Lokmat Sakhi >Beauty > केस भराभर पिकू लागले? 'या' पद्धतीने मेहेंदीचं तेल करून केसांना लावा, नॅचरली काळे होतील

केस भराभर पिकू लागले? 'या' पद्धतीने मेहेंदीचं तेल करून केसांना लावा, नॅचरली काळे होतील

Use Of Henna Oil For Naturally Black Hair: पांढऱ्या केसांवर मेहेंदीच्या तेलाचा हा खास उपाय एकदा करून पाहाच...(home hacks for naturally black and shiny hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 16:46 IST2025-08-07T16:45:57+5:302025-08-07T16:46:42+5:30

Use Of Henna Oil For Naturally Black Hair: पांढऱ्या केसांवर मेहेंदीच्या तेलाचा हा खास उपाय एकदा करून पाहाच...(home hacks for naturally black and shiny hair)

how to make henna oil for naturally black hair, how to get rid of black hair, home hacks for naturally black and shiny hair  | केस भराभर पिकू लागले? 'या' पद्धतीने मेहेंदीचं तेल करून केसांना लावा, नॅचरली काळे होतील

केस भराभर पिकू लागले? 'या' पद्धतीने मेहेंदीचं तेल करून केसांना लावा, नॅचरली काळे होतील

Highlightsहे तेल नियमितपणे वापरल्यास केस गळण्याचं प्रमाणही कमी होईल. 

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूप वाढली आहे. पांढऱ्या केसांचा रंग बदलण्यासाठी केसांना मेहेंदी लावण्याचा पारंपरिक उपाय तर आपल्याला माहितीच आहे. हा उपाय करण्यासाठी खूप वेळही लागतो आणि अनेकांना तो अतिशय किचकट वाटतो. म्हणूनच आता केसांना मेहेंदी लावण्यापेक्षा मेहेंदीचं तेल लावण्याचा एक साेपा आणि खूप प्रभावी असा उपाय करून पाहा (how to get rid of black hair?). हा उपाय करण्यासाठी घरच्याघरीच मेहेंदीचं तेल कसं तयार करायचं (how to make henna oil for naturally black hair?) आणि ते कोणत्या पद्धतीने केसांना लावायचं ते पाहूया..(home hacks for naturally black and shiny hair)

घरच्याघरी मेहेंदीचं तेल कसं तयार करायचं?

 

हा उपाय करण्यासाठी एका कढईमध्ये १ वाटी खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल यापैकी काहीही तुम्ही घेऊ शकता. जे काेणते तेल घ्याल त्यामध्ये २ चमचे मेहेंदीची पावडर टाका. हा उपाय करण्यासाठी बाजारात मिळणारी ऑर्गेनिक मेहेंदी वापरावी.

आता लोकांनी मुलं जन्मालाच घालू नयेत! ओटीटी स्टार शीबा चढ्ढाचं मत; इतका वैताग येतो कारण..

यानंतर कडिपत्त्याची १५ ते २० पाने घ्या आणि ती कुटून तेलामध्ये घाला. त्यासोबतच १ चमचा मेथ्या घ्या आणि त्या सुद्धा थोड्या कुटून तेलामध्ये टाका. आता हे सगळे पदार्थ एकत्र केलेली कढई गॅसवर गरम करायला ठेवा. तेल गरम होऊन १० ते १२ मिनिटे मंद आचेवर ते उकळवून घ्या.

 

यानंतर गॅस बंद करा. तेल थंड होऊ द्या. आणि त्यानंतर ते गाळून एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून दोन वेळा हे तेल केसांना लावून हलक्या हाताने केसांच्या मुळाशी मसाज करा. २ ते ३ तास तेल केसांवर तसेच राहू द्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. 

Rakhi Special Mehendi: भावाबहिणींची माया सांगणाऱ्या ८ सुंदर मेहेंदी डिझाईन्स- भावाच्या औक्षणासाठी सजतील हात

हा उपाय नियमितपणे केल्यास केसांचा रंग नैसर्गिकपणे बदलण्यास मदत होईल. मेहेंदी, कडिपत्ता, मेथ्या यांच्यातले पौष्टिक घटक केसांची मुळं पक्की करून केसांची चांगली वाढ होण्यासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामुळे हे तेल नियमितपणे वापरल्यास केस गळण्याचं प्रमाण कमी होईल. 


 

Web Title: how to make henna oil for naturally black hair, how to get rid of black hair, home hacks for naturally black and shiny hair 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.