Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > १० रुपयांपेक्षा कमी खर्चात होईल मेहेंदीची हेअर डाय पावडर! पांढरे केस होतील काळेभोर - बरेच दिवस टिकेल रंग...

१० रुपयांपेक्षा कमी खर्चात होईल मेहेंदीची हेअर डाय पावडर! पांढरे केस होतील काळेभोर - बरेच दिवस टिकेल रंग...

how to make homemade hair dye from mehendi powder : mehendi powder hair dye recipe : natural hair dye using henna powder : homemade herbal hair dye powder : वाटीभर मेहेंदीची करा वर्षभर पुरणारी हेअर डाय पावडर! केसांना मिळेल रंग, पोषण - केस राहतील हेल्दी - शायनी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2026 16:40 IST2026-02-18T16:40:00+5:302026-02-18T16:40:02+5:30

how to make homemade hair dye from mehendi powder : mehendi powder hair dye recipe : natural hair dye using henna powder : homemade herbal hair dye powder : वाटीभर मेहेंदीची करा वर्षभर पुरणारी हेअर डाय पावडर! केसांना मिळेल रंग, पोषण - केस राहतील हेल्दी - शायनी...

how to make homemade hair dye from mehendi powder mehendi powder hair dye recipe natural hair dye using henna powder homemade herbal hair dye powder | १० रुपयांपेक्षा कमी खर्चात होईल मेहेंदीची हेअर डाय पावडर! पांढरे केस होतील काळेभोर - बरेच दिवस टिकेल रंग...

१० रुपयांपेक्षा कमी खर्चात होईल मेहेंदीची हेअर डाय पावडर! पांढरे केस होतील काळेभोर - बरेच दिवस टिकेल रंग...

वयोमानानुसार केस पांढरे होणं सहाजिकच आहे, पण वयाआधीच डोक्यावर पांढरे केस दिसू लागले की, ही अनेकांना लाजिरवाणी गोष्ट वाटते. कमी वयातच केस पांढरे दिसू नयेत म्हणून आपण अनेक उपाय करून पाहतो. यातही सगळ्यात सोपा आणि इन्स्टंट खात्रीशीर उपाय म्हणजे केसांना हेअर कलर किंवा डाय लावणं. केसांना डाय आणि हेअर कलर लावून ते रंगवणं जितकं सोपं तितकंच, हा उपाय केसांचे आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकतो.  आपण बाजारात मिळणारे महागडे आणि केमिकल युक्त हेअर डाय वापरतो, ज्यामुळे केस तात्पुरते काळे होतात खरे, पण कालांतराने ते अधिक कोरडे आणि निर्जीव होतात. केसांना वारंवार केमिकल्सयुक्त डाय लावल्याने केसांचे नैसर्गिक सौंदर्य हळूहळू हरवून जाते. यासाठीच, पांढरे केस काळे करण्यासाठी नैसर्गिक, घरगुती उपाय करणं केव्हाही फायदेशीर ठरतं(how to make homemade hair dye from mehendi powder).

जर आपल्याला केस कोणत्याही साईड इफेक्टशिवाय नैसर्गिकरित्या काळेभोर आणि चमकदार करायचे असतील, तर मेहंदी आणि काही खास औषधी घटकांपासून तयार केलेली 'होममेड हेअर डाय पावडर' केसांसाठी वरदान ठरेल. या पावडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ही पूर्णपणे नैसर्गिक असून आपण ती एकदाच बनवून (natural hair dye using henna powder) महिनाभर सहज स्टोअर करुन ठेवू शकतो. मेहेंदी पावडर यांसारख्या नॅचरल व औषधी घटकांमुळे ही पावडर केवळ केसांना रंगच देत नाही, तर त्यांना मुळांपासून मजबूतही करते. नैसर्गिक हेअर डाय पावडर योग्य पद्धतीने वापरल्यास केसांवरील रंग अधिक काळ टिकण्यासही (homemade herbal hair dye powder) मदत होते. सोबतच, केसांना चमक, मजबुती आणि हेल्दी लूक देण्यास मदत करते. ही जादूई पावडर कशी तयार करायची आणि तिचा वापर कसा करायचा ते पाहूयात... 

मेहेंदी पावडरपासून महिनाभर टिकणारे हेअर डाय कसे करायचे ? 

१. पाणी - २ ते ३ कप 
२. चहा पावडर - २ टेबलस्पून 
३. मेहेंदी पावडर - ४ ते ५ टेबलस्पून 
४. मेथी दाण्यांची पावडर - २ टेबलस्पून 
५. बीटरुटची ड्राय पावडर - २ टेबलस्पून 
६. आवळा पावडर - २ टेबलस्पून
७. कलोंजी बिया - २ टेबलस्पून  
८. कॉफी पावडर - १ टेबलस्पून

मेहेंदी पावडरपासून करा हेअर डाय... 

एका लोखंडी कढईत गरम करून गाळून घेतलेलं चहा पावडरच पाणी ओतावं. त्यानंतर त्यात मेहेंदी पावडर, मेथी दाण्यांची पावडर, बीटरुटची ड्राय पावडर, आवळा पावडर, कलोंजी बिया, कॉफी पावडर असे सगळे घटक घालावेत. त्यानंतर चमच्याने सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. मग चमच्याच्या मदतीने ही कढईतील तयार मेहेंदीची पेस्ट संपूर्ण कढईत व्यवस्थित पसरवून २ ते ३ दिवस पूर्णपणे सुकेपर्यंत तशीच ठेवून द्यावी. ही पेस्ट संपूर्णपणे सुकल्यावर चमच्याने खरवडून कढईपासून वेगळी करून घ्यावी. मग हे मेहेंदीच्या मिश्रणाचे सुकलेले तुकडे मिक्सरमध्ये घालून ते बारीक वाटून त्याची पूड तयार करून घ्यावी. ही तयार पूड बारीक जाळीदार गाळणीने गाळून घ्यावी. मग मेहेंदी पासून तयार केलेली ही घरगुती, नॅचरल डाय पावडर एका काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवावी. आपल्याला हवा तसा आपण या हेअर डाय पावडरचा वापर करु शकतो. 

शिवजयंती विशेष : चंद्रकोर कडीयाल पैठणीचा शाही थाट, नऊवारी नेसा किंवा सहावारी ! रुप सुंदरच...

किती दिवस उशीरा आली मासिक पाळी तर 'नॉर्मल' समजायचे? पाळी नियमित येण्यासाठी करा ३ गोष्टी...

याचा वापर कसा करावा... 

हेअर डाय गरजेनुसार एका बाऊलमध्ये घेऊन त्यात आपण आपल्या आवडीनुसार, दही, चहा पावडरचे पाणी किंवा साधं पाणी घालून इन्स्टंट हेअर डाय तयार करू शकता. तयार हेअर डायची पेस्ट ब्रशच्या मदतीने केसांवर लावून २ ते ३ तास तशीच ठेवून द्यावी. मग पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. केसांवर हा डाय लावताना केसांना तेल लावलेल नसावं.  

मैत्रिणीने केलं तेच महागडंं फेशियल कराल तर पस्तावाल, ‘असं’ ओळखा तुमच्या त्वचेसाठी कोणतं फेशियल योग्य...


घरगुती, नॅचरल हेअर डाय लावण्याचे फायदे... 

१. यात अमोनिया किंवा कोणतेही घातक रसायन नसल्याने केसांचे नुकसान होत नाही.

२. आवळा पावडर आणि मेथी दाण्यांमुळे केसांची मुळे घट्ट होतात आणि केसगळती कमी होते.

३. बीटरूट आणि कॉफीमुळे केसांना एक नैसर्गिक गडद रंग आणि सुंदर चमक मिळते.

४. मेहंदी आणि दही केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करतात.

५. लोखंडी कढईत तयार केल्यामुळे हा रंग केसांवर जास्त काळ टिकतो.

Web Title : 10 रुपये से कम में मेहंदी हेयर डाई पाउडर! सफेद बाल होंगे काले!

Web Summary : मेहंदी, चुकंदर और अन्य सामग्री से प्राकृतिक हेयर डाई पाउडर बनाएं। यह घरेलू उपाय बालों को मजबूत करता है, चमक लाता है और सफेद बालों को प्रभावी ढंग से ढकता है। इसे एक महीने तक स्टोर करें।

Web Title : DIY Mehndi Hair Dye Powder for Gray Hair Under 10 Rupees!

Web Summary : Make natural hair dye powder with henna, beetroot, and other ingredients. This homemade remedy strengthens hair, adds shine, and covers gray hair effectively. Store for a month.