Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस गळतात, शेपटीसारखे दिसतात? आयुर्वेदिक हर्बल शाम्पू करा घरीच, केसांच्या समस्या संपतील- होतील चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2025 15:03 IST

Ayurvedic herbal shampoo: Homemade herbal shampoo: Hair fall control remedies: घरच्या घरी आयुर्वेदिक पदार्थ वापरुन नॅचरल शाम्पू, कमी खर्चात कसा तयार करायचा पाहूया.

ऋतू कोणताही असला तरी केसांच्या समस्या काही संपत नाही. वाढते प्रदूषण, चुकीचे खाणेपिणे, बदलेली जीवनशैली, सतत कॅफिनचे सेवन यांचा आपल्या आरोग्यावर तर परिणाम होतोच पण त्यासोबतच केसांवर देखील परिणाम होतो.(Ayurvedic herbal shampoo) ज्यामुळे केस गळणे, विरळ होणे, केसांना फाटे फुटणे, सतत केस कोरडे पडणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (Homemade herbal shampoo)केसांना सॉफ्ट आणि शायनी बनवण्यासाठी आपण कायमच महागडे केमिकल्स ट्रिटमेंट, शाम्पूचा सतत वापर करत असतो.(Hair fall control remedies) आयनिंग आणि स्ट्रेनिंगमुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी त्या अधिकच वाढतात. ज्यामुळे केसगळती भयंकर वाढते. पण केसांसाठी केमिकल असणाऱ्या गोष्टी वापरण्याऐवजी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर केल्यास केसगळती रोखता येते.(Natural shampoo for hair fall) आयुर्वेदिक वनस्पती ह्या केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. यामुळे आपल्या टाळूची सुधारणा होते. आणि केसांची वाढ होऊन केसगळतीच्या समस्यांपासून सुटका होते. आपल्याला सतत केसगळतीचा सामना करावा लागत असेल तर घरच्या घरी आयुर्वेदिक पदार्थ वापरुन नॅचरल शाम्पू, कमी खर्चात कसा तयार करायचा पाहूया. ज्यामुळे केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते. 

नॅचरल शाम्पू तयार करण्यासाठी 

मेथी दाणे - १ वाटी अळशी - १ वाटी रोझमेरी - १ वाटी कढीपत्त्याची पाने - १ वाटी ग्लिसरीन बेस - १ मोठा चमचा पाणी - १ मोठा ग्लासशाम्पू कसा बनवाल? 

सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये मेथीचे दाणे, अळशी, रोझमेरी, कढीपत्त्याची पाने घेऊन त्यात पाणी घाला. हवं असल्यास आपण यात आवळा, शिकाकाई पावडर देखील घालू शकतो. पाणी व्यवस्थित उकळू द्या. पाणी आटल्यानंतर गाळून घ्या. नंतर यात ग्लिसरीन बेस घालून फेटून घ्या. ही पेस्ट जास्त पातळ आणि जास्त घट्ट ही नको. बाटलीत भरुन केस धुण्यासाठी याचा वापर करा. यात असणारे घटक केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. तसेच केमिकलयुक्त असल्यामुळे केसगळती होणार नाही. केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळेल. ज्यामुळे केसांची वाढ देखील लवकर होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Stop hair fall with homemade Ayurvedic herbal shampoo for shiny hair.

Web Summary : Combat hair problems with a homemade Ayurvedic shampoo. Chemical treatments worsen hair fall. Natural ingredients promote hair growth and scalp health. This DIY shampoo uses readily available ingredients for strong, shiny hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी