Lokmat Sakhi >Beauty > महागडे हेअरऑईल वापरणं सोडा, फक्त ४ आवळे घेऊन तेल तयार करा- केस भराभर वाढून होतील दाट

महागडे हेअरऑईल वापरणं सोडा, फक्त ४ आवळे घेऊन तेल तयार करा- केस भराभर वाढून होतील दाट

Home Made Amla Hair Oil To Reduce Hair Fall: केस खूप गळत असतील किंवा केस अजिबातच वाढत नसतील तर आवळ्याचा हा एक सोपा उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकतो...(how to make amla hair oil at home?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 18:41 IST2025-02-12T18:41:06+5:302025-02-12T18:41:45+5:30

Home Made Amla Hair Oil To Reduce Hair Fall: केस खूप गळत असतील किंवा केस अजिबातच वाढत नसतील तर आवळ्याचा हा एक सोपा उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकतो...(how to make amla hair oil at home?)

how to make amla hair oil at home, home made amla hair oil to reduce hair fall, best home remedies for controlling hair loss and improving hair growth | महागडे हेअरऑईल वापरणं सोडा, फक्त ४ आवळे घेऊन तेल तयार करा- केस भराभर वाढून होतील दाट

महागडे हेअरऑईल वापरणं सोडा, फक्त ४ आवळे घेऊन तेल तयार करा- केस भराभर वाढून होतील दाट

Highlightsअगदी २ ते ३ आठवड्यांतच केस गळण्याचं प्रमाण कमी होऊन केसांची चांगली वाढ झाल्याचं जाणवेल. 

केस गळण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. काही जणींचे केस अजिबातच वाढत नाहीत तर काही जणींचे केस खूप जास्त गळतात. कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाणसुद्धा खूप वाढलेले आहे. केसांच्या अशा काही तक्रारी सुरू झाल्या की आपण मग बाजारात विकत मिळणारे महागडे तेल किंवा केसांसाठीचे इतर काही कॉस्मेटिक्स वापरायला सुरुवात करतो. पण त्याने फरक पडेलच असं नाही (home made amla hair oil to reduce hair fall). म्हणूनच आता हा एक स्वस्तात मस्त आणि केसांसाठी अतिशय गुणकारी ठरणारा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा (how to make amla hair oil at home?). हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवळे आणि इतर काही साहित्य लागणार आहे.(best home remedies for controlling hair loss and improving hair growth)

 

घरच्याघरी आवळ्याचं तेल तयार करण्याची पद्धत

केसांची चांगली वाढ होण्यासाठी तसेच केस दाट, काळे होण्यासाठी घरच्याघरी आवळ्याचं तेल कसं तयार करायचं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

आठवड्यातून एकदा 'या' पद्धतीने चेहऱ्याला बटाट्याचा रस लावा- पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन गायब..

या पद्धतीने तेल तयार करण्यासाठी आपल्याला ४ आवळे लागणार आहे. सगळ्यात आधी आवळे व्यवस्थित किसून घ्या.

त्यानंतर आवळ्याचा किस एका कढईमध्ये घाला. त्यामध्ये अर्धा कप मोहरीचं तेल, १ चमच्या मेथ्या, १ चमचा कलौंजी आणि कडिपत्त्याची मुठभर पाने घाला. हे सगळे पदार्थ सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या. 

 

सगळे पदार्थ व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये साधारण २ ते अडीच कप खोबरेल तेल घाला आणि पुन्हा एकदा तेलाला चांगली उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि १० ते १२ तास हे मिश्रण तसंच ठेवा.

कोण म्हणतं अभिनेत्री खूप उशिरा आई होतात? बघा तिशीच्या आत आई झालेल्या बॉलीवूड सेलिब्रिटी...

त्यानंतर सगळे पदार्थ गाळून घ्या आणि तेल एका बरणीमध्ये भरून ठेवा. हे तेल आठवड्यातून दोन वेळा केसांना लावून चांगली मालिश करा. अगदी २ ते ३ आठवड्यांतच केस गळण्याचं प्रमाण कमी होऊन केसांची चांगली वाढ झाल्याचं जाणवेल. 


 

Web Title: how to make amla hair oil at home, home made amla hair oil to reduce hair fall, best home remedies for controlling hair loss and improving hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.