Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेणी दिसते पातळ दोरीसारखी नाजूक ? केसांचा विरळपणा कमी करणारं घरगुती तेल - केसगळती थांबून वेणीही दिसेल जाडजूड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 15:54 IST

how to make hair thick and strong naturally : natural remedies for thick hair : केसांची वेणी जाडजूड, लांबसडक यावी म्हणून खास औषधी गुणधर्म असणारं घरगुती तेल...

केसांची लांबसडक, जाडजूड वेणी, काळेभोर केस… अशी प्रत्येकीचीच खास इच्छा असते. पण खरंतरं बऱ्याचजणींचे केस खूपच पातळ, नाजूक आणि विरळ असतात यामुळे मोठ्या हौसेनं वेणी घातली तरी ती बारीकच दिसते...अशावेळी आरशात स्वतःकडे पाहताना “आपली वेणी थोडी अजून भरदार, जाडजूड, घनदाट असती तर…” हा विचार अनेकजणींच्या मनात नक्कीच येतो. एकंदरीतच, वेणी घालायची म्हटलं की अनेकींना त्याच टेन्शनचं येतं. वेणी घातली तरी ती एखाद्या बारीक दोरीसारखी दिसते. अनेकजणी तर वेणी बारीक दिसते म्हणून ती घालणंच टाळतात आणि केस मोकळे सोडतात(how to make hair thick and strong naturally).

पातळ, बरीक वेणी दिसते म्हणून पण फक्त हेअरस्टाईल बदलून हा प्रश्न सुटत नाही...केसांना आतून मजबूत आणि घनदाट बनवणं हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं. यासाठी योग्य तेलाची निवड करणं गरजेचं ठरतं. निसर्गात अशी काही फायदेशीर तेलं आहेत जी केसांना मुळापासून पोषण देतात, त्यांची वाढ सुधारतात आणि हळूहळू केसांना दाट, जाडजूड बनवण्यास मदत करतात. मग नक्की कोणतं तेल वापरावं, जेणेकरून केस मजबूत, दाट आणि वेणीही भरदार दिसेल? 'लेवेसिया'चे (Levesia) संस्थापक, प्रसिद्ध अरोमा थेरपिस्ट आणि निसर्गोपचार तज्ज्ञ (Naturopathy Doctor) मनोज दास यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला एक खास उपाय पाहूयात...हा उपाय तुमचे केस आणि वेणी लांब, दाट आणि मजबूत करण्यासाठी (natural remedies for thick hair) अत्यंत फायदेशीर ठरेल. केसांची वेणी जाडजूड, लांबसडक आणि केसांचा रंग काळभोर होण्यासाठी हा उपाय नक्की करुन पाहा... 

केसांची वेणी जाडजूड, लांबसडक यावी म्हणून उपाय... 

डॉक्टरांनी असे स्पष्ट केले आहे की, अनेकदा महिला लांब आणि घनदाट केसांसाठी अत्यंत महागड्या हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करतात, परंतु कधीकधी आपल्याला खूप कमी खर्चातही सर्वोत्तम उपाय मिळू शकतो. असाच एक फायदेशीर उपाय म्हणजे 'भृंगराज पावडर'चा केसांसाठी वापरणे. भृंगराजला आयुर्वेदात 'केसराज' मानले जाते, कारण ते केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय ठरते.

उन्हाळ्यात केसांना तेल न लावण्याची चूक करु नका, पाहा उन्हाळ्यात केसांसाठी बेस्ट ५ तेल...

भृंगराज तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य... 

१. भृंगराज (अक्खा किंवा वाळलेला) - १०० ग्रॅम२. मोहरीचे तेल - ५०० मि.ली.३. ब्राह्मी - १०० ग्रॅम४. आवळा (वाळलेले तुकडे किंवा पावडर) - ५० ग्रॅम५. खोबरेल तेल - १ कप

वेणी जाडजूड करणारे 'भृंगराज तेल' कसे बनवाल? 

एका मोठ्या काचेच्या भांड्यात किंवा बाटलीत खोबरेल तेल घेऊन त्यात सर्व इतर साहित्य जसे की, भृंगराज, मोहरीचे तेल, ब्राह्मी, आवळा असे सगळे जिन्नस एकत्रित करून ठेवावे. मग बाटली असेल तर बाटलीचे झाकण लावून १५ ते २० दिवस ते तेल तसेच ठेवून द्यावं. यामुळे सर्व औषधी वनस्पतींचे अर्क तेलात व्यवस्थित उतरतील. १५ ते २० दिवस पूर्ण झाल्यानंतर हे तेल गाळून घेऊ नका. त्यातील जडीबुटी तेलातच राहू द्या, ज्यामुळे तेलाची गुणवत्ता टिकून राहील. जेव्हा तुम्हाला हे तेल लावायचे असेल, तेव्हा बरणीतून २ चमचे तेल बाहेर काढा. हे तेल केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत व्यवस्थित लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. तुम्ही जेव्हा नियमितपणे या तेलाचा वापर कराल, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच केसांमधील फरक जाणवू लागेल आणि तुमची वेणी नैसर्गिकरित्या जाडजूड आणि घनदाट होऊ लागेल.

उन्हाळ्यात लाडक्या लेकीच्या केसांना नेमकं कोणतं तेल लावावं? केसांची वाढ आणि थंडावा देणारे ३ पर्याय...

हे घरगुती औषधी भृंगराज तेल लावण्याचे फायदे... 

१. भृंगराजमध्ये अनेक पोषक तत्वे असतात, जी आपल्या 'हेअर फॉलिकल्स'ला आतून मजबूत करतात. 

२. हे तेल स्काल्प मधील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होण्यास मदत होते.

३. जर तुमचे केस खूप गळत असतील, तर भृंगराज तेल लावल्याने केस गळणे थांबते आणि केस दाट होतात.

४. स्काल्पवर होणारे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन किंवा खाज रोखण्यासाठी भृंगराजमधील घटक अत्यंत गुणकारी ठरतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade Bhringraj Oil for Thicker Hair and a Fuller Braid

Web Summary : Want thicker hair? Make Bhringraj oil! This Ayurvedic remedy strengthens hair, reduces hair fall, and promotes growth. Use regularly for a fuller braid.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय