Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस गळणं थांबून केस लागतील चमकायला, पाहा घरगुती जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर-लांबसडक केसांचं सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2026 16:19 IST

hibiscus and gondkatira hair conditioner : homemade hibiscus hair conditioner : how to make hibiscus & gondkatira hair conditioner : जास्वंदीच्या फुलांपासून तयार केलेले नॅचरल कंडिशनर केसांना मऊ, चमकदार आणि मजबूत करण्यास मदत करते.

केसांचे आरोग्य व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी, शाम्पू करण्यासोबतच कंडिशनिंग करणे देखील गरजेचे असते. केसांच्या सौंदर्यासाठी आपण हजारो रुपये पार्लरमध्ये खर्च करतो, इतकंच नाही तर केसांसाठी अनेक वेगवेगळे उपाय करुन पाहतो. पण कधी विचार केलाय का, की आपल्या बागेत असणारे आणि देवाला  वाहिले जाणारे लालचुटुक 'जास्वंदाचे फूल' केसांसाठी वरदान ठरु शकते. जास्वंदीचे फूल हे केसांसाठी अतिशय गुणकारी मानले जाते. आयुर्वेदामध्ये जास्वंदीला नॅचरल हेअर केअरचा विशेष घटक म्हणून मानले जाते. जास्वंदीच्या फुलांपासून तयार केलेले नॅचरल कंडिशनर केसांना मऊ, चमकदार आणि मजबूत बनवण्यास मदत करते. केमिकल्स नसल्यामुळे हे कंडीशनर स्काल्पचे पोषण करून केसांची वाढ सुधारते आणि ड्रायनेस कमी करते(how to make hibiscus & gondkatira hair conditioner).

पूर्वीच्या काळात आजी-आजोबांच्या घरात जास्वंदीचा वापर केस मऊ, दाट आणि काळेभोर ठेवण्यासाठी केला जायचा. जास्वंदीच्या फुलांपासून तयार होणारं नॅचरल कंडीशनर (hibiscus and gondkatira hair conditioner) केसांना सिल्की, शायनी करते. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा घरगुती उपाय तुमच्या केसांचा पूर्ण लूकच बदलून टाकतो. कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी जास्वंद हे एखाद्या 'मॅजिक' सारखं काम करतं.जास्वंदाच्या फुल - पानांमध्ये नैसर्गिक 'म्युसिलेज' (Mucilage) असते, जे केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करते. जर तुम्हालाही केसांचा हरवलेला नॅचरल ग्लो परत मिळवायचा असेल, तर जास्वंदाच्या (homemade hibiscus hair conditioner) फुलांपासून घरच्याघरीच कंडीशनर कसे तयार करायचे ते पाहूयात. 

जास्वंदीच्या फुलांपासून केसांसाठी करा नॅचरल हेअर कंडीशनर... 

१. जास्वंदीची फुलं - १५ ते २० (ताजी लालचुटुक जास्वंदीची फुलं)२. अळशीच्या बिया - २ ते ३ टेबलस्पून३. डिंक - २ टेबलस्पून४. पाणी - ३ ते ४ ग्लास

जास्वंदीच्या फुलांचे हेअर कंडीशनर कसे करावे ? 

सगळ्यांत आधी जास्वंदीच्या फुलांचे देट काढून फुलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये ही फुलं घेऊन ती संपूर्णपणे पाण्यांत भिजतील अशी रात्रभर किंवा ६ ते ७ तास भिजवून घ्यावी. दुसऱ्या एका बाऊलमध्ये अळशीच्या बिया घेऊन त्या देखील पाण्यात भिजत ठेवाव्यात. त्यानंतर एका बाऊलमध्ये डिंकाचे खडे देखील भिजवून घ्यावेत. दुसऱ्या दिवशी सगळ्या घटक पदार्थांमधील पाणी निथळून, सगळे घटक मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात एकत्रित करून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यावी, या तयार पेस्टमध्ये जास्वंदीची फुल रात्रभर भिजत ठेवलेलं पाणी घालून चमच्याने हे सगळे कालवून एकजीव करून घ्यावं. केसांसाठी घरगुती जास्वंदीच्या फुलांचे कंडीशनर वापरण्यासाठी तयार आहे. हे तयार कंडीशनर आपण एका काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवावे. आपण गरजेनुसार केसांसाठी हे कंडीशनर वापरु शकता.  

१० रुपयांपेक्षा कमी खर्चात होईल मेहेंदीची हेअर डाय पावडर! पांढरे केस होतील काळेभोर - बरेच दिवस टिकेल रंग...

दिसते चंद्राची कोर साजिरी..! चंद्रकोर नेकलेसचे पाहा सुंदर डिझाईन्स - सौंदर्य खुलवणारा पारंपरिक दागिना...

याचा वापर कसा करावा ? 

केस शाम्पूने स्वच्छ धुतल्यानंतर हे तयार कंडीशनर स्काल्पपासून केसांच्या खालच्या टोकांपर्यंत लावून २ ते ३ सेकंद हलकेच हाताने मसाज करून घ्यावा. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. 

घरगुती हेअर कंडीशनर वापरण्याचे फायदे... 

१. हे कंडिशनर केसांच्या मुळांना मजबूती देते, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण फार कमी होते.

२. जास्वंदातील 'म्युसिलेज' घटकामुळे कोरड्या आणि निर्जीव केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो, ज्यामुळे केस मऊ आणि रेशमी होतात.

३. डिंक आणि जास्वंद स्काल्पला थंडावा देतात, ज्यामुळे खाज किंवा कोंड्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.

४. अळशीच्या बिया आणि जास्वंद यांच्या मिश्रणामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या दूर होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Hibiscus & Gum Hair Conditioner: Stop Hair Fall & Add Shine!

Web Summary : Hibiscus flower conditioner makes hair soft, shiny, and strong. The natural mucilage nourishes the scalp, reduces dryness, and promotes hair growth. This DIY conditioner uses hibiscus, flax seeds, and gum for a magical transformation.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय