आपल्यापैकी प्रत्येकीलाच लांब, चमकदार आणि सौंदर्यात भर पाडतील असे निरोगी केस हवे असतात. परंतु प्रत्येकीचीच ही इच्छा पूर्ण होईलच असे नाही. आपल्यापैकी (curry leaves spray for strong and shiny hair) कित्येकजणी केसांच्या अनेक समस्यांनी हैराण असतात. केसांच्या अनेक समस्यांपैकी केसगळती ही फारच कॉमन आणि मोठी समस्या आहे. एकदा का केसगळती सुरु झाली की थांबायचे (how to make anti hair fall spray with curry leaves) नावच घेत नाही. बरं, केस गळायला लागले की इतके गळतात (curry leaves hair spray for hair fall) की ते पाहून आपल्याला टक्कल पडेल अशी भीती वाटते. अशा परिस्थितीत, केसगळती कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील कडीपत्ता खूपच असरदार ठरतो. कडीपत्त्यामध्ये असलेले पोषक घटक केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
कडीपत्त्याचा वापर करून आपण घरच्याघरीच अँटी-हेअर फॉल हेअर स्प्रे तयार करु शकता. हा स्प्रे नियमित वापरल्यास केसगळती थांबण्यास आणि केसांना नैसर्गिक चमक मिळवण्यास मदत होते. हा स्प्रे संपूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स न होता केसांना आतून पोषण मिळते. आरवीएमयूए अकॅडमीच्या (RVMUA Academy) संस्थापिका, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर एक्सपर्ट रिया वशिष्ट, यांनी कडीपत्त्याच्या पानांचा अँटी-हेअरफॉल स्प्रे कसा तयार करायचा याचे सिक्रेट सांगितले आहे.
कडीपत्त्याच्या पानांचा अँटी-हेअरफॉल स्प्रे...
घरच्याघरीच कडीपत्त्याच्या पानांचा अँटी-हेअरफॉल स्प्रे तयार करण्यासाठी आपल्याला, १ कप ताजी कडीपत्त्याची पाने, २ कप पाणी, १ टेबलस्पून एलोवेरा जेल, ३ ते ४ थेंब रोझमेरी किंवा लवेंडर इसेंशियल ऑईल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
केस धुण्यासाठी फक्त शाम्पू नाही, वापरा 'हे' पाणी; केसगळती थांबून नवीन केस वाढतील वेगाने...
कडीपत्त्याच्या पानांचा अँटी-हेअरफॉल स्प्रे तयार करण्याची कृती...
१. सर्वात आधी कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन घ्या.२. आता एका भांड्यात दोन कप पाणी उकळा आणि त्यात कडीपत्त्याची पाने टाका.३. हे मिश्रण मंद आचेवर ८ ते १० मिनिटे उकळू द्या, जोपर्यंत पाण्याचा रंग हलका हिरवा होत नाही.४. गॅस बंद करून हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या.५. आता हे पाणी गाळून घ्या.६. त्यात कोरफडीचे जेल (aloe vera gel) आणि इसेंशियल ऑईलचे (essential oil) काही थेंब घालून चांगले मिसळा.७. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.८. तुमचा घरगुती, नैसर्गिक अँटी-हेअरफॉल स्प्रे तयार आहे.
अँटी-हेअरफॉल स्प्रे केसांवर कसा वापरायचा ?
हा घरगुती कडीपत्त्याच्या पानांचा अँटी-हेअरफॉल स्प्रे वापरणे खूप सोपे आहे. यासाठी स्प्रे थेट स्काल्पवर लावा. आता बोटांच्या मदतीने २ ते ३ मिनिटे हलका मसाज करा. हा स्प्रे कमीतकमी १ ते २ तास किंवा रात्रभर केसांमध्ये तसाच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.
हा अँटी-हेअरफॉल स्प्रे वापरण्याचे फायदे...
घरगुती कडीपत्ता अँटी-हेअरफॉल स्प्रे केसांसाठी अनेक प्रकारे खूप फायदेशीर मानला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यात असलेल्या प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे केस गळणे कमी होते. यासोबतच, तो केसांच्या चांगल्या वाढीसाठीही मदत करतो. जर तुम्हाला अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रास होत असेल, तर या हेअर स्प्रेचा वापर केल्यास तुम्हाला खूप फायदा होईल.