आजच्या काळात केस गळणे, केसात कोंडा होणे आणि केसांची वाढ खुंटणे या समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. बदलेली जीवनशैली, प्रदूषण, ताणतणाव आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्समुळे केस गळणं, टाळूवर कोंडा जमा होणं आणि केसांची वाढ थांबणं ही समस्या वाढताना दिसते.(amla oil for hair growth) अशावेळी आपण महागड्या ट्रीटमेंट्स किंवा प्रॉडक्ट्सकडचा वापर करतो.(desi hair care remedies) पण आपल्या स्वयंपाकघरातच असा एक सोपा, स्वस्त आणि देसी उपाय आहे, जो पिढ्यानपिढ्या वापरला जातो तो म्हणजे आवळ्याचं तेल.(natural hair growth oil) बाजारात मिळणारी महागडी तेले आणि शॅम्पू अनेकदा केवळ जाहिरातींपुरतीच मर्यादित असतात. पण आवळ्याचे तेल आपल्या केसांसाठी बहुगुणी ठरु शकते. ज्याचा वापर करुन आपण महिन्याभरात केस पुन्हा वाढवू शकतो.
भोगीच्या भाजीची खिचडी करताना भात चिकट- गचका होतो? २ टिप्स, होईल मऊ- मोकळा, चवही आजीच्या हातासारखी
केस गळती रोखण्यासाठी आपण विविध शाम्पू आणि कंडिशनरचा केसांसाठी वापर करतो. या उत्पादनांमध्ये विविध रसायने असतात जे आपल्या टाळूला नुकसान पोहचवतात. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. पण घरगुती तयार केलेले तेल केसांना लावल्यास महिन्याभरात फरक दिसेल.
आवळ्याचे तेल तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आवळा धुवून घ्यावा लागेल, नंतर चिरुन घ्या. त्यात थोडे नारळाचे तेल घालून मिक्सरमध्ये बारीक करा. पेस्ट तयार होईल. यानंतर पॅनमध्ये खोबऱ्याचे तेल घाला आणि त्यात तयार आवळ्याची पेस्ट घाला. आवळा शिजेपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा. हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना लावल्यास महिन्याभरात फरक दिसेल. हे तेल १ ते २ महिने सहज टिकते.
आठवड्यातून किमान दोनदा हे तेल टाळूवर हलक्या हाताने मसाज करुन लावलाय हवे. रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस धुवा. नियमित वापरामुळे टाळू स्वच्छ राहतो, कोंडा कमी होतो आणि केस गळतीवर नियंत्रण मिळतं.या तेलामुळे केसांना कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत. महिन्याभरात केसांचा पोत सुधारला जातो, तर दोन महिन्यांत केसांची लांबी आणि जाडी मध्ये स्पष्ट फरक दिसू लागतो.
