केसांचे आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी मेहेंदी हा पिढ्यापिढ्या चालत आलेला एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे. पांढरे केस लपवण्यासाठी असो किंवा केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी, आपण आवर्जून मेहेंदीचा वापर करतो. केसांसाठी मेहेंदी अतिशय फायदेशीरच मानली जाते. केसांसाठी मेहेंदी कितीही गुणकारी असली तरी मेहेंदी भिजवण्याची आणि ती केसांवर लावण्याची पद्धत अनेकदा चुकते...अनेकदा मेहेंदी लावूनही हवा तसा रंग येत नाही किंवा केस कोरडे पडतात. एवढंच नाही तर, केसांना फक्त मेहेंदी लावणं पुरेसे नसून ती योग्य पद्धतीने भिजवणेही तितकेच महत्त्वाचे असते(how to make henna paste for dark hair colour).
चुकीच्या पद्धतीने भिजवलेली मेहेंदी हवा तसा रंग देत नाही आणि तिचे पूर्ण पोषणदायी फायदेही केसांना मिळत नाहीत. यासाठीच, मेहेंदी भिजवताना त्यात कोणते घटक मिसळावेत, किती वेळ भिजवावी आणि केसांना मेहेंदी लावण्याची कोणती पद्धत वापरावी याची योग्य माहिती असणे गरजेचे असते. योग्य पद्धतीने भिजवलेली मेहेंदी (tips to get deep colour from mehendi) केसांना फक्त रंगच देत नाही, तर त्यांना नैसर्गिक चमक, मजबुती आणि (how to soak mehendi for best hair colour) चांगले आरोग्य व सौंदर्य मिळते. केसांना मेहेंदी लावताना ती नेमकी कशी तयार करावी, जेणेकरून केस नैसर्गिकरित्या काळे, मऊ आणि चमकदार होतील.
केसांसाठी मेहेंदी भिजवताना नेमकं काय करावं ?
१. सर्वप्रथम एका लोखंडी कढईत तुमच्या केसांच्या गरजेनुसार पाणी घ्या. त्यात थोडे रीठा, आवळा आणि शिकाकाई मिसळा. या तिन्ही नैसर्गिक गोष्टी केसांच्या मुळांना पोषण देतात, ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या मजबूत आणि चमकदार होतात.
२. त्यानंतर या पाण्यात एक ते दोन चमचे चहापावडर टाका. यामुळे केसांना एक सुंदर चमक येते. केसांच्या मजबुतीसाठी तुम्ही यात थोडे मेथी दाणे आणि कडीपत्ता देखील घालू शकता. कडीपत्त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
३. जर तुम्हाला केसांवर हलका लाल किंवा 'बरगंडी' रंग हवा असेल, तर एक बीट किसून त्याचा रस किंवा पेस्ट या मिश्रणात मिसळा. जर तुमचे केस खूप कोरडे असतील, तर बीटामुळे केसांना नैसर्गिक मऊपणा मिळण्यास मदत होते.
४. तयार केलेले पाणी मंद आचेवर चांगले उकळू द्या. पाण्याचा रंग गडद काळपट होईपर्यंत ते उकळावे. जेव्हा पाणी सुरुवातीच्या प्रमाणापेक्षा अर्धे उरेल, तेव्हा गॅस बंद करा. पाणी थोडे कोमट झाले की ते गाळून घ्या.
५. एका लोखंडी कढईत तुमच्या केसांच्या लांबीनुसार मेहेंदी पावडर घ्या. आता गाळलेल्या कोमट पाण्याने मेहेंदी भिजवा. पेस्ट बनवण्यासाठी साध्या पाण्याचा वापर अजिबात करू नका.
६. या पेस्टमध्ये थोडी कॉफी पावडर मिसळा. कॉफीमुळे केसांना दाट गडद रंग येतो आणि ती स्काल्पच्या आरोग्यासाठी उत्तम असते. यासोबतच, यात थोडे घट्ट दही आणि १ ते २ चमचे खोबरेल तेल घाला. यामुळे केस कोरडे पडत नाहीत, ते आतून मऊ होतात आणि त्यांना योग्य पोषण मिळते.
७. सर्व साहित्य एकत्र करून एकजीव पेस्ट तयार करा. ही कढई रात्रभर झाकून ठेवा. लोखंडी कढईमुळे रात्रभरात मेहेंदीचा रंग अधिक काळपट होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मेहेंदी स्वच्छ आणि कोरड्या केसांवर लावा. साधारण २ ते ३ तासांनी केस साध्या पाण्याने धुवून टाका.
लहान ब्रेस्ट साईजसाठी १० ग्लॅमरस ब्लाऊज नेकपॅटर्न्स! लूकच जाईल बदलून - साडीत दिसाल स्टायलिश...
किती वेळ लावून ठेवावी?
उन्हाळ्याच्या दिवसांत हवेत उष्णता असल्याने मेहेंदी लवकर सुकते, त्यामुळे ती जास्त वेळ लावून ठेवण्याची गरज नसते. साधारणपणे ३ ते ४ तास मेहेंदी केसांवर ठेवणे पुरेसे आहे, त्यानंतर केस धुवून टाकावेत. मेहेंदी लावल्यानंतर तुम्ही केसांवर पॉलिथिन किंवा शॉवर कॅप गुंडाळू शकता. यामुळे मेहेंदी जास्त कोरडी होत नाही, तिचा ओलावा टिकून राहतो आणि नंतर केस धुताना ती सहज निघते.
केसांवर मेहेंदीचा चांगला रंग येण्यासाठी मेहेंदी नेमकी कशी भिजवायची याची योग्य पद्धत surbhimaliktuli/reels या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे.
Web Summary : For naturally dark, soft, and shiny hair, enrich henna with reetha, amla, shikakai, tea powder, methi seeds, and curry leaves. Boil these, mix with henna powder, coffee, yogurt, and coconut oil. Apply for 2-3 hours.
Web Summary : प्राकृतिक रूप से काले, मुलायम और चमकदार बालों के लिए, मेंहदी को रीठा, आंवला, शिकाकाई, चाय पाउडर, मेथी दाना और करी पत्ते से समृद्ध करें। उबालकर, मेंहदी पाउडर, कॉफी, दही और नारियल तेल के साथ मिलाएं। 2-3 घंटे के लिए लगाएं।