Lokmat Sakhi >Beauty > केमिकलयुक्त शॅम्पू नकोच! घरी 'असा' बनवा नॅचरल शॅम्पू, केसगळती-फाटे फुटण्याची समस्या कमी, होतील सॉफ्ट-शायनी

केमिकलयुक्त शॅम्पू नकोच! घरी 'असा' बनवा नॅचरल शॅम्पू, केसगळती-फाटे फुटण्याची समस्या कमी, होतील सॉफ्ट-शायनी

DIY Chemical-Free Shampoo Recipes: Homemade Natural Shampoo: How to Make Chemical-Free Shampoo at Home: Best Chemical-Free Shampoo Ingredients: Natural Homemade Shampoo for Healthy Hair: Eco-Friendly Homemade Shampoo: Homemade Shampoo for All Hair Types: Benefits of Using Chemical-Free Shampoo: Simple Recipes for Chemical-Free Hair Care: तुम्हाला केसगळतीचा त्रास होत असेल तर घरीच बनवा नॅचरल शॅम्पू.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 17:01 IST2025-03-03T17:00:53+5:302025-03-03T17:01:23+5:30

DIY Chemical-Free Shampoo Recipes: Homemade Natural Shampoo: How to Make Chemical-Free Shampoo at Home: Best Chemical-Free Shampoo Ingredients: Natural Homemade Shampoo for Healthy Hair: Eco-Friendly Homemade Shampoo: Homemade Shampoo for All Hair Types: Benefits of Using Chemical-Free Shampoo: Simple Recipes for Chemical-Free Hair Care: तुम्हाला केसगळतीचा त्रास होत असेल तर घरीच बनवा नॅचरल शॅम्पू.

how to hair falls make homemade natural chemical free shampoo reduce hair loss long hair growth and silky and shine | केमिकलयुक्त शॅम्पू नकोच! घरी 'असा' बनवा नॅचरल शॅम्पू, केसगळती-फाटे फुटण्याची समस्या कमी, होतील सॉफ्ट-शायनी

केमिकलयुक्त शॅम्पू नकोच! घरी 'असा' बनवा नॅचरल शॅम्पू, केसगळती-फाटे फुटण्याची समस्या कमी, होतील सॉफ्ट-शायनी

केसगळती, केसांना फाटे फुटणे, कोरडे आणि रुक्ष केसांना सॉफ्ट आणि शायनी करण्यासाठी आपण अनेक केमिकलयुक्त शॅम्पू वापरतो.(Hair falls problem)  आपल्या असे वाटते की, यामुळे आपल्या केसांची खुंटलेली वाढ सुरळीत होईल. केसांना सिल्की आणि शायनी करण्यासाठी आपण महागडे उत्पादने आणि पार्लरचा खर्च करतो. (Homemade Natural Shampoo) आयनिंग, स्ट्रेनिंगसारख्या गोष्टी करतो. परंतु, यामुळे केसाची समस्या कमी होण्याऐवजी ती अधिक वाढू लागते. (Natural Homemade Shampoo for Healthy Hair)


केसगळतीची समस्या, केसांची वाढ खुंटणे यासाठी जितका पुरेसा आहार लागतो तितकेच केमिकल फ्री गोष्टी देखील. अनेकदा आपण बाजारात मिळणारे केमिकलयुक्त शॅम्पू केसांसाठी वापरतो ज्याच्यामुळे केसाचे आरोग्य बिघडते.(Simple Recipes for Chemical-Free Hair Care) केस वाढण्याऐवजी केसगळती अधिक होते. सध्या अनेक शॅम्पूमध्ये सल्फेट, पॅराबेन आणि इतर केमिकल असणारे घटक मिसळले जातात. (Benefits of Using Chemical-Free Shampoo) जे केसांना नुकसान पोहचवतात. या शॅम्पूचा जास्त काळ वापर केल्याने केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होतात. जर तुम्हाला केसगळतीचा त्रास होत असेल तर घरीच बनवा नॅचरल शॅम्पू. 

केमिकलयुक्त कंडिशनर कशाला, घरी ‘असे’ बनवा कंडिशनर! करायला सोपे-केस होतील सिल्की, येईल चमक


घरी शॅम्पू बनवण्यासाठी 

रीठा - ६ ते ८ तुकडे 

शिकाकाई - ५ ते ६ तुकडे 

आवळा - ४ ते ५ तुकडे 

मेथीचे दाणे - १ चमचा 

कोरफड जेल - २ चमचे 

पाणी - ३ कप 


शॅम्पू कसा बनवाल?

1. शॅम्पू बनवण्यासाठी आपल्याला रात्रभर सर्व गोष्टी पाण्यात भिजत ठेवायला हव्या. 

2. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंद आचेवर हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. 

3. हे मिश्रण थंड झाल्यानंतर चांगले मॅश करुन गाळून घ्या. यामध्ये आता २ चमचे कोरफड जेल घाला आणि चांगले मिसळा. 

4. हा शॅम्पू वापरताना केसांवर हलक्या हाताने लावा, ५ ते ७ मिनिटे मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. 

5. आठवड्यातून २ ते ३ वेळा असे केल्याने केसांच्या समस्या दूर होतील. 

 

Web Title: how to hair falls make homemade natural chemical free shampoo reduce hair loss long hair growth and silky and shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.