणा वाढून ते मऊ होतील. इतकंच नाही तर केसांची लांबी देखील वाढेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Curry Leaves Hair Serum: For Thicker, Shinier, Longer Hair

Web Summary : Battling hair fall and thinness? Skip expensive products. A homemade curry leaf serum, rich in vitamins and antioxidants, strengthens hair roots, promotes growth, and adds shine. Use it thrice weekly for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी